SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, August 30, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मुदतवाढ

 "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियान

 मुदतवाढ



विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान टप्पा-२ राबविणेबाबत ..


संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४ २. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र. ४६४०, दिनांक २९/०७/२०२४


विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.


२/- सदर अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत शाळांकडून विविध उत्तोमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षक व विदयार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे. या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरुन त्याचे मूल्यांकन करणेसाठी पुढीलप्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४

ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत 

क) तालुका : दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा.पर्यंत

ड) जिल्हा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं. ०५.०० वा. पर्यत

इ) मनपा : दि. २०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं.०५.०० वा.पर्यत

 ई) विभाग : दि. २५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं.०५.०० वा. पर्यंत

उ) राज्य : दि. ३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत

२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक :


तरी, वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांकडून वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णयात नमूद समितीमार्फत त्याचे योग्य पध्दतीने मूल्यांकन केले जाईल यादृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाची PDF  हवी असल्यास खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गुणांकनाची कोरी पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सौजन्य ~ राज मेश्राम सर

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गुणांकन भरलेली पीडीएफ {डेमो} डाउनलोड करण्यासाठी ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान ~ मार्गदर्शिका प्रवीण वाव्हाळे सर PDF DOWNLOAD ~ CLICK HERE

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान PDF DOWNLOAD सौजन्य ~गोविंद तोटेवाड


No comments:

Post a Comment