SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, October 18, 2022

निबंध - डॉ बाबासाहेब आंबेडकर

⚜️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚜️



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशात झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार म्हणून काम करीत असत. आंबेडकर हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे आपत्य होते.

              सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांचे वडील सातारा येथे राहण्यास आले. आंबेडकर हे जातीने महार म्हणजे अस्पृश्य होते. त्यामुळे त्यांना जातपात या विषयावरून खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणी त्यांना शाळेत शिकण्यासाठी वेगळे बसावे लागे.

           परंतु ते बुद्धीने खूप हुशार होते. त्यामुळे ते कष्टांना अजिबात न डगमगता इंग्लंड येथे जाऊन शिकले. तिथे उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर आंबेडकरांनी दलितांसाठी चळवळ उभारली. दलितांसाठी आणि मागास जातीच्या लोकांसाठी वेगळा मतदार संघ हवा आणि आरक्षण हवे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

            स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याचे काम नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवले. त्यांनी खूप अभ्यास करून भारताची राज्यघटना निर्माण केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

         हिंदू धर्मातील जाचक रूढींना कंटाळून आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवले. असे ते महामानव होते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टच करा.




🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खालील बटनाला टच करा.




No comments:

Post a Comment