SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, August 9, 2024

U dise+ वरील माहिती अद्यावत करणे

 सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

U dise+

विषयः सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

संदर्भः केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM SHRI या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे.

🕳️ सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी १००% विद्यार्थ्यांचे Promotion काम पूर्ण केल्याबदल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन !

🕳️ सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १,४२,५४७ विद्यार्थ्यांचे Promotion ची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदविली नसल्याचे दिसून आले आहे. तरी सदर माहिती तात्काळ नोदवावी.

सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ७,०५,६०६ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे.

🕳️ सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील २७,२८,६५८ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय Student Promotion Dropbox मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🕳️ इयत्ता १ली व इयत्ता ११वी मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.

🕳️तसेच Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.

➖ सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.

➖ द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.

➖ आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.

➖ विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.

➖ इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.

➖ मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.

➖ व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.

➖ Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.

➖ शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.

➖ शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.

तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे.

सोबत : जिल्हानिहाय Student Promotion व Dropbox अहवाल,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Udise+ Portal मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी New Entry मोबाईल वरून कशी करावी ~ 

CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️ मोबाईल वरून विद्यार्थ्यांचे यु-डायस प्लस मध्ये प्रमोशन कसे करावे हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.

CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖💐➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment