माकडाची फजिती
एका जंगलामध्ये काही सुतार लाकूडतोडण्याचे काम करत होते. ते एक मोठा ओंडका कापत होते. थोड्यावेळाने दुपार झाली. ओंडका अर्धा कापून झाला होता. त्या ओंडक्यात त्यांनी पाचर ठोकली आणि ते जेवायला गेले.
थोड्या वेळानंतर तेथे काही माकडे आली. इकडे तिकडे उड्या मारू लागली. एक माकड त्या ओंडक्यावर बसले आणि पाचरेशी खेळू लागले. हळूहळू पाचर सैल होत गेली. माकडाने ती पाचर पटकन काढली. त्याचबरोबर त्याची शेपटी त्या ओंडक्याच्या फटीत अडकली. माकड मोठमोठ्याने ओरडू लागले.
सुतारांनी माकडाचा आवाज ऐकला. आणि ते आवाजाच्या दिशेने धावत सुटले. पाहिलं तर माकडाची शेपटी त्या ओंडक्यामध्ये अडकली होती. सुतारांनी पुन्हा पाचर त्या ओंडक्याला ठोकली आणि हळूच माकडाची शेपटी बाहेर काढली. माकड ओरडत झाडावर पळून गेले. पण सुतार मात्र खो-खो हसू लागले.
⚜️ तात्पर्य ⚜️
ज्या वस्तूची आपल्याला माहिती नसते, तिच्याशी खेळू नये; नाहीतर फजिती होते.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment