SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, September 6, 2022

कर्मवीर भाऊराव पाटील

   ⚜️ कर्मवीर भाऊराव पाटील ⚜️




भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या खेड्यात 22 सप्टेंबर 1887 साली झाला. त्यांच्या वडिलांचे पायगौंडा आणि आईचे नाव गंगुबाई. सांगली जिल्ह्यातील ऐडवडे बुद्रुक येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरास आले. सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता; पण त्यावेळी सातव्या एडवर्थच्या पुतळ्याच्या तोंडास कोणीतरी काळे फसले. त्याचा खोटा आरोप भाऊराव पाटील यांच्यावर आला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. शिक्षा संपल्यानंतर ते तुरुंगातून सुटले आणि त्यांनी कोल्हापूर सोडले.

1914 ते 1922 या काळात ओगलेच्या काचेच्या कारखान्यात विक्रेते म्हणून काम केले. तसेच ते किर्लोस्कर नांगराचे विक्रेते म्हणून काम पाहत होते. या विक्रीसाठी त्यांना महाराष्ट्रात सर्वत्र फिरावे लागले. महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी भ्रमंती केली. त्यामुळे बहुजन समाजाची मानसिकता त्यांना कळली. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत आणि अज्ञानाने त्रासलेले लोक त्यांनी जाणले. अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून समाजाला मुक्त करण्यासाठी समाजाला शिक्षण दिले पाहिजे हे त्यांनी ओळखले. त्यांच्या मनावर महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा होता. समाजातील अज्ञानी माणसांबद्दल त्यांच्या मनात करुणा होती.

सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक आश्रम काढला. त्यानंतर काले या गावी 1929 मध्ये पहिले वस्तीगृह काढले. महात्मा गांधींनी या वस्तीगृहाला भेट दिली. महात्मा गांधींनी त्यांची स्तुती केली परंतु काही करमट लोकांनी सर्व धर्मांच्या जातींच्या लोकांना एकच वस्तीगृह काढल्यामुळे टीका केली. भाऊराव पाटील यांना आपले कार्य मोठ्या प्रमाणात करायचे होते. त्यामुळे कोणत्याही टीकेला महत्त्व दिले नाही. मुला-मुलींना शालेय शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय केली.

छोट्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील मुलांच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले. तुमच्या मुलामुलींना मोफत शिक्षण दिले जाईल म्हणून सांगितले. त्यामुळे अनेक आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींना भाऊसाहेबांच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवले. त्यांनी अनेक हुशार मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठविले.

भाऊसाहेबांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पतीला पूर्ण सहकार्य केले. एकदा पैसे कमी पडले म्हणून लक्ष्मीबाईंनी गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून दिले. त्यामुळे लोकांच्या शिक्षणाची सोय झाली. दोघा पती-पत्नीला मुलांच्या शिक्षणाचा ध्यास लागला होता. एकापाठोपाठ एक शाळा निर्माण होऊ लागल्या आणि खेड्यापाड्यातील समाज जागृत झाला. शिक्षणाचे महत्त्व सर्वांना पटू लागले. अंधश्रद्धा दूर होऊ लागल्या. मानसे व्यसनापासून दूर झाली. धार्मिक सलोखा वाढू लागला. "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" ही भावना वाढीस लागली. शिक्षणाचे महत्व भाऊरावांनी सर्व जनतेपर्यंत पोहोचवले.

हे कार्य करत असताना भाऊरावांना अतिशय कष्ट सोसावे लागले. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. प्राथमिक, माध्यमिक शाळा काढल्या. महाविद्यालयीन व अध्यापन विद्यापीठांची संख्या वाढू लागली. ते असताना 400 शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या. बहुजन समाजामध्ये त्यांनी केलेली ही एक मोठी क्रांतीच होय. लोकांनी त्यांना "कर्मवीर" अशी पदवी दिली. आज विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या शाळेतील विद्यार्थी चमकत आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये मोलाची भर घालत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शिक्षणाचे महत्व लोकांना समजावून सांगितले. महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करण्याचे भाऊराव पाटील यांचे हे कार्य केले ते वंदनीय असेच केले. त्यांचा मृत्यू हा 9 मे 1959 रोजी झाला. कर्मवीर पाटलांचा जन्मदिन हा 'श्रमप्रतिष्ठा दिन' म्हणून साजरा करतात.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️ कर्मवीर भाऊराव पाटील ~ महत्त्वाचे मुद्दे ⚜️ 


⚜️ नाव भाऊराव पायगौंडा पाटील

⚜️ जन्म ~ 22 सप्टेंबर 1887 ला कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज येथे झाला.

⚜️ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवातीच्या कालखंडात ओगले ग्लास वर्क, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीचे फिरते विक्रेते म्हणूनही कार्य केले व महाराष्ट्रभर भ्रमंती केली. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा यांची जाणीव झाली. यावर त्यांच्या मते एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण.

⚜️ 1910 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केली. चा संस्थेमार्फत दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह सुरू केले. पुढे नेरले, काले येथेही वस्तीग्रह सुरू केली.

⚜️ त्यांचा जन्मदिन 'श्रमप्रतिष्ठा दिन' म्हणून साजरा करतात.

⚜️ 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले, तालुका कराड येथे केली.

⚜️ 1924 मध्ये छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले.

⚜️ प्राथमिक शिक्षकांना शिक्षण देण्यासाठी 1935 मध्ये सिल्वर ज्युबली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केली.

⚜️ सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा 1940 मध्ये सुरू केली.

⚜️ रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज पहिले महाविद्यालय 1947 मध्ये सुरू केले.

⚜️ त्यांची शिक्षण संकल्पना ~ स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुसूत्री होती.

⚜️ 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. त्यांना आधुनिक भगीरथ म्हणतात. वटवृक्ष हे बोधचिन्ह आहे.

⚜️ विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली.

⚜️ कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. त्यांच्यावर महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांचा प्रभाव होता.

⚜️ 1954 साली सातारा येथे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज स्थापन केले

⚜️ 1955 साली सातारा येथे पदवीधर शिक्षकांसाठी आझाद कॉलेज स्थापन केले

⚜️ त्यांना संत गाडगेबाबा यांनी कर्मवीर ही पदवी दिली.

⚜️ पुणे विद्यापीठाने 19 59 साली डी.लिट. पदवी दिली. याच वर्षी भारत सरकारने ' पद्मभूषण ' पुरस्काराने गौरवले.

⚜️ महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार "भाऊराव का कार्यही ऊनका सच्चा कीर्तीस्तंभ है|"

⚜️ तुम्ही मला पडीक जमीन द्या मी ती सुपीक करून दाखवतो हे त्यांचे उद्गार.

⚜️ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे 9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले.


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा.

👇

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.

👇




No comments:

Post a Comment