SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, December 18, 2024

यु-डायस प्लस ड्रॉपबॉक्स अपडेट

 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये करून घेणेबाबत.

Udise plus


विषयः यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import (https://udiseplus.gov.in/) करून घेणेबाबत.

संदर्भ : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला Dropbox अहवाल.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दि. १७ डिसेंबर, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये १२,१९,०६१ एवढे विद्यार्थी Dropbox मधून शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. सदर विद्यार्थी Import केल्याशिवाय यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने Entry न करता Dropbox मधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत Import करणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या Dropbox मधील Active for Import Status असलेले विद्यार्थी तात्काळ Import करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, जेणेकरून Dropbox मधील विद्यार्थ्यांची संख्या शून्य करता येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





No comments:

Post a Comment