SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, August 30, 2024

शिक्षण सेवा पंधरवडा अभियान

 शिक्षण सेवा पंधरवडा अभियान

शिक्षण सेवा पंधरवडा


विषय: 'शिक्षण सेवा पंधरवडा अभियान' राबविणेबाबत.

संदर्भ: १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२३/ प्रक्र१४५/टीएनटी-४, दि.८/९/२०२३.

२. या संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंयो/२०२३/शि.से. पंधरवडा/ आस्था-कार्या-१/२०६५, दि.६/१०/२०२३.

परिपत्रक -

शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढणे, शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर करुन गतीमान व पारदर्शक पध्दतीने सेवा विहित कालमर्यादेत देणे या उद्देश्याने दिनांक ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा" या पुढे दरवर्षी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भातील संदर्भ १ वरील परिपत्रकान्वये शासनाने दिलेल्या सूचना पहाव्यात,

२/- या सूचनांनुरुप शिक्षण सेवा पंधरवडा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भुत विविध विदयार्थी-पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निपटा-यासाठी कालबध्द मोहिम आखून प्रलंबित कामांचा निपटारा शासन निर्देशानुरुप करावयाचा आहे. संचालनालयाच्या स्तरावरुन या संदर्भात संदर्भ २ वरील परिपत्रकानुसार सर्व शिक्षणाधिकारी (योजना) यांना तसेच संबंधित घटकांना सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यावर्षी देखील त्याची अंमलबजावणी करावयाची आहे.

३/- सबब संदर्भ १ वरील शासन परिपत्रकास अनुसरुन या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने खालील कार्यक्रम हाती घेवून राबविण्यात यावेत.

१. या अभियानाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करिता आगाऊ व व्यापक अशी प्रसिध्दी सर्व स्तरावर देण्यात यावी. जेणेकरुन या अभियानाचा सर्व घटकांना लाभ घेता येईल.

२. कार्यालयास प्राप्त अर्ज/निवेदने/तक्रारी यावर नियमानुसार कार्यवाही करुन ते निकाली काढावेत. ३. सुनावणी ठेवावयाच्या प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणीचे आयोजन करण्यात यावे. प्रकरण शक्यतो त्याच दिवशी निर्णित करावे.

४. शिक्षण सेवा पंधरवडा अभियान कालावधीत व दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणा-या दिनी प्राप्त अर्ज व निवेदने यावर त्याच दिवशी नियमोचित कार्यवाही करावी व ती निकाली काढावीत. ज्या प्रकरणी सुनावणी घेणे आवश्यक आहे त्या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणीचे आयोजन करावे. तसेच पुढील महिन्याच्या ५ तारखेच्या अगोदर सदर प्रकरण निकाली काढावे. ५. विविध न्यायालयांमध्ये विभागाची प्रलंबित असलेली प्रकरणे पहाता न्यायालयीन प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये अदयाप शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही वा न्यायालयात उपस्थित राहीले नाहीत अशा प्रकरणी प्राधान्याने आवश्यक व उचित कार्यवाही कालमर्यादित करण्याची दक्षता घ्यावी. न्यायालयीन प्रकरणांकरीता नियमन तक्ता तयार करण्यात यावा.

६. सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा नियुक्ती प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा. प्रचलित शासन धोरण व तरतूदी विचारात घेवून वेळीच प्रकरणे निर्णित करावीत. त्याकरिता बिंदुनामावल्या अद्यावत करणे, प्रतिक्षा यादी अद्यावत करणे इत्यादी कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावी.

७. कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना आपली सेवा व कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यकते नुरुप राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करावे, याबाबतचे कालबध्द नियोजन करुन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे.

८. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार विभागीय चौकशी प्रकरणी विहित कार्यपध्दती अवलंबून कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याच अनुसरुन विभागीय चौकशी सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करणे, चौकशी अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त करुन घेणे, चौकशी अहवालावर निर्णय घेवून अनुषंगिक आदेश निर्गमित करणे वा गरजेनुरुप प्रकरण वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बाबतची कार्यवाही करावी.

९. प्रशासकीय घटक-

(अ) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. सेवापुस्तकाच्या दुय्यम प्रती साक्षांकित करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच आवश्यकता भासल्यास त्या करिता शिबिराचे आयोजन करण्यात यावे.

(ब) नियुक्ती प्राधिकारी/सक्षम प्राधिका-याने आपल्या अधिनस्त मंजूर पदांच्या बिंदु नामावल्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रमाणित करुन घ्याव्यात. या बाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

(क) कार्यालयातील अभिलेख्यांची वर्गवारी करुन अभिलेख कक्षात जतन करण्यासाठी पाठवावयाचे अभिलेख, अभिलेख कक्षात पाठविण्यात यावेत. तसेच अभिलेख कक्षामध्ये असलेल्या अभिलेखाचा जतन कालावधी पूर्ण झाला असल्यास विहित कार्यपध्दतीनुसार ते निर्लेखित करण्यात यावेत.

(ड) सर्व कार्यालयामध्ये अभिलेख्यांसंदर्भात सहा गठ्ठा पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. सदर कार्यवाही विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यात यावी. पुढील १ महिन्यांमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. कार्यालय प्रमुखांनी या बाबत नियोजन करुन दैनंदिन आढावा घ्यावा.

(इ) जड वस्तु संग्रह नोंदवहीचे अद्यावतीकरण करणे. कार्यालयातील जडवस्तू संग्रह नोंदवहीतील नोंदी अदयावत करण्यात याव्यात. याबाबतचे आवश्यक ते पडताळणीचे दाखले वरिष्ठ कार्यालयास सादर करावेत. (ई) तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर कार्यक्षेत्रांमध्ये विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी यांचे उपयोगी इतर कोणताही उपक्रम राबवावयाचा असल्यास तो अभियान कालावधीत हाती घेवून राबविण्यात यावा. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांमार्फत शासनास सादर करण्यात यावा.

१०. सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाबनिहाय कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा. विभाग व जिल्हा स्तरावर अंमलबजावणीचे संनियंत्रण करुन या अभियानाचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. त्याबाबतचा एकत्रित अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत शासनास व या संचालनालयास सादर करावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरचे परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.

 सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.



विषयः सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. यु-डायस प्लस पोर्टलवरील दि. २२/०८/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील २६.२३९ एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे आणि यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे बाकी आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०,०० ते सायंकाळी ५.३० या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व मनपाचे MIS-Coordinator यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेमध्ये पुढील मुद्यांवर आढावा घेण्यात येणार आहे-

🎗️ सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमनाये सर्व विद्याथ्यर्याचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे.

🎗️ सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे,

🎗️ राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे,

🎗️ शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे.

🎗️ शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे,

🏆 Performance Grading Index (PG) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.

⚜️ सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.

⚜️ द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.

⚜️ आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.

⚜️ विद्यार्थी, विद्यार्थीनी व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.

⚜️ इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.

⚜️ मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.

⚜️ व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.

⚜️ Library/Book Bank/Reding Comer, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.

⚜️ शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.

⚜️ शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

⚜️ मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.

तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर व MIS-Courdinator यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मुदतवाढ

 "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियान

 मुदतवाढ



विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत ..


संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४ २. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र. ४६४०, दिनांक २९/०७/२०२४


विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.


२/- सदर अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत शाळांकडून विविध उत्तोमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षक व विदयार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे. या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरुन त्याचे मूल्यांकन करणेसाठी पुढीलप्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४

ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत 

क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा.पर्यंत

ड) जिल्हा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं. ०५.०० वा. पर्यत

इ) मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं.०५.०० वा.पर्यत

 ई) विभाग : दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा. पर्यंत

उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत

२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक :


तरी, वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांकडून वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णयात नमूद समितीमार्फत त्याचे योग्य पध्दतीने मूल्यांकन केले जाईल यादृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाची PDF  हवी असल्यास खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गुणांकनाची कोरी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सौजन्य ~ राज मेश्राम सर

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गुणांकन भरलेली पीडीएफ {डेमो} डाउनलोड करण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान ~ मार्गदर्शिका प्रवीण वाव्हाळे सर PDF DOWNLOAD ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान PDF DOWNLOAD सौजन्य ~गोविंद तोटेवाड


सराव चाचणी 12 इंग्रजी स्कॉलरशिप

   सराव चाचणी क्रमांक 12

 इंग्रजी स्कॉलरशिप

सराव चाचणी इंग्रजी 12


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी इंग्रजी विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 11 इंग्रजी स्कॉलरशिप

  सराव चाचणी क्रमांक 11

 इंग्रजी स्कॉलरशिप

सराव चाचणी इंग्रजी 11


इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी इंग्रजी विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE


Thursday, August 29, 2024

पाहू तरी शरीराच्या आत

      पाहू तरी शरीराच्या आत

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1


पाहू तरी शरीराच्या आत



या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

छोटे आजार घरगुती उपचार

      छोटे आजार, घरगुती उपचार

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1


छोटे आजार घरगुती उपचार



या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

वस्त्र

     वस्त्र

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1

वस्त्र



या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

Wednesday, August 28, 2024

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम

 केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...

उल्हास नवभारत साक्षरता अभियान


विषयः- केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...


संदर्भः- १. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३


२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई दि.१४/१०/२०२२


उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र २ अन्वये, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावाणी सुरु करण्यात आलेलो आहे. केंद्र शासनाकडून "जन-जन साक्षर" व राज्य शासनाकडून "साक्षरतेकडून समृध्दीकडे" ही घोषवाक्ये देण्यात आलेली आहेत.


संदर्भ क्र.१ नुसार दि. ८ सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दि. १ सप्टेबर ते ८ सप्टेबर २०२४ या कालावधीमध्ये "साक्षरता सप्ताह" राबणिबाबत निर्णय केंद्रशासनाने घेतलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अमंलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या "साक्षरता सप्ताह" कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड/गाव/शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्रशासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत.


उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या "साक्षरता सप्ताह" कार्यक्रमाचौ आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्राणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालु झालेले नाहीत. अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रिय यंत्रणांमार्फत भेटी देऊन ८ सप्टेबर २०२४ या साक्षरता दिनी वर्ग सुरु करावेत व असाक्षरांचे अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे. तसेच असाक्षरांच्या FLNT परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करुन घ्यावी. साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करावा. साक्षरता वर्गातील अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधरणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग- १,२,३.४ ची मदत घेण्यात यावी.

शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. सर्व यांनी आपल्या जिल्हयामध्ये दिंनाक १ सप्टेबर ते ८ सप्टेबर या कालावधीत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती / निवडक फोटो यासह अहवाल दिनांक १०/९/२०२४ रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये directorscheme.mh@gmail.com या email वर न चूकता सादर करावा. जेणेकरुन केद्रशासनास सदरची माहिती / फोटो सादर करणे सोयीचे होईल.


साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नोंदवावा.


https://forms.gle/CYEpAiY46FJ5shy77



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



Tuesday, August 27, 2024

सराव चाचणी 15 गणित स्कॉलरशिप

 चाचणी क्रमांक 15

          गणित स्कॉलरशिप

सराव चाचणी 15 गणित

           इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी गणित विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

सराव चाचणी 14 गणित स्कॉलरशिप

 चाचणी क्रमांक 14

          गणित स्कॉलरशिप

सराव चाचणी 14 गणित

           इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी गणित विषयाची दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

मोलाचे अन्न

    मोलाचे अन्न

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1
मोलाचे अन्न

या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

हवा

    हवा

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1



या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

आहाराची पौष्टिकता

  आहाराची पौष्टिकता

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1
आहाराची पौष्टिकता



या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

Sunday, August 25, 2024

घरोघरी पाणी

  घरोघरी पाणी

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1

घरोघरी पाणी


या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

पिण्याचे पाणी

 पिण्याचे पाणी

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1

पिण्याचे पाणी


या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

साठवण पाण्याची

 साठवण पाण्याची

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1

साठवण पाण्याची

या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

सजीवांचे परस्परांशी नाते

 सजीवांचे परस्परांशी नाते

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग 1
सजीवांचे परस्परांशी नाते

या इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग एक मधील ऑनलाईन टेस्ट आहेत.


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

साप्ताहिक टेस्ट 2 स्कॉलरशिप.SMS

 साप्ताहिक टेस्ट 2

       इयत्ता पाचवी

शिक्षक मंच सातारा

शिक्षक मंच सातारा

         इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती साठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट शिक्षक मंच सातारा यांच्याकडून बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फक्त विषयाला टच करून आपण साप्ताहिक टेस्ट सोडू शकता.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता आठवी स्कॉलरशिप भाषा 7

 इयत्ता आठवी शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट 7

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा


इयत्ता आठवी शिष्यवृत्ती साठी दर्जेदार ऑनलाईन टेस्ट बनविण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सोडवावी. टेस्ट मध्ये महत्त्वाच्याच व संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. view score ला click करून निकाल हि पाहू शकता.


जर तुम्हाला इयत्ता आठवी शिष्यवृत्तीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर  ~ CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


        तुम्हाला जर NMMS च्या घटक वार ऑनलाइन टेस्ट सोडवायचे असतील तर विषयाला टच करा.

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE