SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, December 7, 2024

APAAR दिवस साजरा करण्याबाबत

APAAR DIWAS" दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी सर्व शाळांमध्ये साजरा करणेबाबत.



विषयः "Mega APAAR DIWAS" दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी सर्व शाळांमध्ये साजरा करणेबाबत.


संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. No.१-२७/२०२३-DIGED-Part (१) दि. २७/११/२०२४


              उपरोक्त संदर्भिय पत्राव्दारे केंद्र शासनाकडून "Mega APAAR DIWAS" दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यासाठी कळविले आहे. या कार्यालयाकडून दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२४ रोजी APAAR DAY राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०६/१२/२०२४ पर्यंत राज्यातील ६०.७५% विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


            केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळामध्ये 'APAAR दिवस' साजरा करण्यात यावा.


⚜️ सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम विस्तृत स्वरुपात राबविण्यात यावी.


⚜️ जिल्हा, तालुका व मनपा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना द्याव्यात.


⚜️ दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी मनपा, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा.


⚜️ जिल्हा, तालुका व मनपा कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्यााबाबत नोंदणी पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी.


⚜️ प्रणाली मधील अहवालानुसार ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही सुरुच केलेली नाही, अशा शाळांना जिल्हा, तालुका व मनपा स्तरावरुन तात्काळ सूचना देवून अडचणी असल्यास मुख्याध्यापकांना तालुका कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे व त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.


⚜️ जिल्हा, तालुका, मनपा व केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी "Mega APAAR DIWAS" साजरा करण्यात यावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा





No comments:

Post a Comment