SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, August 10, 2024

बदली अपडेट

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत.



विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत.

संदर्भ:- १. निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.४३७/६/१/आयएनएसटी/ईसीआय/एफयुएनसीटी/एमसीसी/२०२४, दि.३१.०७.२०२४ २.मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालय पत्र क्र. जीईएन- २०२४/प्र.क.०६/२४/निवडणूक, दि.०५.०८.२०२४.

महोदय,

मा. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील दि.३१.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या/ पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडुन तपशिल उपलब्ध करुन घेण्याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे उपरोक्त संदर्भ क्र.२ येथील दि.०५.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

२. त्यानुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजाचा तपशील तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा.

३. यासंदर्भात नमूद करण्यात येते की, ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील उपरोक्त अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - २०२४ साठी सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये काही कालावधी नंतर / वारंवार बदल केल्याचे तसेच रद्द केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या बदल्यांबाबत न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागले आहे. ही बाब विचारात घेवून, आपल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणारे निवडणूक विषयक कामकाज कालपरत्वे बदलण्यात येणार नाही, याबाबत

खातरजमा करावी, तसेच अपरिहार्य कारणास्तव संबंधित अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये बदल केल्यास विभागास तातडीने अवगत करावे, ही विनंती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा



No comments:

Post a Comment