रक्षाबंधन
![]() |
रक्षाबंधन निबंध |
सणाची माहिती
रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. आपला भाऊराया सुखी असावा, त्याने आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक विवाहित बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण शिकावी, मोठेपणी चांगल्या घरी जावी, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटत असते.
भाऊ - बहिणीच्या या प्रेमाला उधाण येत ते राखी पौर्णिमेला. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भावाच्या आयुष्यात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी आठवणीने राखी बांधून घेतो. राखी बांधल्यानंतर बहीण मिठाई देऊन भावाचे तोंड गोड करते तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन खूश करत असतो. या दिवशी श्रावणी करणे हा प्रकार असतो. श्रावणी करणे म्हणजे मन शुद्ध करणे.
बहीण भावाचे नाते दृढ करण्यासाठी, मित्रत्व, स्नेह व परस्परांवरील प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫