1 नोव्हे 2025 पूर्वी नियुक्त जुनी पेन्शन आर्थिक भार तपासणी समिती
प्रस्तावना-
मा. मुख्यमंत्री महोदय, यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २२/०७/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित विधानपरिषद सदस्य यांनी ऐनवेळचा विषय म्हणून दिनांक १/११/२००५ पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दि.१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेसंदर्भाने विषय मांडला. सदर विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंकी, तत्कालीन आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखालील "सम्यक विचार समिती" ने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरुन बैठकीस उपस्थित विधानपरिषद सदस्यामार्फत आक्षेप घेण्यात आला होता. त्यास अनुसरुन दिनांक १/११/२००५ पूर्वी उप्पा अनुदानावर असलेल्या व दि.१/११/२००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबतीत आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता समिती गठित करण्याचे निदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
सदर शासन निर्णयाचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment