SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, September 29, 2022

सुविचार

♻️ सुविचार ♻️⚜️ मन माणसाला कसे बघावे हे शिकवते.

⚜️ मरणाचे सतत स्मरण असावे.

⚜️ दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.

⚜️ महात्मे आपत्तीत सापडले तरी आपला स्वभाव सोडत नाहीत.

⚜️ महत्वकांक्षेशिवाय माणूस म्हणजे शिडाशिवाय जहाज.

⚜️ हिरा देखील पैलू पडल्याशिवाय चमकत नाही.

⚜️ ज्ञानाने श्रेष्ठत्व व मनाचे कर्तुत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते.

⚜️ सत्य झाकले जाईल पण मावळले कधीच जाणार नाही.

⚜️ देश हा देव असे माझा !

⚜️ माणसाचे मन हे परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे.

⚜️ शरीर, मन, बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.

⚜️ सत्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

⚜️ पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

⚜️ कविता हे सर्व ज्ञान पुष्पाचे अत्तर आहे.

⚜️ आली जरी कष्ट जरी तशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर.

⚜️ जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लपंडाव.

⚜️ जो सर्वात कमी चुका करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे.

⚜️ माणूस स्वतःचा भाग्यविधाता असतो.

⚜️ स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करण्याशिवाय उभे राहत नाही.

⚜️ शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

⚜️ गरज ही शोधाची जननी आहे.

⚜️ जीवन म्हणजे नवे व जुने संघर्ष.

⚜️ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.

⚜️ सत्य शिवाय दुसरा धर्म नाही.

⚜️ परिश्रम करायची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते.

⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.

⚜️ महान त्यागानेच महान कार्य होऊ शकते.

⚜️ मोठेपण वयाने सिद्ध होत नाही ते कर्तुत्वाने सिद्ध होते.

⚜️ जी वाणी सत्याला संभाळते त्या वाणीला सत्य सांभाळते.

⚜️ इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली की सफलता मिळणारच.

⚜️ जुन्या पासून बोध घ्या नव्याचा शोध घ्या.

⚜️ अंतकरणाची सुंदरता सुंदर विचारातून प्रकट होते.

⚜️ घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

⚜️ आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

⚜️ माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील मोठा धर्म आहे.

⚜️ आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखुरे धन.

⚜️ जीवन ही समर भूमी आहे येथे लहान मोठ्या जखमा होणारच.

⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा राहतो.

⚜️ बुद्धिमान मुले ही राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची ठेव आहे.

⚜️ लोकमत लहरी असते.

⚜️ माणसाने जीवनात आपले ध्येय निश्चित करावे.

⚜️ सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात.

⚜️ मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही.

⚜️ दुर्बल मनुष्याला कोणत्याही कार्यात यश येणे शक्य नाही.

⚜️ नम्रतेची काया हा सद्गुणाचा पाया.

⚜️ क्षमेचा उपयोग स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अधिक करावा.

⚜️ त्याग ही प्रेमाची कसोटी.

⚜️ प्रयत्न हाच परमेश्वर.

⚜️ संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव.

⚜️ मनाला नेहमी उद्योगात गुंतवून ठेवा.

⚜️ माणसाचे मन परमेश्वराला जागेपणी पडलेले एक स्वप्न आहे.

⚜️ दुसऱ्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.

⚜️ सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येत नाही.

⚜️ त्याग हीच प्रेमाची कसोटी.

⚜️ कर्ज हे कितीही उपकारक असले तरी ते ओझेच असते.

⚜️ ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव असते तोच ज्ञानी होय.

⚜️ रात्र गुपचूप पणे कळ्या फुलविते आणि तिचे श्रेय मात्र दिवसाला घेऊ देते.

⚜️ ज्योतिष माणसाला दुर्बल करते, नकारात्मक भूमिका घ्यायला शिकवते.

⚜️ हृदयात अपार सेवा भरली की सगळीकडे मित्र दिसू लागतात.

⚜️ अन्न म्हणजे देव आहे म्हणून त्याचा कधीही अपव्यय करू नये.

⚜️ मित्राच्या मरणापेक्षा मैत्रीचे मरण असह्य असते.

⚜️ अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झरा होय.

⚜️ आधी जातो मनाचा तोल मग जातो शरीराचा तोल.

⚜️ दैववादी मनुष्य सत्वर नाश पावतो.

⚜️ अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण.

⚜️ चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे गोड मिळतात.

⚜️ तुम्हाला कोणी फसवले म्हणून तुम्ही कोणाला फसवू नका.

⚜️ माणसाने निदान स्वतःला तरी नीट समजून घ्यावे.

⚜️ श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.

⚜️ तुम्हाला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

⚜️ दोष काढणे सोपे आहे पण सुधारणे अवघड आहे.

⚜️ आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत याचा विचार करा.

⚜️ समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.

⚜️ भव्य विचार हा सुगंधासारखा असतो.

⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा फक्त राहतो.

⚜️ आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

⚜️ माता ही प्रेमाची सरिता आहे.

⚜️ माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा.

⚜️ अपयशी यशाची पहिली पायरी आहे.

⚜️ संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

⚜️ पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहे.

⚜️ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे.

⚜️ नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळत नाही.

⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.

⚜️ स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे.

⚜️ संकटा पेक्षा संशय यशाला फार घातक ठरतो.

⚜️ धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार.

⚜️ संघर्ष जेवढा बिकट तेवढे यश अधिक उज्वल.

⚜️ द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येणार नाही.

⚜️ नवीन शिकायची उमेद ज्याची गेली तो म्हातारा.

⚜️ ज्ञानाने बुद्धि जिंकता येते पण सेवेने अंत:करण जिंकता येते.

⚜️ बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

⚜️ जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मधमाशी सारखे असू द्या.

⚜️ चिकाटी ही जीवनातील यशाचे साधन होय.

⚜️ जो स्पष्ट वक्ता असतो तो कधीच कपटी नसतो.

⚜️ चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्ती सुगंध दरवळत नाही.

⚜️ आयुष्यातील बिकट प्रसंगांना तोंड देण्याची तालीम म्हणजे खेळ.

⚜️ आपल्या कार्यात एकाग्र होणे ही यशाची पहिली पायरी आहे.

⚜️ वाचन हे मनाचे अन्न.

⚜️ माझे तेच खरे म्हणू नका, खरे तेच माझे म्हणा.

⚜️ मोठेपणा हा शिलतेवरून ठरतो.

⚜️ निर्मलांना रक्षण देणे हीच खरी बलाची सफलता होय.


Wednesday, September 28, 2022

गुणाकार

 🕳️ गुणाकार 🕳️
⚜️ गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येची पट करणे.


⚜️ गुणाकारामध्ये ज्या संख्येने गुणायचे आहे तिला ' गुणक ' म्हणतात व ज्या संख्येला गुणायचे आहे तिला 'गुण्य' म्हणतात.


⚜️ गुणाकारामध्ये गुणकणे गुण्यामधील प्रत्येक अंकाला क्रमशा उजवीकडून डावीकडे गुणले जाते.


⚜️ गुणाकारामध्ये शून्य ने कोणत्याही संख्येला गुणले अगर कोणत्याही संख्येने शून्यला गुणले तर गुणाकार  शून्य येतो.


⚜️ गुणाकार व भागाकार या परस्परांच्या विरुद्ध क्रिया आहेत.


⚜️ एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो.


⚜️ गुणाकार करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्या पुढील प्रमाणे...


⚜️ पाढ्याच्या सहाय्याने गुणाकार कसा करावा याचा व्हिडिओ खाली बटनाला टच करून पाहावा.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


⚜️ इयत्ता तिसरी चौथीसाठी लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा केला जातो. त्याचा व्हिडिओ खालील दिलेल्या बटनाला टच करून पाहू शकता.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


⚜️ कोणत्याही पाढ्याचा वापर न करता गुणाकार कसा करावा. याची जापनीज पद्धतीचा व्हिडिओ खालील बटनाला टच करून पहावा.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणण्याची सर्वात सोपी पद्धत.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


⚜️ तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणण्याची सर्वात सोपी पद्धत.🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


निबंध आई संपावर गेली तर

⚜️ आई संपावर गेली तर... ⚜️


            आई संपावर गेली तर माझे पूर्ण आयुष्यच बदलून जाईल. आई घरात असते म्हणूनच बाबा निर्धारस्तपणे त्यांच्या कामाला जाऊ शकतात. आई घरात असते म्हणून मी आणि माझी ताई निर्धास्तपणे शाळेत जाऊ शकतो. अशी आमची आई संपावर गेली तर सकाळी मला गरमागरम दूध प्यायला कोण देईल ? शाळेत जाताना ताजा भरलेला डबा कसा मिळेल? घरात काही संपलेले असले तर आईचे बरोबर लक्ष असते. विजेचे, सोसायटीचे, फोनचे बिल भरणे, बँकेत जाणे, इस्त्री चे कपडे तयार ठेवणे, रोजची भाजी आणि किराणा सामान आणणे, कामवाल्या बाईकडून व्यवस्थितपणे काम करून घेणे. आम्ही आजारी पडलो तर आमची काळजी घेत. आजोबांची औषधे आठवणीने देणे, माझा आणि ताईचा अभ्यास घेणे. अशा सारखी कामे कोण करेल?

          माझी आई घरातील कामव्यतिरिक्त शिवणकाम ही करते. जसा वेळ मिळेल तसे ती इतर कामही करते. त्यामुळे मला असे वाटते की आईला जणू काही दहा हातच आहे की काय?

          माणूस संपावर का जातो? कारण त्याच्या कामाची किंमत इतर कोणालाही नसते. आईला आमच्या घरात बाबांपासून सर्वच घरातील लोक मान देतात त्यामुळे आई संपावर कधी जाणार नाही. तशी ती गेली तर आमचे हाल खूप होतील हे मात्र नक्की !

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खाली टच करा.

👇Sunday, September 25, 2022

एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न

 ⚜️एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न⚜️
एक ते शंभर संख्यांमध्ये

❇️ एक अंकी नऊ संख्या आहेत. { 1 ते 9}

❇️ दोन अंकी 90 संख्या आहेत. { 10 ते 99}

❇️ तीन अंकी एक संख्या आहे. { 100 }


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये 

❇️ एक हा अंक 21 वेळा लिहावा लागतो.

❇️ दोन ते नऊ हे अंक 20 वेळा लिहावे लागतात.

❇️ शून्य हा अंक 11 वेळा लिहावा लागतो.

⚜️ एक ते शंभर मध्ये शून्य ते नऊ हे अंक 192 वेळा लिहावे लागतात.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये

❇️ एक हा अंक एकूण 20 संख्यात येतो.

❇️ दोन ते नऊ हे अंक 19 संख्यात येतात.

❇️ शून्य हा अंक 10 संख्यात येतो.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


♦️ सर्वात लहान आणि सर्वात मोठी

♻️ एक अंकी सर्वात लहान संख्या 1 आहे.

♻️ एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे.

♻️ दोन अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे.

♻️ दोन अंकी सर्वात मोठी संख्या 99 आहे.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये

💢 एक ते शंभर संख्यांमध्ये समसंख्या 50 आहेत.

💢 एक ते शंभर संख्यांमध्ये विषम संख्या 50 आहेत

💢 एक ते शंभर संख्यांमध्ये मूळ संख्या 25 आहेत

💢 एक ते शंभर संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत

💢 एक ते शंभर संख्यांमध्ये 74 संयुक्त संख्या आहेत

💢 एक ते शंभर मध्ये दहा वर्ग संख्या आहेत

{ 1 , 4 , 9 , 16 , 25 , 36 , 49 , 64 , 81 , 100 }

💢 एक ते शंभर मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत

{ 1 , 3 , 6 , 10 , 15 , 21 , 28 , 36 , 45 , 55 , 66 , 78 , 91} 


सर्वात महत्त्वाचे ~ एक ते शंभर संख्यांवरील प्रश्न समजून वाचावेत.

🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫

♦️ एक ते शंभर संख्यांवर आधारित काही प्रश्न


प्रश्न 👉 एक ते शंभर संख्यांमध्ये तीन हा अंक किती वेळा लिहावा लागतो?

उत्तर👉 20 वेळा लिहावा लागतो


प्रश्न 👉 शून्य हा अंक नसणाऱ्या दोन अंकी किती संख्या आहेत?

उत्तर👉 81 संख्या आहेत


प्रश्न 👉 दोन हा अंक असणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती?

उत्तर👉 18 संख्या आहेत


प्रश्न 👉 दोन अंकी एकूण संख्या किती आहेत?

उत्तर👉 90 आहेत


प्रश्न 👉 दोन अंकी सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती?

उत्तर👉 2475


प्रश्न 👉 एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व विषम असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती?

उत्तर👉 326


प्रश्न 👉 एक ते शंभर या संख्येत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत?

उत्तर👉 13

🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫

एक ते शंभर अंकावरील प्रश्न या घटकाची सराव चाचणी सोडवायचे असल्यास खाली टच करा.

👇


🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫

एक ते शंभर संख्या वर आधारित प्रश्न चा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.

👇


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

निबंध ~ माझा आवडता सण - विजयादशमी { दसरा}

❇️ माझा आवडता सण ~ विजया दशमी ❇️               विजयादशमी म्हणजे दसरा. दसरा हा सण हिंदूंच्या दृष्टीने खूप मोठा सण आहे. गणेश चतुर्थी नंतर येणारा मोठा सण म्हणजे दसरा. हा सण दहा दिवस चालतो. म्हणून या सणाला दसरा असे म्हणतात. दसरा हा सण अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध दशमीला संपतो.

              दसरा या सणाला प्राचीन परंपरा आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध विजयादशमी दिवशी केला. पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी शमी वृक्षाच्या डोलीत लपवून ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली. तो हाच दिवस याच दिवशी पांडवांनी लपवून ठेवलेल्या शस्त्रांची पूजा केली. आजही दसऱ्यात शस्त्र पूजा केली जाते.

               दसऱ्याच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना असे म्हणतात. घटस्थापने पासून दसरा उत्सवाला सुरुवात होते. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रोज देवाचा जागर केला जातो दसऱ्याचे दांडिया नृत्य तर खूपच प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय आहेत शाळेतील मुले या दिवशी नवे कपडे घालून सरस्वतीची पूजा करतात गुरुवर्यांकडून आशीर्वाद घेतात

                सिमोल्लंघन हा दसऱ्याच्या सणातील सर्वात आनंदाचा क्षण. सिमोल्लंघनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण एकमेकांना शमीच्या वृक्षाची पाने देऊन म्हणजे सोने देऊन सोने घ्या सोन्यासारखं रहा अशी शुभेच्छा देतात.

दसरा सण मोठा ........नाही आनंदाला तोटा........

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.

👇Saturday, September 24, 2022

महात्मा गांधी यांचा जीवन परिचय व महत्त्वाचे मुद्दे

  ⚜️ महात्मा गांधी यांचा जीवन परिचय⚜️             सत्य व अहिंसेवर प्रेम करणारी महात्मा गांधी जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होय.

             महात्मा गांधींचा जन्म काठेवाडात पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आणि आई पुतळीबेन अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. वडील रोज भगवद्गीतेचे पठण करत आणि आई पूजापाठ केल्याशिवाय कधी भोजन करत नसे.

               बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली. परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्यानंतर त्यांनी सत्संगती कधी सोडली नाही. वडिलांनी आणलेले पितृभक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले आणि राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले. हरिश्चंद्राच्या सत्यपालनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. हरिश्चंद्रासारखे आपणही सत्यवादी व्हावे असे त्यांना वाटू लागले. लहानपणी त्यांनी भुताची भीती वाटत असे त्यावेळी आईने त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगितले. पुढील जीवनात फार उपयोग झाला. तसेच तुलसी रामायणाच्या वाचनाने ईश्वरभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात प्रचलित झाली.

            वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला. 1885 मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले पण आईची परवानगी नव्हती. मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थांचे सेवन करणार नाही. अभक्ष भक्षण करणार नाही. परस्त्रीला स्पर्श करणार नाही. असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले.

              जून 1891 साली महात्माजी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले. त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाला फारसे यश मिळाले नाही. विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या गांधींजींना दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय व्यापाऱ्याने आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेत नेले. अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापाराला न्याय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत महात्माजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणाची माहिती झाली. कृष्णवर्णी यांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले. प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला. गौरवर्णीयांप्रमाणेच कृष्णवर्णी यांना वागणूक मिळावी यासाठी महात्माजींनी जे कार्य केले ते सुवर्णाक्षरात कोरण्यासारखेच आहे.

               गांधींनी बुद्धचरित्र आणि भगवद्गीता वाचली. गीतेचे सखोल चिंतन केले व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. टॉलस्ट्रॉलचे 'वैकुंठ माझ्या हृदयात आहे' नावाचे पुस्तक वाचले. रास्किनचे चे 'सर्वोदय' हे पुस्तक जाणून घेतले. सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण सामावलेले आहे याची त्यांना जाणीव झाली. बौद्धिक शिक्षणापेक्षा त्यांना हृदयाच्या शिक्षणाला म्हणजे चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिले. त्यांना सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता. हिंसेपेक्षा अहिंसेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. त्यांना फिरोजशहा मेहता हिमालयासारखे वाटले, लोकमान्य टिळक समुद्रासारखे व नामदार गोखले गंगेसारखे वाटले.

           भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला व तो त्यांनी दूर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, शस्त्राशिवाय प्रतिकार, असहकार अशा नवीन साधनांचा पुरस्कार केला. देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला. हिंदू मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. जातिभेद त्यांना मान्य नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली. अस्पृश्यांना 'हरिजन' असे नाव दिले. हे सर्व कार्य ते निस्वार्थ बुद्धीने करत होते. गीतेतील निष्काम कर्मयोग ते आचरत होते. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

             महात्माजींचे कार्य पाहून स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. 1942 साली 'चले जाव', 'भारत छोडो' असे इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती. इंग्रजांनी लाठीमार, गोळीबार केला. अनेकांना तुरुंगात घातले, पण इंग्रजांचे काही चालले नही.

             1947 ला देश स्वतंत्र झाला. भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटली. परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करीत असताना गोळी मारून ठार केले. गांधीजींच्या मुखात त्यावेळीही 'हे राम' हे शब्द होते. त्यांना हुतात्म्याचे मरण आले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले. त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे झाला.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


⚜️ महत्त्वाचे मुद्दे ⚜️


⚜️ महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदर गुजरात मध्ये झाला.

⚜️ 1891 मध्ये बॅरिस्टरची पदवी मिळवली.

⚜️ 1983 मध्ये ते आफ्रिकेत गेले. त्यांनी नाताळ या वसाहतीत जाऊन हिंदी मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

⚜️ 1904 ते 1914 या काळात आपल्या सत्याग्रहाच्या प्रयोगामुळे नाताळ येथील लोकांवर लादण्यात येणारा जिझिया कर व मतदान करण्यास मनाई हे दोन कायदे तेथील वसाहतीत सरकारला रद्द करण्यास भाग पाडले.

⚜️ 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी भारतात आले.

⚜️ 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह बिहार येथे केला.

⚜️ 1918 मध्ये गिरणी कामगारांचा सत्याग्रह अहमदाबाद येथे केला.

⚜️ रौलेट कायद्याविरुद्ध लढा 6 एप्रिल 1919

⚜️ 1920 मध्ये असहकार आंदोलन केले.

⚜️ 1930 ला सविनय कायदेभंग व मिठाचा सत्याग्रह केला.

⚜️ 1940 ला वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली.

⚜️ 1942 मध्ये चले जाव आंदोलन केले.

⚜️ महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र व नवजीवन हे मासिक सुरू केले होते.

⚜️ संपत्तीचे विश्वस्त संकल्पना महात्मा गांधींनी मांडली.

⚜️ त्यांनी ग्रामराज्याचा पुरस्कार केला.

⚜️ 1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना केली.

⚜️ अन टू दि लास्ट या जॉन रस्किन यांच्या ग्रंथाचा महात्मा गांधींवर प्रभाव होता.

⚜️ महात्मा गांधीवर टॉलेस्टॉय यांच्या विचारसरणीचाही प्रभाव होता.

⚜️ महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. या स्मृतिपित्यर्थ 9 जानेवारी हा दिवस भारत सरकार 'प्रवासी भारतीय दिवस' म्हणून साजरा करते.

⚜️ त्यांना बापू सरोजिनी नायडू यांनी, राष्ट्रपिता नेताजींनी, महात्मा रवींद्रनाथ टागोर यांनी, अर्धनग्न फकीर फ्रँक मोरेश यांनी, अर्धनग्न विणकर विल ड्युराँट यांनी संबोधले.

⚜️ 30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे याने त्यांची दिल्ली येथे बिर्ला मंदिर परिसरात हत्या केली.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी निबंध पाहिजे असेल तर खाली टच करा.

👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असल्यास खाली टच करा.

👇

मूळ संख्या

 ❇️ मूळ संख्या ❇️व्याख्या 👉 ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला ' मूळ संख्या ' म्हणतात.


⚜️ एक ते शंभर संख्यांच्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत.


2 , 3 , 5 , 7 , 11 , 13 , 17 , 19 , 23 , 29 , 31 , 37 , 41 , 43 , 47 , 53 , 59 , 61 , 67 , 71 , 73 , 79 , 83 , 89 , 97


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


❇️ 1 - 10   👉 2 , 3 , 5 , 7          👉 4 मूळ संख्या

❇️ 11 - 20 👉 11 , 13 , 17 , 19 👉 4 मूळ संख्या

❇️ 21 - 30 👉 23 , 29                👉 2 मूळ संख्या

❇️ 31 - 40 👉 31 , 37                👉 2 मूळ संख्या

❇️ 41 - 50 👉 41 , 43 , 47         👉 3 मूळ संख्या

❇️ 51 - 60 👉 53 , 59                👉 2 मूळ संख्या

❇️ 61 - 70 👉 61 , 67                👉 2 मूळ संख्या

❇️ 71 - 80 👉 71 , 73 , 79         👉 3 मूळ संख्या

❇️ 81 - 90 👉 83 , 79                👉 2 मूळ संख्या

❇️ 91 - 100 👉 97                     👉 1 मूळ संख्या


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫


⚜️ मूळ संख्येचा मोबाईल क्रमांक.


    👉  44 22 32 23 21


{ एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहेत 11 ते 20 मध्ये चार मूळ संख्या आहेत अशा पद्धतीने हा मोबाईल नंबर तयार करण्यात आलेला आहे.}


⚜️ 2 एकमेव समसंख्या असून ती मूळ ही संख्या आहे.


⚜️ 1 ही संख्या मूळ ही संख्या नाही व संयुक्त ही संख्या नाही.


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️


⚜️ जोडमूळ संख्या ⚜️

व्याख्या 👉 ज्या दोन मूळ संख्यात केवळ दोन चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात.

जोड मूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत.


3 - 5 , 5 - 7 , 11 - 13 , 17 - 19 , 29 - 31 , 41 - 43 , 59 - 61 , 71 - 73


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️


 ⚜️सहमूळ संख्या⚜️ 

व्याख्या 👉 फक्त 1 एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.

उदाहरण👉  6 व 25

6 चे विभाजक   👉 1 , 2 , 3 , 6

25 चे विभाजक 👉 1 , 5 , 25 

या दोन्ही संख्यांमध्ये 1 हा विभाजक सामायिक आहे म्हणून या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


🕳️ मूळ संख्येवर आधारित प्रश्न 🕳️


प्रश्न 👉 एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

उत्तर 👉 25


प्रश्न  👉 किती मूळ संख्या या समसंख्या आहेत?

उत्तर 👉 1


प्रश्न  👉 दोन अंकी एकूण किती मूळ संख्या आहेत?

उत्तर 👉 21


प्रश्न  👉 दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती

उत्तर 👉 11


प्रश्न  👉 दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती

उत्तर 👉 97


प्रश्न  👉 एकक स्थानी एक असणाऱ्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

उत्तर 👉 5 { 11 , 31 , 41 , 61 , 71}


प्रश्न  👉 एक ते दहा मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?

उत्तर 👉 17 { 2 + 3 + 5 + 7 = 17}


प्रश्न  👉 51 ते 100 मध्ये किती मूळ संख्या येतात?

उत्तर 👉 10


प्रश्न  👉 एक ते शंभर मध्ये जोड मूळ संख्येच्या किती जोड्या आहेत?

उत्तर 👉 8


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


तुम्हाला जर मूळ संख्या या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.

👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर मूळ संख्या या घटकावरील व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.

👇❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️


Friday, September 23, 2022

निबंध मी

⚜️ मी ⚜️       मी मुलगा आहे. मी नऊ वर्षाचा आहे. माझे नाव अथर्व आहे. पण सगळेजण मला लाडाने अतू असे म्हणतात.

       मी एकुलता एकच मुलगा आहे. त्यामुळे आई बाबा व आजी आजोबा माझे लाड करतात. पण त्याचवेळी मी बिघडता कामा नये अशी काळजीही त्यांना वाटत असते.

       मी सकाळी सात वाजता उठतो. आई मला दूध प्यायला देते. तिला आणि बाबांना शाळेला जाण्याची घाई असते. मी आईला त्रास देत नाही. मग सगळेजण मला शहाणा मुलगा म्हणतात.

      मी सकाळी उठल्यानंतर नऊ वाजता अंघोळ करून देवाला नमस्कार करतो. मग आजीने दिलेली गरमागरम पोळी आणि एखादे फळ खाऊन थोडा वेळ गृहपाठ करतो. मग डबा घेऊन शाळेला जातो.

      शाळेत दिवसभर अभ्यास झाल्यावर संध्याकाळी घरी येऊन बाहेर खेळतो. रात्री आम्ही सगळे एकत्र गप्पा मारत जेवण करतो. रात्री झोपताना कधी कधी आजोबा तर कधी आजी मला गोष्ट सांगतात. मी लवकर झोपावे म्हणून घरातले सगळे लोक टीव्ही जास्त पाहत नाहीत. आणि मलाही पाहू देत नाहीत.

       मी शाळेत आणि घरात सर्वांचा लाडका मुलगा आहे.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

बोधकथा~ विद्येची किंमत

⚜️ विद्येची किंमत ⚜️एकदा रामकृष्ण परमहंस शिष्यांसह गंगा स्नानासाठी गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध महापुरुष तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले. व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले,' तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.

शिष्यांनी रामकृष्ण यांना सांगितले. रामकृष्ण म्हणाले त्यांना सांग, 'तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा सुद्धा नाही.' शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला,' पुन्हा असे म्हणालात तर, तुम्हाला भस्म करून टाकीन.'

रामकृष्ण पुन्हा तसेच म्हटले. तेव्हा प्रत्यक्ष सिद्ध पुरुषाने त्यांना येऊन विचारले,' याचा अर्थ काय आहे?'

रामकृष्ण म्हणाले,' नावाडी सुद्धा दोन आण्यात पहिल्या तिराला घेऊन जातो. त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. ज्या विद्येचा लोकांना उपयोग नाही तिची किंमत शून्य आहे. म्हणून तुमच्या या विद्येची किंमत दोन आणे सुद्धा नाही.'

तात्पर्य

माणसाने आपल्या विद्येचा कर्तुत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा तरच त्या व्यक्तीला अर्थ प्राप्त होतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.बोधकथा ~ निरीक्षण

⚜️ निरीक्षण ⚜️      एकदा एका वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्मण निरीक्षण शक्ती व किळस सोसण्याची क्षमता पाण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हटले ,'या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे तिरस्कार दर्शवायचा नाही'.

          सरांनी वाटीत बोट बुडवून चाखले. पाठवपाठ एकामागून एका विद्यार्थ्याने ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.

         प्राध्यापक म्हणाले ,'किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळे पास झालात पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात'.

         'मी करतो तसे तुम्ही करायचे होते तुमच्या कुणाच्या लक्षात आली नाही मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच'.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसवले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले. म्हणाले या पाण्यात अपायकारक काहीच नाही. आता विद्यार्थी खुश झाले.

तात्पर्य

प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमन पटते व त्यातून यशाचा मार्ग खुला होतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा

👇


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

निबंध ~ महात्मा गांधी

⚜️ महात्मा गांधी⚜️                महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. ज्याने जगाला अहिंसेच्या मार्गाने जगण्याची शिकवण दिली, ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक व शांतताय मार्गाने लढा दिला, ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि त्यांच्यातील तंटे मिटवण्यासाठी उपोषणे केली. त्या महान पुरुषाचा म्हणजे महात्माजींचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारताला भूषणावर आहे. 

             त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्याकाळच्या पद्धतीनुसार वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. 

               गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टर ची पदवी घेतली आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले. तेथे त्यांना काळेगोरे यांच्यातील भेदभावाला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांनी सत्याग्रह ह्या अहिंसाख मार्गाने त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.

                ते 1909 साल भारतात आले. तेव्हा भारतातही इंग्रज लोकांची जुलमी सत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या सत्यविरुद्ध लढण्यासाठी सर्व सामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवी होते ते काम महात्मा गांधींनी केले. त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या धर्मांचे आणि पंथांचे भारतीय लोक आपल्यातील मतभेद विसरून एकत्र आले. म्हणून त्यांना महात्मा गांधी महात्मा अशी पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिली.

                स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे एका माथेफिर व माणसाने गांधीजींची हत्या केली. ते एक श्रेष्ठ महामानव होते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

राष्ट्रपिता महात्मा गांधी निबंध क्रमांक 2

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटन टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायची असल्यास खाली टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️Monday, September 19, 2022

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने

 💠 महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने 💠
⚜️ महाराष्ट्राची आर्थिक राजधानी

👉 मुंबई

⚜️ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी

👉 पुणे 

⚜️ महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी

👉 कोल्हापूर

⚜️ महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी

👉 पंढरपूर

⚜️ महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी

👉 पुणे 

⚜️ महाराष्ट्राची पर्यटन राजधानी

👉 औरंगाबाद

⚜️ मराठवाड्याची राजधानी

👉 औरंगाबाद 

⚜️ महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर

👉 पुणे 

⚜️ अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार 

👉 जळगाव 

⚜️  मुंबईची परसबाग 

👉 नाशिक 

⚜️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा 

👉 गोंदिया

⚜️ महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा 

👉 औरंगाबाद 

⚜️ महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा 

👉 गडचिरोली 

⚜️ महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा

👉 सोलापूर

⚜️ महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा

👉 नंदुरबार 

⚜️ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर

👉 औरंगाबाद 

⚜️ महाराष्ट्रातील वायु उद्योगाचा जिल्हा 

👉 नाशिक

⚜️ एकेकाळची सारस नगरी

👉 गोंदिया

⚜️ मिरचीचे आगार चिली कॅपिटल

👉 नंदुरबार 

⚜️ महाराष्ट्रातील यादवांच्या काळातील भारताच्या राजधानीचा जिल्हा

👉 औरंगाबाद 

⚜️ महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा

👉 कोल्हापूर

⚜️ महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा 

👉बीड 

⚜️ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असणारा जिल्हा

👉 नाशिक 

⚜️ महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा 

👉नाशिक

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

आपणास जर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.

👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


या घटकावर आधारित सराव चाचणी सोडण्यासाठी खाली टच करा.

👇


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बोधकथा ~ मूठभर धान्य

⚜️ मूठभर धान्य! ⚜️ही गोष्ट गौतम बुद्धाच्या काळातील आहे. एक महिला आपल्या मृत बालकाला घेऊन गौतम बुद्धांकडे आली आणि पायावर डोके ठेवून म्हणाली, "भगवान काहीही करा पण माझ्या मुलाला जिवंत करा. एकादा मंत्र म्हणा म्हणजे माझा मुलगा जिवंत होईल".

गौतम बुद्धांना तिची खूप दया आली. तिला शांत करून गौतम बुद्ध म्हणाले, "तू शोक करू नकोस, मी तुझ्या मुलाला नक्कीच जिवंत करीन". त्या महिलेला आनंद झाला गौतम बुद्ध पुढे म्हणाले, "ज्या घरात आजपर्यंत एकही माणूस मेला नाही अशा घरातून प्रथम मूठभर धान्य घेऊन ये. मग मी तुझा मुलगा जिवंत करतो."

त्या महिलेला विश्वास वाटला व मूठभर धान्य आणण्यासाठी ती निघून गेलीः पण ज्या घरात यापूर्वी एकही माणूस मृत्यू पावला नाही असे घर तिला सापडलेच नाही. व मूठभर धान्य मिळाले नाही. ती महिला निराश झाली व गौतम बुद्धांकडे परत आली.  म्हणाली "गुरुदेव जेथे एकही मृत्यू झाला नाही असे एकही घर जगात नाही."

मग गौतम बुद्ध म्हणाले, "आता तुझ्या लक्षात आलेन असेल की तुझ्या एकटीवरच हे संकट आलेली नाही. जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी मृत्यू हा येणारच. अशा वेळी धैर्याने दुःख सहन केले पाहिजे".

त्या महिले ही गोष्ट पटली. प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. ती महिला शांत होऊन परत गेली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.

👇Sunday, September 18, 2022

शहीद सरदार भगतसिंग

 ⚜️शहीद सरदार भगतसिंग⚜️              भगतसिंग यांचा जन्म पंजाब मधील कल्याणपूर जिल्ह्यातील बंगा या गावी 28 सप्टेंबर 1907 साली झाला. वडिलांची शेती होती. वडील किशन सिंग हे क्रांतिकारी विचारांचा, ग्रंथांचा प्रसार करीत होते. त्यामुळे त्यांना मंडालेच्या तुरुंगात सजा भोकावे लागली होती.

             भगतसिंग यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बंगा येथे झाले. 1923 मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. मित्रांना घेऊन 'नवजवान भारत सभा' नावाची एक संस्था उभी केली. त्यांच्या मनात सदैव देशाच्या स्वातंत्र्याचा विचार सुरू असे.

            1919 साली महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्यांच्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजवर बहिष्कार घातला. 1922 साली महात्माजींनी आपली चळवळ मागे घेतली. त्यामुळे तरुणवर्गात नैराश्य पसरले. भगतसिंग यांना कळून आले की अहिंसेच्या मार्गाने इंग्रज लोक ऐकणार नाहीत. त्यासाठी शस्त्रे हातात घेऊन क्रांती केली पाहिजेक

              पुढील काही वर्ष ते जन्म माणसांचा विचार घेण्यासाठी देशात फिरले. लोकांची दुःखे पाहिली. इंग्रज लोक भारतीयांशी कसे वागतात याची त्यांना जाणीव झाली. शास्त्रे गोळा करण्यासाठी त्यांनी पैसे जमवले. 9 फेब्रुवारी 1925 च्या रात्री लखनऊ जवळच्या काकोरी स्टेशन मधून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक आगगाडी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन लुटली. त्यातील सर्व संपत्तीचा उपयोग शस्त्रे विकत घेण्यासाठी, बॉम्ब तयार करणे अदीकार्यासाठी करण्यात आला.

              3 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या राज्यसत्तेने सायमन कमिशन भारतात पाठवले. मुंबईत या कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला. गो बॅक सायमन अशा घोषणा देण्यात आल्या. काळी निशाणी दाखवण्यात आली. 1928 रोजी हे कमिशन पंजाबात लाहोर मध्ये आले. तेथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली.

                इंग्रज सरकारने देखील अतिशय संतापलेले होते. त्यांनी बेदम लाठीमार केला. लाला लजपतराय यांच्यावर काठीचा प्रहार करण्यात आला. त्यामुळे ती आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

              लाला लजपत राय यांच्या मृत्यूस डी एस पी सँण्डर्स जबाबदार आहे अशी भगतसिंगांची ठाम धारणा बनली. व कोणत्याही परिस्थितीत सँण्डर्सला मारायचेच अशी प्रतिज्ञा करून भगतसिंगांनी त्यांची त्याची पूर्तता केली.

             त्यानंतर 'डिस्प्युट बिल' व 'पब्लिक सेफ्टी बिल' हे दोन अन्यायी कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानापुढे आणण्यात आले. त्यावेळी प्रेक्षक गृहात कमी शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आला. ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके सर्वत्र भिरकावण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश सरकारला गोंधळून टाकले; त्यामुळे सरकार घाबरले.

               ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूला पकडले. त्यांच्यावर खटले भरून न्यायालयाच्या नियमाप्रमाणे लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली. त्यावेळी त्यांनी इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत हसत हसत फाशीचा स्वीकार केला हा दिवस भारतात 'शहीद दिन' म्हणून साजरा केला जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

🎗️ महत्त्वाचे मुद्दे 🎗️

⚜️ भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी बंगा या गावी झाला ( सध्या पाकिस्तानात आहे)

⚜️ वडिलांचे नाव ~ किशन सिंग व आईचे नाव ~ विद्यावती

⚜️ भगतसिंग यांचे कुटुंब आर्य समाजाच्या विचारांवर चालणारे होते.

⚜️ जालियनवाला बाग हत्याकांड 1919 ने त्यांच्या मनावर व विचारांवर सखोल परिणाम झाला.

⚜️ 1923 मध्ये त्यांचे इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण केले.

⚜️ भारताच्या स्वातंत्र्यासाठी 1925 मध्ये त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील शिक्षण सोडून 'नवजवान भारत सभा' ही संस्था स्थापन केली

⚜️ काकोरी कटातील रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह 4 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे उद्विग्न होऊन ते चंद्रशेखर आजाद यांच्या 'हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन' या संस्थेबरोबर जोडले गेले. या संस्थेचे नवीन नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे 1928 मध्ये केले गेले.

⚜️ सायमन कमिशनला शांततेने विरोध करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास ठार करण्यासाठी भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू यांनी योजना आखली व अमलात आणली. या योजनेत सँन्डर्स तत्कालीन लाहोर पोलीस उपअधीक्षक 17 डिसेंबर 1928 ला ठार झाला.

⚜️ भगतसिंग यानंतर कलकत्ता येथे गेले असता त्यांची क्रांतिकारी जतींद्रनाथ दास यांच्याशी ओळख झाली. जतींद्रनाथ दास व भगतसिंग यांनी आग्रा येथे बॉम्ब बनवण्याचा कारखाना काढला.

⚜️ कामगारांच्या हक्कावर बाधा आणणारे 'ट्रेड डिस्प्युट बिल' व देशभक्तांचा आवाज दडपणारे 'पब्लिक सेफ्टी बिल' ही दोन विधायके केंद्रीय कायदेमंडळात ब्रिटिश सरकार मांडणार होते. त्यांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात 8 एप्रिल 1929 ला बॉम्बस्फोट केला व पत्रके टाकली. यावेळी त्यांनी भारत माता की जय व इन्कलाब जिंदाबाद या घोषणा दिल्या. स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले.

⚜️ त्यांना अटक केली गेली व कारागृहात डांबले गेले. कारागृहात भगतसिंग व सहकाऱ्यांनी 64 दिवस उपोषण केले. यात जतिंद्रनाथ दास यांनी प्राणत्याग केला.

⚜️ कारागृहात भगतसिंग यांनी ' नास्तिक क्यो हूँ ' चे लिखाण केले.

⚜️ सँडर्स खुणात दोषी ठरवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली.

⚜️ 23 मार्च 1931 ला या महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत हसत हसत ते तिन्ही भारत मातेचे सुपुत्र फसावर गेले व शहीद झाले. हा दिवस 'शहीद दिन' म्हणून पाळला जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

क्रांतिकारक भगतसिंग यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.

👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
क्रांतिकारक राजगुरू यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा.
👇