SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, December 31, 2024

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत

 दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत



प्रस्तावना :-

              राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.

"मराठी भाषेचा प्रचार व प्रसार" या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक :-


         मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सुयोग्य कार्यक्रम आयोजित करुन पंधरवडा समारंभपूर्वक साजरा करण्यासाठी सर्व कार्यालयांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-


अ) राज्यातील सर्व कार्यालयांनी करावयाचे कार्यक्रम :-

१) मराठी भाषेसंबंधी, वाङ्मयासंबंधी विविध परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबीरे / कविसंमेलने/ एकांकिका/बालनाट्ये/ नाटके/ पुस्तक प्रकाशन समारंभ / साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करणे.

२) मराठी भाषेत निबंध / प्रश्नमंजुषा / कथाकथन / चारोळीलेखन / कथालेखन / कवितालेखन / हस्ताक्षर / शुद्धलेखन / वक्तृत्व / घोषवाक्ये / अभिवाचन / वादविवाद / अंताक्षरी / शब्दकोडी / मराठी साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण / समीक्षण / परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे.

३) मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती / लेखक / वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करणे.

४) ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे.

५) वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.

६) राज्यातील अमराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पध्दतीने परिचय करुन देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा/ भाषेसंबंधी स्पर्धांचे आयोजन करणे.

७) मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ.एम. रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, द्विटर, व्हॉट्सअॅप इ. अशा आधुनिक प्रसार माध्यमातून याबाबतचे दृक-श्राव्य संदेश प्रसारित करावेत.

८) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व विकास यासाठी विविध मार्गानी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव / सत्कार करणे.

९) टंकलेखनाकरिता युनिकोड मराठीचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.

१०) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयावरील तसेच अशा स्वरुपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.


१. अनुवादलेखन

२. व्यावसायिक लेखन

३. पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया

४. स्व-प्रकाशन

५. ई-बुक

६. ऑनलाईन पुस्तक विक्री

७. लेखक प्रकाशन करार

८. संहिता लेखन

९. विकिपिडिया कार्यशाळा

१०. शॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन

११) डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, तसेच मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचणे, तसेच पुस्तके विकत घेणे, इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राबवावेत.

१२) प्रत्येक जिल्ह्यात पुरतकाची जत्रा आयोजित करण्यात यावी. या जत्रेत लोक आपली पुरतके निःशुल्क किंवा स्वस्त दरामध्ये इतरांना देऊ शकतील. तसेच, या जत्रेदरम्यान मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

१३) महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज १००% मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मराठी भाषा समितीमार्फत विविध उपक्रम राबवावेत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, नियम, अधिनियम संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.

१४) सर्व संस्थांनी समाज माध्यमांवर "मराठी वाचन कट्टा" निर्मिती करावी.

१५) सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी प्रचार, प्रसार व विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.

१६) अभिजात मराठी भाषेबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या समन्वयाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

ब) राज्यस्तरावर साहित्य संस्थांच्या मदतीने वरील "अ" प्रमाणे करावयाची कार्यवाही :-

राज्यस्तरावर वरील कार्यक्रम सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था यांनी खालीलप्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेऊन त्या साहित्य संस्थांसमोर दर्शविलेल्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करावेत.



क) आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय महाराष्ट्र मंडळांनी देखील या कालावधीत अनुक्रमे परदेशात व इतर राज्यात उपरोक्त "अ" मध्ये नमूद केल्यापैकी कार्यक्रम आयोजित करावेत.

ड) भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल अॅप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारीत करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय कार्यालयांची राहील.

आ) सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी "मराठी भाषा प्रचार व प्रसाराचे उपक्रम (कार्यक्रम)" महसूली विभाग व जिल्हास्तरावर राबविण्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबतचा शासन निर्णय क्र. मभावा-२०२०/प्र.क्र.९८/भाषा-२, दि.२४.०६.२०२२ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी. सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच परिच्छेद "ब" येथे दर्शविलेल्या साहित्य संस्थांची मदत घेता येईल.

२. राज्यात तसेच जिल्हा स्तरावर त्यांच्या अखत्यारित असलेल्या कार्यक्षेत्रात वर दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आयोजन खालील कार्यालयांनी करावे.


अ) मुंबई (मुख्यालय स्तरावर)- सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील मुंबईतील शासकीय कार्यालये

आ) सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये

इ) सर्व जिल्हाधिकारी कार्यालये तसेच विविध विभागांच्या अधिपत्याखालील जिल्हास्तरीय कार्यालये

ई) मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)-तालुकास्तरावर, ग्रामीणस्तरावर

उ) शासनाच्या अखत्यारितील कार्यालये/मंडळे/महामंडळे/सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था

ऊ) शिक्षण संचालक/सर्व विभागीय सह संचालक / उप संचालक / जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ प्रौढ शिक्षण व अल्पसंख्यांक) कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालये

ए) सर्व संचालक (उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, व्यवसाय विभाग, ग्रंथालये) कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालये

ऐ) महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये व आस्थापना आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला बँकींग, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, विमान प्रवास, गॅस, पेट्रोलियम, कराधान, पारपत्र इत्यादी सेवा पुरविणारी अन्य कार्यालये.

३. या कार्यक्रमांकरीता येणारा खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने/कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर होणाऱ्या आर्थिक तरतूदीतून अदा करावा.

४. सर्व कार्यालयांनी वरीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करुन या विभागास कार्यक्रमांबाबतचा अहवाल सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२३११३१०११०७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



प्रजासत्ताक दिन साजरा करणे बाबत

 राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत...

प्रजासत्ताक दिन साजरा करणेबाबत


शासन परिपत्रक :-

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले आहे. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

२. सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शाळांकडून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिनांकानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात. सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे. सदर सूचनांच्या पालनासह दिनांक २६ जानेवारी, २०२५ पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबवावेत. यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा.

१) प्रभात फेरी : शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी.

२) भाषण स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

३) कविता स्पर्धा : विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे.

४) नृत्य स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी.


५) चित्रकला स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी.


६) निबंध स्पर्धा : विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी.


७) खेळ : विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत.


८) प्रदर्शनी: विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी.

उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा.

३. सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी.

४. वरील परिच्छेद क्र. २ मधील सुचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आयुक्त (शिक्षण), यांनी घ्यावी आणि त्याकरिता आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित कराव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४१२३११६००५४५३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



Monday, December 30, 2024

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती.

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती.




प्रस्तावना

संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे. तसेच संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.


संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये राज्य शासन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सहभागी होईल असा निर्णय घेतला आहे. तसेच संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत स्तर-१ ची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिताची अंमलबजावणीची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.


राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान जमा करण्याच्या कार्यपध्दतीच्या अनुषंगाने महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे -

The provision and expenditure on the government contribution to the DCPS/NPS is required to be made under the head "2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme."


महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत उपरोक्तप्रमाणे नोंदविलेले निरीक्षण व संदर्भ क्र.५ येथील केंद शासनाच्या ज्ञापनास अनुसरुन नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम वेतनाच्या लेखाशीर्षाखाली खर्च न होता "2071-Pension & Other Retirement Benefits. 117-Defined Contribution Pension Scheme" या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील कार्यपध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक :

महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी सन २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाबाबत नोंदविलेल्या निरीक्षण व केंद्र शासनाचे दि.०२.०९.२००८ च्या ज्ञापनास अनुसरुन संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयामधील कार्यपध्दतीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

१. राज्य शासकीय सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत -

१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही -

१.१.१ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली (मूळ वेतन महागाई वेतन (असल्यास) + महागाई भत्ता या रकमेच्या १०%) करण्यात यावी. यामध्ये नियोक्त्याच्या

अंशदानाचा समावेश नसावा.

१.१.२ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करुन ती प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावीत.

१.१.३ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीखाली वजाती होणारी अधिकारी / कर्मचारी यांच्या अंशदानाची रक्कम खाली दर्शविल्याप्रमाणे संबंधित योजना सांकेतांकामध्ये प्रवर्गनिहाय जमा म्हणून दर्शविण्यात यावी.


१.१.४ कर्मचाऱ्याच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशील दर्शविणारी आवश्यक ती अनुसूची (Schedule) वेतन देयकासोबत जोडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.


१.१.५ राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाच्या वजावटी महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम २५९ (१) नुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शविण्यात याव्यात.


१.१.६ नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाचे अधिकारी / कर्मचारी यांचे Projected Employer Contribution Schedule वेतन देयकासोबत तयार होईल. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे Schedule वेतन देयकासोबत जोडावे.


१.१.७ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्य रकमा Auto-calculate होतील. तथापि, Pay Arrears / DA Arrears / Pay Arrears Difference / DA Arrears Difference ची थकबाकीची देयके तयार करताना, कर्मचाऱ्यांच्या १०% तसेच नियोक्ता / शासनाच्या १४% अंशदानाच्या रक्कमेची आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिगणना करुन ती रक्कम सेवार्थ प्रणालीमध्ये (Manually) भरावी.


१.१.८ आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना, नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची १४% रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये दर्शविण्यात यावी. याबाबतची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. नियोक्ता / शासनाच्या अंशदानाची अधिकारी / कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल.


१.२ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी करावयाची कार्यवाही


१.२.१ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत सामील असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून केवळ कर्मचाऱ्याच्या अंशदानाची वसूली संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत करण्यात आली असेल तरच वेतन देयके पारित करण्यात यावीत अन्यथा नाकारण्यात यावीत. वेतन देयकामध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश असणार नाही याची खातरजमा करण्यात यावी. तद्नंतरच राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची प्राप्त वेतन देयके प्राधान्याने पारित करुन प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत प्रमाणक क्रमांक (Voucher No.) संस्करीत करावेत.

१.२.२ अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन देयकास प्रमाणक क्रमांक संस्करीत झाल्यानंतर, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरित करण्याकरिता म. को.नि. साधी पावती नमुना ४५-अ निरंक रक्कमेची (Nil Bill) महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता स्वतंत्र देयके सेवार्थ प्रणालीमध्ये Auto- generate स्वरुपात तयार करावीत.


१.२.३ नियोक्त्याच्या अंशदानाच्या रक्कमा आहरीत करण्याकरिता, महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचेकरिता "2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme (20710651)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३६६, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५०२६, भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचेकरिता ८३४२५३७५ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी. तसेच राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता "2071-Pension & Other Retirement Benefits, 117- Defined Contribution Pension Scheme (20710642)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून ८३४२५०९९ या लेखाशीर्षाखाली जमा दर्शविण्यात यावी.


१.२.४ वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, दि.०४.१२.२०२३ सोबतच्या विवरणपत्रामधील मुद्दा क्र.३.१ मध्ये "प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला SCF तयार करुन NPS प्रणालीवर अपलोड करावी. मासिक अंशदानाची रक्कम SCF तयार करुन NPS प्रणालीवर अपलोड झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बँकेकडे (Trustee Bank) वर्ग करावी" असे नमूद आहे. तथापि, नियोक्त्याच्या अंशदानाच्या रकमा आहरित करण्याकरिता निरंक देयक तयार करुन पारित करण्याचा कालावधी लक्षात घेता, अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयातून नियोक्त्याच्या अंशदानाचे निरंक रकमेचे देयक पारित झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला कर्मचाऱ्याचे अंशदान व नियोक्त्याचे अंशदान संदर्भात Subscriber Contribution File (SCF) तयार करुन CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) करावी व व्यवहार क्रमांक (Transaction ID) प्राप्त करुन घ्यावा.


१.२.५ अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी "८३४२-Other Deposits-००-११७- Defined Contribution Pension Scheme" या लेखाशीर्षाखाली कर्मचाऱ्याच्या व नियोक्त्याच्या अंशदानाच्या जमा रकमा आहरित करण्याकरिता ८३४२०१३२ या मुख्य लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून साधी पावती म.को.नि. नमुना ४५-अ मध्ये देयक सादर करावे.

१.२.६ सदर देयकाद्वारे आहरित करण्यात आलेली मासिक अंशदानाची रक्कम, Subscriber Contribution File (SCF) CRA-NPSCAN प्रणालीमध्ये अपलोड (Upload) झाल्याच्या दिनांकापासून ७ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विश्वस्त बँकेकडे (Trustee Bank) वर्ग करण्यात यावी.


२. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या मासिक अंशदानाबाबत


प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत मासिक अंशदानाची वसुली व सदर वसूलीची रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक अंनियो-२०१५/ (NPS)/ प्र.क्र.३२/सेवा-४, दि.०६.०४.२०१५ नुसार विहित कार्यपध्दती लागू राहील.


३. हे शासन निर्णय जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.


४. उपरोक्त कार्यपध्दती कोषागार कार्यालय, वाशिम अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून दि.१५.०२.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात येत आहे. दि.१५.०३.२०२५ पासून सेवार्थ प्रणालीत तयार होणारी वेतन देयके तसेच वेतनाची पुरक देयकांसंदर्भात नियोक्त्याच्या / शासनाच्या अंशदानाची रक्कम 2071-Pension & Other Retirement Benefits, 117-Defined Contribution Pension Scheme या लेखाशीर्षामधून खर्च करण्यासंदर्भातील सुधारीत कार्यपध्दती सर्व कोषागार कार्यालयांच्या स्तरावर चालू करण्यात येईल.


५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१२३०१२०५४१६६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



Sunday, December 29, 2024

I am winner डिसेंबर इंग्रजी माध्यम ऑनलाईन टेस्ट

 ध्येय प्रकाशन अकॅडमी ऑफ महाराष्ट्रा संचलित I am winner राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा

 English Medium  Online test  December 2024

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

आय एम विनर स्पर्धा परीक्षेची माहिती व्हिडिओ ~

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

जर तुम्हाला I AM WINNER परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करायचे असतील तर ~

 CLICK HERE

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

जर तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका WHATSAPP वर हव्या असतील तर ~ 

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

खालील इयत्तेला टच करून आपल्या वर्गाची ऑनलाईन टेस्ट सोडवावी



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

I am winner डिसेंबर 2024 ऑनलाइन टेस्ट

 ध्येय प्रकाशन अकॅडमी ऑफ महाराष्ट्रा संचलित I am winner राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा

Marathi/Semi English Medium  Online test  December 2024

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

आय एम विनर स्पर्धा परीक्षेची माहिती व्हिडिओ ~

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

जर तुम्हाला I AM WINNER परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करायचे असतील तर ~

 CLICK HERE

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

जर तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका WHATSAPP वर हव्या असतील तर ~ 

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

खालील इयत्तेला टच करून आपल्या वर्गाची ऑनलाईन टेस्ट सोडवावी



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Saturday, December 28, 2024

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत.

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना


विषय :-

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत.


संदर्भ:- शिंदे चव्हाण गांधी अॅन्ड कंपनी, पुणे यांचे सोबत करण्यात आलेला करारनामा दि. १५.१०.२०२४.

                     प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालयस्तरावरुन शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरीत करण्यात येते आहे. शाळांना वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते. शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेची अंमलबजावणी करतांना सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण करणे करीता शिंदे, चव्हाण गांधी अॅन्ड कंपंनी, पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या अभिलेख्यांचे लेखा परिक्षण करण्यात येणार आहे. सदरच्या लेखापरिक्षण कार्यवाहीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

शालेय पोषण आहार ऑडिट प्रपत्र DOWNLOAD करण्यासाठी ~

 CLICK HERE

               १. राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरिक्षण करण्यात येणार असल्याने, योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विहित नमुना (वेब फॉर्म) उपलब्ध करुन देण्यात यावा.

              २. शाळांनी सदरची माहिती भरतांना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी.

              ३. सदरची माहिती शाळांनी केवळ एक वेळेस भरावयाची आहे. त्यामुळे माहिती भरतांना योग्य ती दक्षता शाळाप्रमुख/मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे.

                ४.शाळा, तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्याकरीता व आढावा घेण्याकरीता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याकरीता तालुका व जिल्ह्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड जिल्ह्यांना कळविण्यात येतील.

               ५. शाळांनी अचूकपणे विहित नमुना (वेव फॉर्म) यागध्ये भरलेली गाहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या https://block.mahamdm2-scgc.co.in या ऑनलाईन पोर्टलवर शाळानिहाय भरावयाची आहे. तसेच शाळांकडून संकलित माहितीची एक प्रत तालुकास्तरावर जतन करुन ठेवण्यात यावी.

              ६. सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्याने विविध जिल्ह्यांचे लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लेखापरिक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळविण्यात येईल. तेत्रीयस्तरावर शाळांकडील अभिलेख्यांचे शाळानिहाय माहितीचा विहित नमुना (वेव फॉर्म) व प्रत्यक्ष अभिलेख्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

                 ७. प्रस्तुत लेखापरिक्षणाकरीता शाळांकडून कोणत्याही स्वरुपाची फी (Free Of Cost) आकारण्यात येणार नसल्याने, शाळांनी लेखापरिक्षणाकरीता कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फि देण्यात येऊ नये, याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्यात.

              ८. लेखापरिक्षणाकरीता विहित नमुन्यातील माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे. लेखापरिक्षणास माहिती सादर न करणे अथवा लेखापरिक्षण पडताळणी दरम्यान अभिलेखे सादर न करणा-या शाळाप्रमुखांकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत सर्व शाळांना अवगत करुन देण्यात यावे.

                ९. लेखापरिक्षणाकरीता तालुका व जिल्ह्यांशी आवश्यक समन्वय साधण्याकरीता, तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस mdmaudit@cascg.in या ई- मेलवर त्वरीत कळविण्यात यावेत.

                 १०. शाळांकडून लेखापरिक्षण नमुना प्रपत्र भरुन घेतांना खालील आवश्यक अभिलेख्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.


अ. बैंक पासबुक सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ पर्यंत

आ. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ पर्यंतचे कॅशबुकचा तपशिल

इ. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीतील तांदुळ साठा नोंदवही इतर धान्यादी माल शिल्लक सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंदवही

ई. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चलनांच्या छायांकित प्रत

ऊ. सर्व प्रकारचे खर्चाचे व्हॉऊचर्स, उपयोगिता प्रमाणपत्रे, विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण

ऊ. याव्यतिरिक्त लेखापरिक्षण नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखे व विहित नमुन्यातील हस्तलिखित भरलेला नमुना (Hard copy of web form)


                 ११. लेखापरिक्षणाकरीता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील माहिती शाळांकडून संकलित करुन वेबसाईटवर भरणेची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तालुक्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लॉगिनवरुन शाळानिहाय माहिती अद्यावत करावयाची आहे.

                  १२. जिल्ह्यांनी तालुक्यांच्या लेखापरिक्षणा विषयक कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरणेबाबत योग्य ते नियोजन करावे तसेच याबाबत सर्व तालुक्यांना आवश्यत ती दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरिक्षण होण्याच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.

                १३. जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरिक्षणास उपस्थित राहणार नाहीत अथवा अभिलेखे सादर करणार नाहीत, अशा शाळांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करुन देण्यात यावेत.

               उक्त निर्देश शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणा-या सर्व शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिका यांना लागू राहतील.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


Friday, December 27, 2024

सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

 सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

             सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.

              २. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.

                    ३. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

                 ४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२७१५४०२१७४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) दि.२७.१२.२०२४ चे परिशिष्ट सन २०२५ मध्ये मंत्रालय, शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती / राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


Thursday, December 26, 2024

अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा 2023 इयत्ता आठवी पेपर

 इयत्ता आठवी साठी

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा  2023

 Pepar 1 व 2 

भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 2023 

इयत्ता ~ आठवी

उत्तर सूची DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आयएएस या परीक्षेच्या माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


कराड तालुका समन्वयक ~ चिंचकर सर

7709248141

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा


अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा 2023 इयत्ता सातवी पेपर

 इयत्ता सातवी साठी

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा  2023

 Pepar 1 व 2 

भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 2023

इयत्ता ~ सातवी

उत्तर सूची DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा आयएएस या परीक्षेच्या माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


कराड तालुका समन्वयक ~ चिंचकर सर

7709248141

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा