SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, January 30, 2024

मंथन 2022 उत्तर सूची

 मंथन परीक्षा 2022


मंथन परीक्षा इयत्ता पहिली ते चौथीचे उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Tuesday, January 23, 2024

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती

 ⚜️ नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती ⚜️


⚜️ नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भाषण व निबंधासाठी उपयुक्त माहिती ⚜️

सुभाषचंद्र बोस यांचे मूळचे घराणे बंगालमधील; परंतु त्यांचे वडील वकिली करण्यासाठी ओरिसातील कटक या गावी सहकुटुंब रहात होते. कटक गावी सुभाषबाबूंचा जन्म 27 जानेवारी 1897 रोजी झाला. वडिलांचे नाव जानकीनाथ व प्रभावती हे त्यांच्या आईचे नाव माता प्रभावतीदेवींनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. सद्गुरूंच्या शोधार्थ ते हिमालयात हिंडले; परंतु त्यांना सद्गुरू न भेटल्याने ते परत आले.

तो ब्रिटिश साम्राज्याचा काळ होता. ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाच्या बातम्या ऐकून सुभाषबाबूंचे हृदय वेदनांनी हेलावून जात होते. १९१३ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे बी.ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कॉलेजच्या यू.टी.सी. पथकामध्ये प्रवेश करून सैनिकी शिक्षणाला प्रारंभ केला. वडिलांच्या इच्छेप्रमाणे आय.सी.एस. होण्यासाठी ते इंग्लंडला आले. एकाग्रतेने परिश्रमपूर्वक अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर भारतात आले.

प्रारंभी त्यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते कलकत्त्याला आले आणि चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनानुसार देशसेवेला सुरुवात केली. कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्षे कार्य केले. इंग्लंडचे युवराज कलकत्त्याला येणार होते, परंतु सुभाषबाबूंनी त्यांच्या स्वागतसमारंभावर बहिष्कार घातल्याने त्यांना सहा महिने कारावास भोगावा लागला. जालियनवाला बागेसारख्या क्रूर कत्तली पाहून सुभाषबाबूंचे हृदय पेटून उठले. ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. त्यांनी तरुणांना एकत्र करून संघटना उभारल्या.

१९३२ साली ते हरिपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तसेच १९३९ साली त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या प्रखर भाषणाने भारतीय समाज जागृत होऊ लागला होता. काही कारणांमुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला व स्वातंत्र्यव्रत अधिक प्रखर करण्यासाठी 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली.

२२ जून १९४० रोजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले. देशाच्या स्वातंत्र्याविषयी सावरकरांशी चर्चा झाली. सावरकरांनी त्यांना परदेशात जाऊन इटली व जर्मनी यांनी पकडलेल्या सैनिकांची मदत घ्यावी; ब्रिटिश सैन्यावर स्वारी करावी, असा सल्ला दिला.

२ जुलै १९४० मध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. त्या वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अन्नपाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करण्याची धमकी दिल्याने सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले. त् आजारपणाचे निमित्त करून दाढी वाढविली, मौलवीचा वेष परिधान केला व 'झियाउद्दीन पठाण' ने नाव धारण करून, ते कलकत्त्यातून बाहेर पडले व काबूल, जपानमार्गे जर्मनीला गेले. भारतीय सैनिक युद्धकैदी बनून हिटलर-मुसोलिनीच्या छावणीमध्ये अडकून बसले होते. सुभाषींनी त्यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्र्याचा विचार मांडला.

सुभाषबाबू सिंगापूरला आले आणि त्यांनी 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धात जपान सामील झाला आणि त्यांनी सुभाषबाबूंना मदत करण्याचे मान्य केले. बर्लिन रेडिओवरून भाषणात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आव्हान केले. ते म्हणाले, 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो.' त्यांची ही घोषणा ऐकून सारा देश जागृत झाला. सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली. 'चलो दिल्ली', 'जय हिंद' अशा घोषणा त्यांनी केल्या. भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सुभाषचंद्र बोस यांनी 'इंडियन नॅशनल आर्मी' या संघटनेची स्थापना केली.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली व जपान यांचा पराभव झाल्याने त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. ते सायगावहून विमानाने निघाले; परंतु तैवान विमानतळावर विमानाचा अपघात होऊन त्यातच त्यांचा अंत 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला. अशा या थोर महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावरील सामान्य ज्ञान प्रश्न पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

नेताजीसुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Sunday, January 21, 2024

सराव चाचणी 7 इंग्रजी इयत्ता तिसरी व चौथी

 

मंथन इयत्ता दुसरी व तिसरी साठी नोट्स

⚜️स्पर्धा परीक्षा नोट्स व पेपर⚜️

इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी व चौथी साठी उपयुक्त अशा नोट्स व पेपर.

सदरच्या नोट्स व पेपर हे हाताने लिहून सौ.सविता राजमाने (गुळवे) शाळा ~ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगाव यांनी तयार केलेले आहेत.


 मंथन परीक्षेसाठी उपयुक्त अशा नोट्स डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मंथन परीक्षेसाठी उपयुक्त  पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मंथन परीक्षेसाठी उपयुक्त अशा पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला टच करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


सराव चाचणी 6 इंग्रजी इयत्ता तिसरी व चौथी

 

प्रजासत्ताक दिन भाषणे

 ⚜️ प्रजासत्ताक दिन भाषणे ⚜️


भाषण क्रमांक एक

उजळली आज प्रजासत्ताक

 दिनाची मंगलमय प्रभात, 

देशभक्ती, देशप्रेम संचारले चराचरात

 भारत मातेला वंदन करून......

 करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात


आदरणीय व्यासपीठ पुज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताकदिना बद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे.

आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात फार पुढे आहेतच. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सण हि आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे 'प्रजासत्ताक दिन' हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जतो. 

        आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. 

       हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. 

या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून 'प्रजासत्ताक दिन' साजरा होतो. 

           शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा, आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात. शाळांना तोरणे-पताका तसेच तिरंगा ध्वजही लावले जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात.

         शाळेतील वाद्य-वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

" आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक

या भारताचे संरक्षक आहोत.!"

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो .

जय हिंद! जय महाराष्ट्र!

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

प्रजासत्ताक दिन निबंध वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.



Wednesday, January 17, 2024

NMMS Final answer key

 

NMMS Exam 2023-24 ची अंतिम उत्तरसूची जाहीर

MAT Final answer key 2023 - 24


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

SAT Final answer key 2023 - 24

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

NMMS परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे टच करा



प्रजासत्ताक दिन निबंध

 प्रजासत्ताक दिन निबंध



१५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरील सत्ता संपली. त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरले. त्या लोकशाहीचे सर्व नियम ज्यात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट घेऊन केले. अशा रीतीने २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला.

लोकशाही ह्याचा अर्थ लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले सरकार. लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात, प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो.

दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी आम्ही मुले शाळेत जातो आणि ध्वजवंदन करतो. आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आम्ही मुले एका स्वतंत्र, लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलू

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

देशभक्तीपर चारोळ्या पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

प्रजासत्ताक दिन भाषण पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Monday, January 15, 2024

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे माहिती

⚜️ न्या. महादेव गोविंद रानडे यांची माहिती ⚜️



महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 16 जानेवारी 1842 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये घेतले. ते बालपणापासून अतिशय हुशार होते. सर्व परीक्षेत ते प्रथम क्रमांकावर होते. कुशाग्र बुद्धी व अफाट वाचन होते. अंत:करणापासून ज्ञान ग्रहण करण्याची त्यांना आवड होती. ते एम.ए., एल.एल.बी. झाले.

न्या. रानडे यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यामुळे त्यांची बुद्धी चौफेर झाली. कॉलेजमध्ये शिकत असतानादेखील प्राध्यापक त्यांचे ज्ञान पाहून आश्चर्यचकित होत असत. 1871 मध्ये त्यांची पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. कायद्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. आपले न्यायदानाचे काम ते अत्यंत चोख पद्धतीने करत. कायदेशीर पुराव्याचा आधार घेऊन ते निकाल देत होते. आपल्या कर्तृत्वाने प्रगती करत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

इंग्रज आपला व्यापार भारतात वाढवीत होते. शहराबरोबर खेड्यांतदेखील त्यांचा व्यापार पोहोचला होता. विलायती वस्तू खेड्यांत विकावयास सुरुवात झाल्यामुळे खेड्यांतील कारागीर बेकार होऊ लागले. भारतात खुल्या व्यापाराचे तत्त्व हानिकारक आहे, असा विचार त्यांनी अनेक लेखांतून प्रसिद्ध केला. संरक्षित व्यापाराचे तत्त्व महत्त्वाचे असून ते भारताला लाभदायक होईल असे ते म्हणत. ही गोष्ट त्यांनी प्रथम भारतीयांना समजावून सांगितली. त्यामुळे त्यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' असे म्हटले जाते.

भारताची प्रगती व्हावयाची असेल तर स्त्री- पुरुष दोघांची प्रगती झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. तो विचार त्यांनी समाजात रुजविला. दोघांनाही शिक्षण घेणे भाग आहे. शिक्षणाशिवाय ज्ञान वाढणार नाही आणि ज्ञानाशिवाय देशाची प्रगती होणार नाही असे ते सांगत. स्त्री व पुरुषांना समान शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.

आपण सारे एक आहोत, ही त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे अस्पृश्यांना कधी कमी मानू नका असे ते सांगत असत. आपणच आपल्यात भेदभाव करतो, तर मग इंग्रजांनी काळा-गोरा भेदभाव मानल्यास आपल्याला राग येण्याचे कारण काय ? असा प्रश्न ते उपस्थित करत होते. त्यामुळे आपण आपल्या देशातील अस्पृश्यतेचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे, असे समाजाला शिकवत होते.

न्या. रानडे उदारमतवादाचा पुरस्कार करणारे होते; त्यामुळे शांतीतून त्यांना क्रांती घडवावयाची होती. ईश्वर जवळ व सर्वत्र सम प्रमाणात आहे; तर मग हे भेदाभेद कशासाठी ? हे भेदाभेद मानवनिर्मित असून आपणच ते दूर केले पाहिजेत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपली प्रगती करता आली पाहिजे; त्यामुळे कोणतीही दारे बंद असता कामा नये. कोणाला अडवू नये. सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर देश प्रगतिपथावर अवश्य जाऊ शकेल. उदारमतवादी मानवतावादाचा पुरस्कार न्या. रानडे यांनी केला.

मुसलमानांनंतर भारतात इंग्रजाचे राज्य आले, हा इंग्रजी इतिहासकारांचा मुद्दा चुकीचा आहे हे त्यांनी सांगितले. त्यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता. ते म्हणत, मुसलमानांची सत्ता नष्ट करून मराठ्यांनी राज्य केले. आपसातील दुहीमुळे-फितुरीमुळे व इंग्रजांच्या कपटनीतीमुळे आपणास राज्य गमवावे लागले. लोकांचे गैरसमज दूर होण्यासाठी 'राईज ऑफ दि मराठा पॉवर' हा ग्रंथ लिहिला.

न्या. रानडे आपले काम चोखपणे करत होते. पण देशहिताचा विचार सातत्याने त्यांच्या मनात निर्माण होत होता. सरकारी नोकरी व देशस्वातंत्र्याचा विचार या दोन्ही गोष्टींचा समतोल त्यांनी सांभाळलेला होता.

पुणे सार्वजनिक सभेच्या मासिकात ते अनेक वर्षे लेख लिहीत होते. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेला त्यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. उच्च पदावर नोकरी करत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातत्याने लेखणीच्या द्वारे प्रयत्न केले.

विधवा विवाहाला त्यांची मान्यता होती. याप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांत ते समाजाला सातत्याने मार्गदर्शन करत होते. त्यामुळे लोक त्यांना महामानव मानत होते. सतत कार्यरत असल्याने म. गो. रानडे यांची प्रकृती क्षीण होत गेली व १६ जानेवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले. म. गो. रानड्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत पोकळी निर्माण झाली.


गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती

 ⚜️ गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती ⚜️




गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या छोट्याशा खेड्यात 9 मे 1866 रोजी झाला. घरची गरिबी होती. सर्व संकटांना तोंड देत त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरात घेतले. एके दिवशी शिक्षकांनी एक अवघड गणित सोडवून आणण्यास सांगितले होते. गोपाळने ते वडिलांच्याकडून सोडवून आणले. शिक्षकांनी त्याची पाठ थोपटली. त्याला शाबासकी दिली. त्यावेळी गोपाळ रडू लागला. त्याने खरी गोष्ट सांगितली. वडिलांनी गणित सोडवून दिले हे सांगितले. शिक्षकांची क्षमा मागितली आणि त्या दिवसापासून सत्याने वागण्याचा निश्चय केला.

मुंबईला ते आले आणि एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी १८ व्या वर्षी बी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली. इंग्रज सरकारची नोकरी मिळत असताना त्यांनी ती नाकारली आणि आपल्या देशातील पिढीवर संस्कार घडविण्याच्या निमित्ताने पुण्यातील 'न्यू इंग्लिश स्कूल' मध्ये नोकरी करू लागले. संपत्तीपेक्षा देशबांधवांवर त्याचे अधिक प्रेम होते. नंतर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक झाले. गणिताबरोबरच इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवीत होते. समोर बसलेले विद्यार्थी आपलीच मुले आहेत असे समजून गोपाळ कृष्ण गोखले अत्यंत तळमळीने गणित, इतिहास, इंग्रजी विषयांचे अध्यापन करीत होते. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी अल्पावधीत नाव कमावले. शालेय मुलांसाठी सोप्या पद्धतीने गणिताचे पुस्तक लिहिले.

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी काढलेल्या 'सुधारक' या पत्राचे सहाय्यक संपादक म्हणून ते कार्य करू लागले. त्यामुळे समाजासाठी त्यांना अनेक गोष्टी लिहिता येऊ लागल्या. न्यायमूर्ती रानडेंचा त्यांना सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्र याचा सखोल अभ्यास केला. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात आले. १८९७ मध्ये ते पुण्याच्या 'सार्वजनिक सभेचे' चिटणीस झाले.

भारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्याकरता नेमलेल्या 'बेल्बी कमिशन' पुढे साक्ष देण्यासाठी ते डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला निघाले. सोबत सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी होते. त्यांनी केलेले भाषण अतिशय गाजले.

१९०० साली मुंबई कौन्सिलमध्ये ते निवडून आले. १९०२ मध्ये मध्यवर्ती कायदे मंडळावर निवडले गेले. त्या वेळी सरकारी अर्थसंकल्पावर १२ भाषणे केली. ब्रिटिश सरकार भारताचे शोषण कसे करत आहे याचे स्पष्टीकरण केले. अत्यंत परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेल्या या भाषणामुळे 'नेशन' या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणाले, 'इंग्लंडचे पंतप्रधान ऑस्क्कथ' यांच्यापेक्षा गोखले हे श्रेष्ठ आहेत.

नामदार गोखले हे नेहमी म्हणत, 'साध्य जसे चांगले हवे तसेच त्या प्राप्तीसाठीची साधनेदेखील चांगली हवीत.' म्हणून महात्मा गांधींनीदेखील त्यांना आपले राजकीय गुरू मानले.

१९०५ साली बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी 'भारत सेवक समाज' संस्था स्थापन केली. निष्ठावंत समाजसेवक त्यांना निर्माण करावयाचे होते. मागासलेल्या लोकांची उन्नती आवश्यक होती. ते आपले महनीय विचार अत्यंत शांत पद्धतीने मांडत होते. त्यांच्या हृदयात अपार देशभक्ती ओथंबलेली होती. वयाच्या ४९ वर्षांपर्यंत कार्य करून, भारतमातेची सेवा करून ते कृतकृत्य झाले. भारतमातेच्या चरणी त्यांनी 19 फेब्रुवारी 1915 रोजी आपला देह ठेवला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर समाजसुधारकांची माहिती पाहिजे असल्यास खालील बटनाला टच करा.