SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, December 27, 2022

बदली अपडेट

 बदली अपडेट

विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पसंती क्रम कसे भरावे सविस्तर माहिती. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले निबंध हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


Monday, December 26, 2022

सावित्रीबाई फुले यांची माहिती

 ⚜️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ⚜️                            महाराष्ट्राचे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सावित्रीबाई फुले या पत्नी त्यांनी आयुष्यभर हाला अपेष्ठा सहन केल्या. ज्योतिरावांच्या महान कार्यास साथ दिली. सावित्रीबाई सातारा जिल्ह्यातील नायगावच्या. त्या खंडूजी नेवासे पाटील यांच्या कन्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचे लग्न वयाच्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाले.

              महात्मा जोतिबा फुले यांच्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचे नावही आदराने घेतले जाते. कारण स्त्री-शिक्षणाच्या त्या आद्य क्रांतिकारक होत्या. पुण्यात स्त्री- शिक्षणाची सोय नव्हती. तेव्हा जोतिबांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिकाही मिळत नसत. तेव्हां जोतिरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला व वाचायला शिकविले व तिची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

                सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य झाले नाही, पण सर्व दीनदलितांना व अनाथांना जवळ करून त्यांच्यावर सावित्रीबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले व त्यांना अनेक दुःखांपासून मुक्त करण्यासाठी, स्वतःच्या रक्ताचा थेंब व क्षण वेचला. सावित्रीबाईंनी आपल्याला मूल न झाल्यामुळे जोतिबांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला, पण जोतिबांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण त्यांचे पत्नीवर अढळ प्रेम होते. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून एका थोर समाजसुधारकाची जीवनसहचरी म्हणून, धैर्याने वागून जोतिबांचे जीवन धन्य करण्यास त्यांना सर्वतोपरी साह्य केले. सावित्रीबाईंना उत्तम शिक्षण मिळाले. जोतिबा फुले व सावित्रीबाईंचे शिक्षणाचे हे पवित्र कार्य चालू असताना, त्यांच्या पवित्र कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतिबांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल. ४२ पिढ्या नरकात जातील. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतिबाही स्त्री-शिक्षण चळवळीचे नेते होते.

               त्यांच्या मुलींच्या शाळेत, मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यामध्ये त्या काळात हे कार्य म्हणजे एक चर्चेचा विषय झाला होता. पण आपल्या कार्यामुळे जोतिबा व सावित्रीबाईंनी एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता. सावित्रीबाईंजवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. संत चोखामेळा मंदिरात सावित्रीबाईंनी महार-मांग, कुणबी इ. लोकांच्या मुलींसाठी शाळा काढली. त्यांच्या सेवावृत्तीने केलेल्या कामाचा गौरव इंग्रज सरकारने पुण्याला विश्रामबागवाड्यात केला. स्त्री-शिक्षिकेचा हा पहिला गौरव होता. असा मान आतापर्यंत कोणालाही मिळाला नव्हता.

                सावित्रीबाईंनी जे विचार मांडले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले. शाळेमध्ये सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्यावर त्या पवित्र ध्येयाने अध्यापनाचे काम करीत. सावित्रीबाईंचा मानसिक छळ नातेवाईकांनी, समाजाने व सनातन्यांनी केला. तसाच शारीरिक छळ करण्याचा विचारही काहींनी केला.

               रस्त्यातून जात असताना एखादी कर्मठ बाई शिव शिव करीत, तिच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारी. त्या शेणाची घाण, सावित्रीबाई न रागावता स्वच्छ करीत. थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी भगिनी झाडलेला कचरा माडीवरून त्यांच्यावर अंगावर पडेल, अशा बेताने टाकीत. तेव्हा हसून सावित्रीबाई म्हणत, 'बरे झाले बाई, तुम्ही ही फुले टाकलीत, ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला, ही फुलेच मला माझ्या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी उत्तेजन देतील" आणि ती भरभर शाळेकडे निघून जाई. एकदा शाळेकडे जाताना, चौकात चार-पाच गुंड मुले बसली होती. सावित्रीबाई तिथे आल्यावर त्यांच्यापैकी एक जण पुढे येऊन म्हणाला, "मुलींना आणि महार-मांगांना शिकविणे तू बंद कर, नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही.” हे शब्द ऐकताच त्या गुंडाला तिने ताड ताड अशा तीन मुस्कटीत ठेवून दिल्या. तो गुंड मुलगा गाल चोळतच राहिला. अशा संकटांना तोंड देण्यास सावित्रीबाई समर्थ होत्या, तरी जोतिरावांनी एक पट्टेवाला त्यांच्यासोबत दिला. जोतिरावांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च ते पदरमोड करून करीत असत.

                  दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना, त्यांनी "इतक्या थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे त्या चालकांना भूषणावह आहे" असा शेरा दिला होता.

              त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्रीने संन्यासिनीसारखे जीवन जगावे, अशी रूढी होती. तिला अपशकुनी समजले जाई. तिला पांढरे वस्र परिधान करून घरातच कोंडून ठेवले जाई. सावित्रीबाईंनी सियांचे हे दु:ख जवळून पाहिले. केशवपनाची दुष्ट रूढी नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी ठरविले. परंतु लोक ऐकेनात. तेव्हा जोतिबा आणि सावित्रीबाईंनी सर्व न्हाव्यांची एक सभा बोलाविली आणि आपण आपल्या भगिनीवर वस्तरा चालवितो, हे केवढे पाप आहे,याची जाणीव त्यांना करून दिली व त्यांना केशवपनास जाऊ नका असे सांगितले. न्हाव्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी संप पुकारला. खूप गाजला.

            सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह २८ जानेवारी १८५३ ला सुरू केले, बालविधवांचे दुःख त्यांनी जाणले. भ्रूणहत्येचा प्रकार रोजच घडत आहे, असे त्यांनी पाहिले. विधवांसाठी सुरक्षितपणे बाळंतपणे व्हावीत, म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. सावित्रीबाई शेकडो विधवांच्या माता झाल्या.

               अस्पृश्यांसाठी जोतिबांनी पाण्याचे हौद खुले केले. त्यात सावित्रीबाईंचा वाटा फार मोठा होता. इ. स. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले.

             सावित्रीबाईचा पहिला काव्यसंग्रह १८५० साली तर दुसरा काव्यसंग्रह १८९० साली प्रसिद्ध झाला. १० मार्च १८९७ साली पुण्याला प्लेगची साथ आली. सावित्रीबाईंनाही प्लेगने घेरले आणि त्या क्रांतिकारक स्त्रीने जगाचा निरोप घेतला. स्त्री ही मानव आहे आणि ती पुरुषांइतकेच काम करू शकते, हे त्यांनी स्वत:च्या कृतीने सिद्ध करून दाखविले.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले निबंध हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


सराव चाचणी बुद्धिमत्ता 4 इयत्ता 3 री व 4 थी

 

Sunday, December 25, 2022

निबंध~ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

⚜️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले⚜️


                 एकोणविसाव्या शतकाच्या माध्यार्धात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल '  एवढेच स्थान होते, स्त्रीला  समाजात कोणताही दर्जा नव्हता, अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. 

                  सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी महात्मा फुले यांच्याशी झाला.

                  पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ.सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने, जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

                सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.  सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. 

             जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया  नरकात जातील असे त्यांचे समज होते. 

                पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाहीत.त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.

                संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. 

                  अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक  छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ तसेच त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण  त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखीच वाटत.

                     ही सर्व कृत्य त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे.  एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत  राहणार नाही" अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.

                 सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.  दादोबा  पांडुरंग तर्खडकर हे सरकारी- देशी शाळांचे परिवेक्षक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. 

                त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती.  स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे. हे स्त्रियांचे दु:ख त्यांनी जवळून पाहिले होते.

                  केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली.  आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला.

                 सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दु:ख त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले.  अस्पृश्यांसाठी जोतिबांनी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. 

                इ.सन १८९३ साली सत्यशोधक  समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. 

         १० मार्च १८९७ रोजी पुण्यात प्लेगची साथ आली होती. दुर्दैवाने त्यांना प्लेगने घेरले आणि त्यातच या क्रांतिकारक  महिलेने जगाचा निरोप घेतला. अशा या थोर महिलेस माझे कोटी कोटी प्रणाम .

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सावित्रीबाई फुले यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲

 

Saturday, December 24, 2022

निबंध नाताळ

 🌲🎅 नाताळ 🎅🌲              नाताळ हा ख्रिश्चन धर्मीय लोकांचा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी येतो. ह्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव मेरी असे होते. त्याचा जन्म बेथलहेम येथे झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा आकाशातून एक तेजस्वी तारा तुटला. त्या वेळेस तीन शहाण्या माणसांना साक्षात्कार झाला की देवाचा पुत्र जन्माला आलेला आहे.

येशूला लोक ज्यूंचा राजा मानत होते म्हणून रोमनांनी आणि ज्यू पुजा-यांनी येशूला क्रुसावर चढवले.

नाताळ हा सण युरोप, अमेरिका आणि जगात जिथेजिथे ख्रिश्चनधर्मीय आहेत तिथेतिथे साजरा केला जातो. ह्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. ह्या दिवशी लहान मुले खूप खुशीत असतात. ती रात्री झोपी जातात तेव्हा सांताक्लॉज हा पांढ-या दाढीचा जादूचा म्हातारा माणूस येतो आणि त्यांना चॉकलेट, खाऊ आणि खेळणी ठेवून जातो. खरे सांगायचे तर त्यांचे आईबाबाच त्या वस्तू ठेवत असतात पण हे मुलांना न कळल्यामुळे त्यांना वाटते की सांताक्लॉजनेच ह्या वस्तू ठेवल्या आहेत....

     या सणाला ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जातात तिथे येशूंची गाणी म्हणतात एकमेकांना शुभेच्छा देतात भेटवस्तू आणि मिठाई देतात नाताळच्या दिवशी सर्वजण आपले घर सजवतात दिवाळी सारखाच ख्रिस्ती बांधव हा नाताळ सण साजरा करतात

        असा हा सण फारच उत्साहाने सर्वत्र साजरा होतो.

🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
Thursday, December 22, 2022

बोधकथा

 

⚜️ सिंहाचा सल्ला ⚜️    

                       गाढव वाघाला बोलतो गवत निळ असतं. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरवं असतं. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे निवाडा मागण्यासाठी सिंहाकडे जातात. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांसमोर सिंहाला बोलतो कि गवत निळ असतं आणि हा वाघ बोलतो कि हिरवं असतं आता तुम्ही सांगा कि खरं काय आणि खोटं काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांसमोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत निळ असतं. आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जाते. 

            सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरवं असतं तरीही का मला शिक्षा केली. सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.


              ❝ तात्पर्य ❞ 

   मूर्ख माणसाच्या नादी लागून आपला वेळ व पैसा वाया घालवू नये.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 

सराव चाचणी इंग्रजी 5 इयत्ता 3 री व 4 थी

 

Wednesday, December 21, 2022

सराव चाचणी इंग्रजी 4 इयत्ता 3 री व 4 थी

 

साने गुरुजी यांची माहिती मराठी

 ⚜️ साने गुरुजी ⚜️          महाराष्ट्रातील तळमळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती; तरीही अत्यंत कष्ट करून, माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले.

            घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. पालगड, दापोली व औंध येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१८ मध्ये ते मॅट्रिक झाले. नंतर ते पुण्यात येऊन बी.ए. झाले. १९२४ मध्ये अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात काम करत ते एम.ए. झाले. त्यानंतर ते अंमळनेरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. तेथील वसतिगृहाचे ते काम करत असत. वसतिगृहातील मुलांची ते अतिशय काळजी घेत. मातेच्या ममतेने ते त्यांची देखभाल करत होते. गरिबी त्यांनी स्वत: अनुभवलेली होती आणि मुलांबद्दल करुणाभाव होता. विद्यार्थीही त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असत.

          १९३० मध्ये महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्या वेळी गुरुर्जीनी आपली नोकरी सोडून चळवळीत उडी घेतली. त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागली व त्यांनी ती आनंदाने भोगली. धुळ्याच्या तुरुंगात त्यांना विनोबा भावे यांचा सहवास लाभला. विनोबा भावे गीतेवर प्रवचने देत होते. ती प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली. ती प्रवचने 'गीता प्रवचने' नावाने पुढे प्रसिद्ध झाली. या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. गुरुजींनी रवींद्रनाथ टागोर, पं. जवाहरलाल नेहरू यांची चरित्रे लिहिली.

             भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे गुरुजींना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. नाशिक येथे ते शिक्षा भोगत होते. तुरुंगात असताना त्यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले.

             आचार्य अत्रे यांनी श्यामची आई यावर एक चित्रपट निर्माण केला. या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले. साने गुरुजींनी गावोगावी फिरून स्त्रियांच्या ओव्यांचे संकलन केले आणि 'पत्री' या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध केले. दहा भागांमध्ये मुलांसाठी 'गोड गोड गोष्टी' ही पुस्तके लिहिली. त्यामुळे मुलांचे ते अतिशय आवडते झाले. 'भारतीय संस्कृती' हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' तसेच 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' अशी सुंदर गीते लिहिली. त्यांनी जवळ जवळ ८० पुस्तके लिहिली.

               १९३८ साली स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक काढले. १९४२ साली 'भारत छोडो' या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य लाभले. समाजात ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी 'आंतरभारती'मार्फत हे कार्य चालू केले.

             साने गुरुजी पंढरपूरला आले त्यावेळी पंढरपूरच्या मंदिरात जाण्यास अस्पृश्यांना बंदी होती. साने गुरुजी तेथेच आमरण उपोषणास बसले. अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव अस्पृश्य कसा होऊ शकेल हे साने गुरुजी लोकांना १११ भारतीय महामानव / १०९ पटवून देत होते. उलट देवाच्या स्पर्शाने सर्वजण परमपवित्र बनतात असे ते सांगत. एकीकडे आपण देव सर्वत्र सम प्रमाणात भरला आहे, असा वेदांतील विचार सर्वांना सांगतो आणि दुसरीकडे भेदाभेद करतो हे साने गुरुजींना मान्य नव्हते. त्यांच्या उपोषणामुळे पांडुरंगाचे मंदिर सर्वांना खुले झाले आणि हरिनामाच्या जयघोषात सर्वांना पांडुरंगाचे दर्शन मिळू लागले. 'पांडुरंग' या व्यक्तीने पांडुरंगाचे मंदिर खुले केले. कारण त्यांच्यातील 'पांडुरंग' जागा झाला होता.

               साने गुरुजींनी काँग्रेस पक्ष सोडला व ते समाजवादी पक्षात गेले. त्यांनी 'साधना' नावाचे साप्ताहिक काढले. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती ज्या प्रमाणात व्हावी असे त्यांना वाटत होते, त्या प्रमाणात ती झाली नाही; त्यांनी भारतमातेची सेवा करता करताच तिच्या चरणी जीवन अर्पण केले.

          अशा या थोर साहित्यिकाचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे 

⚜️ जन्म- 24 डिसेंबर 1899 कोकणात पालगड जि. रत्नागिरी येथे झाला. 

⚜️ नाव- पाडुरंग सदाशिव साने.

⚜️ अंमळमेर येथे प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना तेथील विद्यार्थ्यांनी गुरुजी ही पदवी बहाल केली. आचार्य विनोबा भावेंनी साने गुरुजींचा अमृतपुत्र पुत्र असा गौरव केला

⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनात साने गुरुजींनी भाग घेतला. स्वातंत्र्याची शपथ घेऊन शिक्षकांसमोर भाषण दिले.

⚜️ 1930 ला धुळे तुरुंगात असताना ते आपल्या सहकारी राजबंदयांचा अभ्यासवर्ग घेत. त्यामुळे त्यांना गुरुजी संबोधले जाई. याच तुरुंगात विनोबा भावे यांनी अठरा प्रवचने दिलीत. ती सर्व साने गुरुजींनी लिहून काढली. त्यामुळे विनोबाजींचा गीता प्रवचने हा ग्रंथ तयार झाला.

⚜️ साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. 1932 ला नाशिक तुरुंगात असताना श्यामची आई ही अविस्मरणीय कादंबरी त्यांनी लिहिली.

⚜️ 1936 ला फैजपूर येथे खानदेशात काँग्रेस अधिवेशन झाले. ते यशस्वी करण्यासाठी साने गुरुजींनी श्री धनाजी नाना चौधरी यांच्या सोबत हजारो तरुणांना स्वयंसेवक म्हणून तयार केले.

⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग याबद्दल तुरुंगवासही झाला.

⚜️ 1945 मध्ये त्यांची सुटका झाली.

⚜️ 1946 मध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे यासाठी उपोषण केले. मंदिर सर्वांसाठी खुले झाले.

⚜️ राष्ट्रसेवादल, आंतरभारती अशा संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या श्यामच्या आई या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. तो राष्ट्रपतीद्वारे दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळाचा/पुरस्काराच मानकरी ठरला.

⚜️ पं. नेहरूंच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग यांच्या वुड्थ नो रिग्रेट्स या आत्मचरित्राचे मराठीत ना खंत ना खेद असे भाषांतर केले.

⚜️ 1928 मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासीक सुरु केले. 1938 मध्ये काँग्रेस या नावाचे साप्ताहीक सुरु केले.

⚜️ 1948 मध्ये साधना हे साप्ताहीक सुरु केले. गांधी हत्येनंतर 21 दिवसांचे निर्जल उपोषण केले.

⚜️ आचार्य अत्रेंनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार मृत्यृचे चुंबन घेणारा महाकवी.

⚜️ त्यांची ग्रंथसंपदा - श्यामची आई भारतीय संस्कृती, क्रांती, समाजधर्म स्त्री जीवन, पत्री, गीताहृदय, गोड गोष्टी आपण सारे भाऊ, आस्तिक, धडपडणारी मुले, सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, ना खंत ना खेद इत्यादी

⚜️ 11 जून 1950 ला साने गुरुजींनी आपणहून या जगाचा निरोप घेतला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञानावरील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


सराव चाचणी गणित 6 इयत्ता 3 री व 4 थी

 

Tuesday, December 20, 2022

विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांनी पसंती क्रम कसे

 बदली अपडेट

विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांनी पसंती क्रम कसे भरावे?

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करासराव चाचणी गणित 5 इयत्ता 3 री व 4 थी

 

Thursday, December 8, 2022

सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी

 ⚜️ सरदार वल्लभभाई पटेल ⚜️               सरदार वल्लभभाई पटेल यांची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत.

                सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे  31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. वडिलांचे नाव जव्हेरभाई. त्यांचे कुटुंब गरीब शेतकरी होते. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टाने त्यांनी शिक्षणास सुरुवात केली. १८९७ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. बालपणापासून ते करारी व अन्यायाची चीड असणारे पोलादी पुरुष होते. शाळेतील एक गुरुजी विद्यार्थ्यांना अतिशय मारत होते. अशा वेळी वल्लभभाईंनी विद्यार्थ्यांना संघटित करून तीन दिवस संप करून गुरुजींना नम्रतेने वागायला शिकवले. अतिशय मेहनत करून उधार-उसनवार करून ते इंग्लंडला गेले आणि १९१३ साली बॅरिस्टर होऊन ते भारतात आले. अहमदाबादला काही दिवस त्यांनी वकिली केली. वकिली व्यवसायात त्यांना भरपूर पैसे मिळाले.

              गांधीजींच्या देशसेवा कार्याने अतिशय प्रभावित झाले आणि आपला वकिली व्यवसाय त्यांनी सोडून दिला. गांधीजींच्या सान्निध्यात राहून त्यांनी देशसेवा करण्याचा निश्चय केला. असहकाराच्या चळवळी मध्ये भाग घेतला असताना त्यांना अनेक वेळेला कारावास भोगावा लागला.

                अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी अहमदाबाद शहरात अनेक सुधारणा केल्या. गुजराथ विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. १९२७ साली गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली व सर्वत्र पाणी पसरले. त्यावेळी वल्लभभाईनी सर्वांना सहकार्य केले. कपडे, धान्य आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करून पूरग्रस्तांना दिल्या.

                 बार्डोलीच्या शेतकऱ्यांचा सत्याग्रह हा वल्लभभाईंच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. १९२८ मध्ये गुजराथेतील बार्डोली नावाच्या भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा सरकारने कारण नसताना वाढविला. शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली; पण सरकारने ऐकले नाही. वल्लभभाईंनी शेतकऱ्यांची संघटना करून सारा द्यायचा नाही, असे सांगितले. शेतकऱ्यांनी सारा दिला नाही. इंग्रजांनी खूप त्रास दिला; परंतु शेतकऱ्यांनी ऐकले नाही व सारा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सरकारला नमते घ्यावे लागले. त्यांनी आपला हुकूम मागे घेतला.

                   १९३१ साली कराची येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९४२ साली 'भारत छोडो' चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. त्या वेळी देशात लहानमोठी ५२६ संस्थाने होती. ब्रिटिशांनी त्या संस्थानांना सार्वभौम अधिकार दिले होते. त्यामुळे संस्थाने स्वतःला स्वतंत्र समजत होती. स्वतंत्र भारतातील ५२६ संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. याचे खरे श्रेय वल्लभभाई पटेल यांना आहे. ते भारताचे पोलादी पुरुष होते.

                 सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार वल्लभभाई पटेल यांनी केला. तसेच हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. ते गृहमंत्री असताना गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला अतिशय लागली आणि त्यामुळे ते आजारी पडले. भारतमातेची सेवा करता करता त्यांनी आपला देह ठेवला.

            अशा या महामानवाचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झाला

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे

⚜️ जन्म 31 ऑक्टोंबर 1875 ला खेडा जिल्हा, गुजरात राज्यात.

⚜️ 1917 ला खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व करुन साराबंदी घडवून आणली. 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला. वकिली सोडली.

⚜️ 1928 ला बार्डोली साराबंदी सत्याग्रह केला.

⚜️ 1928 च्या बार्डोली सत्याग्रहामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना सरदार हा बहुमान दिला.

⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग

⚜️ भारताचे पोलादीपुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते. भारत छोडो आंदोलनामध्ये ते सहभागी होते. यासाठी कारावास. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते.

⚜️ सुमारे 600 संस्थानांचे विलीनीकरण केले. भारताचे एक महत्वाचे राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांचे भारतीय राजकारणात महत्वाचे योगदान आहे. 

⚜️ त्यांना भारतीय बिस्मार्क असे म्हणतात.

⚜️ त्यांचा मृत्यु 15 डिसेंबर 1950 मध्ये झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महामानवांचा जीवन परिचय वाचण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️Friday, December 2, 2022

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आपणास निबंध तसेच भाषणासाठी उपयुक्त ठरेल

हिंदू म्हणून जन्माला आलो,

 पण हिंदू म्हणून मरणार नाही, 

              अशी घोषणा करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. वडिलांनी त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला पाठविले. एल्फिन्स्टन हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केले, पुढे त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील एम. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते भारतात आले. बडोदा सरकारने दिलेल्या नोकरीवर काम करू लागले. अस्पृश्य म्हणून तेथे त्यांचा अपमान होऊ लागल्याने, त्यांनी ती नोकरी सोडून दिली. मुंबईत येऊन त्यांनी सीडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.

                आपण उच्च शिक्षण घेऊनसुद्धा लोक आपल्याशी असे वागतात, तर मग खेड्यातील गरीब अस्पृश्य जनतेचे काय होत असेल याची त्यांना जाणीव झाली. त्यांचे मन अतिशय दुःखीकष्टी झाले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'मूकनायक' नावाचे एक मराठी पाक्षिक सुरू केले. त्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करू लागले. त्यांनी दलित बांधवांना 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' असा दिव्य संदेश दिला.

                   पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले, आणि अर्थशास्त्रातील बी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. अत्यंत आपुलकीने ते मुलांना शिकवीत होते. पुढे ते त्याच कॉलेजचे प्राचार्य झाले.

                डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृशांना खुले केले. महाडच्या चवदार तळ्यासाठी अस्पृश्य बांधवांना एकत्र करून तळ्यातील पाण्याला स्पर्श केला आणि सर्वांना खुले केले.

             गोलमेज परिषदेला ते लंडन येथे गेले आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. म. गांधींना हा विचार पटला नाही. अस्पृश्य समाज हिंदू समाजातून वेगळा पडू नये म्हणून म. गांधींनी पुण्यात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रहिताचा विचार करून आंबेडकर यांनी गांधीजींशी तडजोड केली. या तडजोडीला 'पुणे करार' संबोधले जाते.

                  १९४२ साली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री झाले. म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अस्पृश्यांसाठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. तसेच औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालय सुरू केले. १९४६ साली त्यांना घटना समितीत घेण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि कायदामंत्रीपद देण्यात आले. भारतीय घटनेचे ते महान शिल्पकार होत.

          अस्पृश्यांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिल्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करावा, असे सारखे त्यांना वाटत असे. शेवटी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याच्या शुभदिनी नागपूर येथे आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली, बुद्ध धर्मामध्ये स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही, हे पाहून आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

              आपल्या विचारांतून डॉ. आंबेडकरांनी दलितांचा उद्धार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 'शूद्र कोण होते ?' 'पाकिस्तानवर विचार,' 'रिडल्म इन् हिंदूझम्,' 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' असे अनेक इंग्रजी वैचारिक ग्रंथ लिहिले. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करीत करीत ते बौद्धवासी झाले. मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 1 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 2 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.