SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, October 22, 2022

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती व पौराणिक कथा | dhanteras information

 धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती व पौराणिक कथा | dhanteras information in 



धनत्रयोदशी या सणाला दीपावली मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती व धन याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदिशीचा चा दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीला आपल्याकडे असलेल्या धनाची म्हणजेच सोने, चांदी, दागिने यांची पूजा केली जाते व कुटुंबाच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते.

धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्यातील तेराव्या दिवशी असते.

धनत्रयोदशीच्या पौराणिक कथा

हेमा नावाचा एक राजा असतो. त्याच्या पुत्राला अकाली मृत्यूचा श्राप मिळालेला असतो. या श्रापानुसार राजाचा मुलगा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा व राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या श्रापामुळे खूप दुःखी असतात.

परंतु आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुखे उपभोगावी म्हणून त्याचे ते लग्नही लावून देतात. परंतु लग्नाच्या चौथ्याच दिवशी त्याच्या मुलाचा मृत्यू होणार ही गोष्ट त्याच्या पत्नीला समजल्यानंतर पत्नी त्याला त्या रात्री झोपू देत नाही. त्याच्याभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. तसेच महालामध्ये सर्व ठिकाणी दिवे लावून रोषणाई केली जाते व महाल हा अतिशय सुंदर रित्या सजवला जातो.

यम देवता महाला मध्ये प्रवेश करू शकणार नाही याची सर्व काळजी घेतली जाते. इकडे त्याची पत्नी एक ना अनेक युक्त करून आपल्या पतीला जागे ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि शेवटी ती वेळ येतेच यम सापाच्या रूपाने महालाकडे देऊ लागते मात्र जेव्हा तो महालात सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाची डोळे सोने आणि चांदीच्या दागिन्याने दिपून जातात त्याला समोरचे स्पष्ट दिसत नाही या कारणास्तव यमाला परत जावे लागते. अशाप्रकारे त्या राजपुत्राचे प्राण वाचवले जातात या दिवसाला यमदीपदान असेही म्हटले जाते या परंपरेमध्ये दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला केले जाते आणि त्या दिव्याला नमस्कार केला जातो.

धनत्रयोदशीची दुसरी पौराणिक कथा

महर्षी दुर्वासा यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी असूर व सूर यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा त्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी व धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आला. धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार समजला जातो सर्व वेदांमध्ये ते निष्णात होते. मंत्र, तंत्राचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अमृत रूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले. आणि म्हणून धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हटले जाते.

म्हणून या दिवशी धन्वंतरी चे पूजन केले जाते. तसेच या दिवशी लक्ष्मीचेही पूजन केले जाते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

वसुबारस सणाची माहिती वाचायची असेल तर खाली टच करा.




Friday, October 21, 2022

निबंध डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 आज आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध पाहणार आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या निबंधाचा वापर आपण भाषणासाठी ही करू शकता. निबंधाच्या खाली आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी ही देण्यात आलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


            भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशामधील महू या गावांमध्ये एका तार्‍याचा जन्म झाला. तो तारा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी हे होते. त्यांच्या आईच्या नावावरून पाळण्यात त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले.

             बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरीबीची असल्यामुळे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम ए ,पीएचडी ही पदवी घेतली व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.

             भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान अवेहेलना त्यांना सहन होईना. 1920 साली राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने 'मूकनायक' हे पाक्षिक काढले. 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले.

          15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य भारताचे कायदामंत्री झाले. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हणून ते ओळखले ओळखू लागले. त्यांनी अन टचेबल हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती.

 अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 2 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.





Thursday, October 20, 2022

समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या }

 समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या }



                         समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या } हा अतिशय सोपा वाटणारा घटक परंतु परीक्षेमध्ये या घटकात आपले मार्क जाण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे या घटकाची अचूकता वाढवणे गरजेचे आहे.

                 समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या } या प्रश्न प्रकारात दिलेल्या प्रश्नाकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागते नंतर दिलेल्या चार पर्यायातून प्रश्नाकृती सारखी तंतोतंत दिसणारी अगदी तिच्यासारखीच हुबेहूब आकृती शोधून काढावी लागते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या } या घटकाची अचूकता वाढवायची असेल तर खालील व्हिडिओ नक्की पहा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर समान पद ओळखणे { तंतोतंत आकृत्या } या घटकावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खालील बटनाला टच करा.



जल प्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब )

 जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब )



जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब आपण पाण्याजवळ जेव्हा उभे राहतो तेव्हा आपली प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेले आपल्याला दिसते यालाच आपण जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) म्हणतो.

वस्तूचे जेव्हा पाण्यात प्रतिबिंब पडते तेव्हा ते उलटे दिसते. म्हणजेच वस्तूची वरची बाजू खाली व खालची बाजू वर दिसते.

⚜️ अंकांचा,अक्षरांचा वापर

जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) या प्रकारात मराठी अथवा इंग्रजी अक्षरांचा वापर केला जातो तसेच एक अंकी दोन अंकी संख्यांचाही वापर केला जातो. यामध्ये अक्षर किंवा अंक देऊन त्याचे जलप्रतिबिंब चार पर्याया मधून शोधण्यास सांगितले जाते.

⚜️ आकृत्यांचा वापर

जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) या प्रकारात काही आकृत्या दिल्या जातात व त्याच्याखाली जल प्रतिबिंब दाखवले जाते यामध्ये जलप्रतिबिंबची अचूक आकृती चार पर्याय मधून निवडण्यास सांगितले जाते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) घटक ट्रिकने अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खाली दिलेल्या चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


जलप्रतिबिंब ( पाण्यातील प्रतिबिंब ) या घटकावरील सराव चाचणी सोडवायची असल्यास खालील बटनाला टच करा.




आरशातील प्रतिमा

 ⚜️ आरशातील प्रतिमा ⚜️



          आपण दररोज आरसा वापरतो. आपली प्रतिमा आरशामध्ये दिसते. आपण तिचे कधी काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे का? प्रत्यक्षात आपली आणि आपली आरशातील प्रतिमा यामध्ये काय बदल दिसतो? आपले डोके आणि आपले हात त्यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला असे दिसून येते की, आपले डोके वरच्या बाजूला तसेच आहे. पण आपला उजवा हात आरशाच्या प्रतिमेच्या डावीकडे दिसतो. आणि आपला डावा हात प्रतिमेच्या उजवीकडे दिसतो.

⚜️ एखाद्या वस्तूची किंवा आकृतीचे आरशातील प्रतिमा पाहताना मूळ वस्तूची डावी व उजवी बाजू यांची अदलाबदल झालेली दिसते.

⚜️ या प्रकारच्या प्रश्नात अक्षर, अंक आणि आकृत्यांचा वापर केलेला असतो. आरशातील प्रतिमेमुळे विद्यार्थ्यांचे विचार क्षमता, निरीक्षण क्षमता आणि तर्क क्षमता वाढण्यास मदत होते.

⚜️ इंग्रजीतील A , H , I , M , O , U , T , V , W , X , Y या अक्षराच्या आरशातील प्रतिमेत काहीही फरक होत नसतो.

⚜️ अंकांचा / अक्षरांचा वापर 👉

         या प्रश्न प्रकारात अंकी प्रतिमा साठी मराठी अंक एक अंकी, दोन अंकी किंवा इंग्रजी एक अंकी, दोन अंकी संख्यांचा वापर केला जातो.

           अक्षरी प्रतिमांसाठी मराठी मुळाक्षरे किंवा इंग्रजी अक्षरांचा वापर करून प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी चार पर्याय क्रमांक दिले जातात.

⚜️ आकृत्यांचा वापर 👉

या प्रश्न प्रकारात आकृत्यांचा वापर केला जातो किंवा घड्याळाचाही वापर केला जातो एखादी चित्र अथवा आकृती देऊन त्याची आरशातील प्रतिमा ओळखण्यास सांगितले जाते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


आरशातील प्रतिमा हा घटक ट्रिकने समजण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर आरशातील प्रतिमा या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील बटनाला टच करा




Wednesday, October 19, 2022

घर दर्शक शब्द / Ghardarshak shabd

🏠 घर दर्शक शब्द 🏠



              ज्याप्रमाणे माणसांच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण घर म्हणतो. त्याप्रमाणे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात. काही प्राणी, पक्षी स्वतःचे घर बनवतात, तर काहींची घरे बनवली जातात, तर काही निसर्गनिर्मित घरांमध्ये आश्रय घेतात. विशेषता मानवाने आपल्या उपयोगासाठी पाळलेले प्राणी, पक्षी हे मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. तर रानावनात मोकाट फिरणारी जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांच्या घरासाठी वेगवेगळी नावे दिली जातात. त्या नावांना आपण घर दर्शक शब्द असे म्हणतो.

तर चला पाहूयात काही पशु पक्षी व प्राण्यांचे घर दर्शक शब्द

⚜️ कोंबडीचे      👉 खुराडे

⚜️ मधमाशांचे.   👉पोळे 

⚜️ हत्तीचा.         👉 हत्तीखाना / अंबारखाना

⚜️ वाघाची         👉 गुहा / दाट झाडी

⚜️ घोड्याचा       👉 तबेला पागा

⚜️ गाय / बैल      👉 गोठा 

⚜️ कावळ्याचे     👉 घरटे 

⚜️ सुगरणीचा      👉 खोपा 

⚜️ सिंहाची          👉 गुहा

⚜️ पक्षाचे            👉 घरटे

⚜️ पोपटाचा         👉 पिंजरा / ढोली

⚜️कोळीचे            👉 जाळे

⚜️मुंग्या साप         👉 वारूळ

⚜️ उंदीर               👉 बीड

⚜️घुबडाची।          👉 डोली

⚜️माणसाचे।         👉 घर

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर घर दर्शक शब्द चा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

घर दर्शक शब्द या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असल्यास खाली टच करा.



Tuesday, October 18, 2022

पिल्लू दर्शक शब्द | pillu darshak shabd | Babies of Animal

 पिल्लू दर्शक शब्द



माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या पिल्लांना ठराविक नावाने उल्लेख करतात. प्राणी व त्यांचे पिल्ले पुढीलप्रमाणे आहेत.

स्पर्धा परीक्षेमध्ये पिल्लू दर्शक शब्द (pillu darshak shabd | Babies of Animal ) यावर अनेक वेळा प्रश्न विचारले जातात विशेषतः दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्वच परीक्षेत पिल्लू दर्शक शब्द (pillu darshak shabd | Babies of Animal) विचारले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पिल्लू दर्शक शब्द ( pillu darshak shabd | Babies of Animal ) माहित असणे गरजेचे आहे.

गाईचे 👉 वासरू

 घोड्याचे 👉 शिंगरू

 मांजराचे 👉 पिल्लू

 म्हशीचे 👉 रेडकू

 पक्षांचे 👉 पिल्लू 

सिंहाचा 👉 छावा

 गाढवाचे 👉 तटू / शिंगरू 

शेळीचे 👉 करडू 

वाघाचा 👉 बच्चा / बछडा

 मेंढीचे 👉 कोकरू

 हरणाचे 👉 पाडस / शावक

 माणसाचे 👉 बाळ

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर पिल्लू दर्शक शब्द चा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर पिल्लू दर्शक शब्द या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.





निबंध - डॉ बाबासाहेब आंबेडकर

⚜️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚜️



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशात झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार म्हणून काम करीत असत. आंबेडकर हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे आपत्य होते.

              सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांचे वडील सातारा येथे राहण्यास आले. आंबेडकर हे जातीने महार म्हणजे अस्पृश्य होते. त्यामुळे त्यांना जातपात या विषयावरून खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणी त्यांना शाळेत शिकण्यासाठी वेगळे बसावे लागे.

           परंतु ते बुद्धीने खूप हुशार होते. त्यामुळे ते कष्टांना अजिबात न डगमगता इंग्लंड येथे जाऊन शिकले. तिथे उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर आंबेडकरांनी दलितांसाठी चळवळ उभारली. दलितांसाठी आणि मागास जातीच्या लोकांसाठी वेगळा मतदार संघ हवा आणि आरक्षण हवे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

            स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याचे काम नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवले. त्यांनी खूप अभ्यास करून भारताची राज्यघटना निर्माण केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

         हिंदू धर्मातील जाचक रूढींना कंटाळून आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवले. असे ते महामानव होते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली टच करा.




🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खालील बटनाला टच करा.




Monday, October 17, 2022

दीपावली निबंध

🎇  दीपावली 🎆



           दीपावली हा दिव्यांचा सण आहे. निराशेवर आशेचा विजयोत्सव म्हणजे दीपावली साजरी केली जाते. आपल्या देशात अनेक मोठे सण, मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणांपैकी एक म्हणजे दीपावली. हा दिवस रावणावरील भगवान श्री रामाचा विजय म्हणून किंवा वाईट वर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

          कार्तिक मास अमावस्येच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राक्षसाचा वध करून आणि चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. प्रभू श्री राम यांच्या स्वागतासाठी आयुध्येतील लोकांनी दिवे पेटवून आनंदोत्सव साजरा केला होता. ही परंपरा आजही कायम आहे. दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर लोक आपली घरी स्वच्छ करतात. दिवाळीचा फराळ म्हणून चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा असे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

         दीपावली चा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. सर्व लोक नवीन कपडे घालतात आणि घरात लक्ष्मी देवीची पूजा करतात. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून या दिवशी दिवे लावून वातावरण प्रकाशमान केले जाते.

      दीपावली या सणाचे मुख्य पाच दिवस आहेत. ते म्हणजे धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, पाडवा आणि भाऊबीज हे सर्व सण सर्वच लोक आनंदाने साजरे करतात. या दिवसांमध्ये लोक नवीन कपडे खरेदी करता. तर लहान मुले फटाके वाजवून ही दिवाळी साजरी करतात.

    दिवाळीचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो. नवीन जीवन जगण्यासाठी उत्साह प्रदान करतो. पण काही लोक या दिवशी जोरजोरात मोठे फटाके फोडून पर्यावरण दूषित करतात. आपण हे टाळून पर्यावरणाला जपून हा सण साजरा केला पाहिजे. तरच हा सण सार्थकी लागेल.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर निबंध वाचायचे असतील तर खाली टच करा.




चार बोटांचे अंतर

⚜️ चार बोटांचे अंतर ⚜️


             अकबर बादशहाने बिरबलाचे नियुक्ती दरबारात केल्यावर आपल्या अंगच्या हुशारीने व गुणांनी त्याची बादशहाने मन जिंकून घेतले. लवकरच बादशहाने त्याची वजीर म्हणून नेमणूक केली. मुख्य वजीराला या काळी न्यायदानाचे काम करावे लागेल लागत असे. बिरबलाला खऱ्या खोट्याचा निवाडा करता येते की नाही हे तपासून पाहण्यासाठी अकबराने त्याला विचारले की ,खरे व खोटे यात किती अंतर आहे?

         बिरबलाने जराही वेळ न लावता लगेच सांगितले हुजूर, फक्त चार बोटांचे अंतर आहे.

        बादशाह आश्चर्यचकित झाला. व त्याने बिरबलाला लगेच विचारले हे अंतर कसे काय ठरविले?

       बादशहाचे समाधान करण्यासाठी बिरबलाने सांगितले हुजूर, जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत होते निश्चितपणे खरे असते. पण जे आपण केवळ कानांनी ऐकतो ते खोटे असते. डोळे व कान यात चार बोटांचे अंतर असल्याने खरे व खोटे यातही चार बोटांचे अंतर आहे.

बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशाह खूप खुश झाला. व त्यांनी बिरबलाला विश्वासाने वजीराचे वस्त्रे अर्पण केली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर बोधकथा वाचायच्या असतील तर खाली टच करा.



राज्याची नजर

⚜️ राज्याची नजर ⚜️



              बांगलादेशाच्या राजाने बिरबलाची बरीच कीर्ती ऐकली होती. बिरबलाची समक्ष भेट व्हावी व त्याच्या चातुर्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याने अकबर बादशहाला पत्र लिहिले व बिरबलाला आपल्या भेटीसाठी पाठविण्याचे विनंती केली. ही विनंती अकबर बादशहाणी मोठ्या आनंदाने कबूल केली. व त्याप्रमाणे बिरबलाला चार दिवस बांगलादेशाला सहल करण्यासाठी आणि त्यातल्या राजाची भेट घेण्यासाठी पाठविले. बांग्लादेशच्या राजाने बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः सारखे दिसणारे अजून चार जण गोळा केले. व त्या सर्वांना हुबेहूब राजासारखीच उंची वस्त्रे घालण्यास दिली. पाच सिंहासनावर खरा राजा व चार तोतेये राजे बसले. व नंतर बिरबलाला आत येण्यास सांगितले.

        बिरबल आत आल्यावर त्यांनी क्षण दोन क्षण सर्वांकडे पाहिले. व नंतर सरळ खऱ्या राजासमोर जाऊन त्यास हात मिळवला. राजा आश्चर्याने थक्क झाला. व त्याने विचारले 'बिरबल आम्ही सर्वजण वेशभूषा, रंगभूषा करून हुबेहूब एकसारखे दिसत असतानाही तू खरा राजा आहे हे कसे काय ओळखले?'

             बिरबल उत्तरला हे तर अगदी सोपे होते. महाराज, बाकीचे सर्व केवळ कपडे घालून राजे झाले होते. पण मनाने ते तुमचे नोकर असल्याने ते अवघडून व खांदे झुकून बसले होते. पण तुम्ही खरे राजे असल्यामुळे ताट बसला होता व तुमची नजर सरळ माझ्या डोळ्यांना डोळे देत होती. या उलट या चारी तोतया राजांच्या नजरा तुमच्याकडे लागल्या होत्या.

            बिरबलाचे बारीक निरीक्षण व तर्क ज्ञानाची अचूकता लक्षात घेऊन बांगलादेशाच्या राजाने त्यास हिरे ,मोती व एक मुकुट अर्पण करून सत्कार केला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर बोधकथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.



NMMS परीक्षा माहिती


⚜️ राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३





सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्याथ्र्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्याथ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत :- दिनांक १०/१० / २०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ. ७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत.

विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी. • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी..

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्यांची निवड :- विद्याथ्र्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.


विषयाचे नाव

बौध्दिक क्षमता चाचणी Mental Abilily Test) (MAT

शालेय क्षमता चाचणी 

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

परीक्षेसाठी विषय :- 

सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

(a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

 b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण ( गुण- ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५)

३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. a. सामान्य विज्ञान ३५ गुण - भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c.गणित २० गुण.

माध्यम :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी योजना परीक्षा (NMMS) मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्याथ्र्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे / चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे / व्हाईटनर / खाडाखोड करून नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :- 

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोठा व विद्याथ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्याना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील.

तपशील

ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे

निकाल घोषित करणे :- सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

१०. शिष्यवृत्ती दर :-

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

> शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वीतून इ. १० वी व इ. ११ वीतून इ. १२ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.

> इ.१० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. ( SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५%

गुणांची आवश्यकता आहे.)

> सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

११. अनधिकृततेबाबत इशारा

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर एन एम एम एस या परीक्षेची माहितीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.




Sunday, October 16, 2022

सणांची माहिती ~ वसुबारस

⚜️ वसुबारस ⚜️



दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारस या सणाने होते.

 आपल्याला मराठी सणात संस्कृती बद्दल आणि साजरे करत असलेल्या सणांबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे आपल्या ज्ञानात, स्वतःच्या कामाचा वस्तूंचा आणि सजीवांचा समावेश होत असतो. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो. त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस. महाराष्ट्रात वसुबारस या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात होते.

भारतात दिवाळी हा सण खूप प्रसिद्ध आहे आणि तो मोठ्या थाटाने साजरा केला जातो. विविध राज्यातील संस्कृती प्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे तसेच गाई गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावराबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस.

वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी साजरी केली जातो. या द्वादशीस गोवस्य द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसु या शब्दाचे पूर्ण अर्थ सांगितला जातात वसु म्हणजे सूर्य व सु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन, आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे 'सर्वांमध्ये वास करणारा' असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस.

गाई हा हिंदू संस्कृतीतील पवित्र प्राणी आहे. त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे. वसुबारस या दिवशी गायीच्या तिच्या पाडसासह आणि आता तर त्याच्यासोबत इतरही प्राण्यांची ही सायंकाळी पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गाईला आणि वासराला खाऊ घालतात. 

त्या अगोदर गाईच्या व वासराच्या पायावर पाणी घालून व त्याचबरोबर हळदीकुंकू वाहून त्याची आरती ओवाळणी जाते. वसुबारस या दिवशी ज्यांच्या घरी काही गुरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते. सर्व देवतांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी या दिवशी दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील करतात. वसुबारस या दिवसानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे दिवस दिवाळी या सणात साजरे केले जातात. संपूर्ण रोषणाईने आसमंत उजळून टाकणारा हा सण आणि त्यामध्ये वसुबारस या दिवसांनी होणारी सुरुवात म्हणजे सर्वत्र अल्हाददायक वातावरण असते. तसेच या मंगल दिनी सर्वजण विविध देवतांची ,कुलदेवतांची ,ग्रामदैवतांची या सर्वांची उपासना करतात.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर दिवाळी हा निबंध वाचायचा असेल तर खालील टच करा.




निबंध दिवाळी

 दिवाळी



               दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. भारतात सर्वच लहान थोर लोक तो साजरा करतात. या सणाच्या वेळेस दाराबाहेर पणत्या लावतात. तसेच आकाश कंदील टांतागत आणि सुंदर रांगोळ्या सुद्धा काढतात. कार्तिक महिन्यात येणाऱ्या ह्या सणाचे एकूण पाच दिवस मानले जातात. पहिल्या दिवशी असते वसुबारस, दुसऱ्या दिवशी असते धनत्रयोदशी, तर तिसऱ्या दिवशी असते नरक चतुर्दशी. चौथ्या दिवशी पाडवा आणि लक्ष्मीपूजन असते. तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी बंधू हिशोबाच्या चोपड्यांची पूजा करतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. 

              दिवाळीत मुलांना शाळेला सुट्टी असते. नोकरदार लोकांना बोनस मिळतो. या सणाच्या निमित्ताने नवीन कपड्यांची खरेदी होते. घराला नवीन रंग दिला जातो. घराची साफसफाई केली जाते. गृहिणी चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा, शेव असे अनेक गोडाचे आणि तिखटाचे प्रकार करतात.

              दिवाळीच्या वेळेस फटाके फोडले जातात. त्यामुळे हवा प्रदूषित आणि ध्वनी प्रदूषण होते. तसेच फटाक्यांच्या कारखान्यात लहान मुलांना कामाला लावले जाते. म्हणून फटाके बंद केले पाहिजेत.

 असा हा दिवाळीचा सण मला खूप आवडतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला तेच करा.



Saturday, October 15, 2022

भाषण ~ डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम

 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम



          भारताच्या 11 वे राष्ट्रपती, भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तमिळनाडू येथील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या आईचे नाव अशियम्मा होते.

            त्यांनी देशाचे 11 वे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत कारभार पाहिला. 'Low aim is a crime' असे म्हणत मोठी स्वप्ने पहा आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा. असा मंत्र त्यांनी युवकांना दिला. 

           त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण व भारताचा सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न हा किताब त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची जयंती म्हणजे 15 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र राज्यातील

 सर्व शाळा, महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.




Wednesday, October 5, 2022

निबंध ~ अवकाशयात्री - सुनीता विल्यम्स

 ⚜️अवकाशयात्री ~ सुनीता विल्यम्स⚜️



           माणसाने आजपर्यंत अफाट प्रगती केली. आता तर तो अवकाशाचे वेद घेऊ लागला आहे. दूर दूरच्या ग्रहताऱ्यांवर जाण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. विविध ग्रहताऱ्यांवर जाण्यासाठी माणसाने आता तर अंतराळात अवकाश स्थानक उभारले आहे. या अवकाश स्थानकात अनेक अवकाशवीर जातात आणि तेथे आवश्यक अशी कामे करतात.

               अशीच एक अवकाशयात्री म्हणजेच सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी झाला. तिला विज्ञानाची आवड होती. 1998 साली तिने अवकाश यात्रा शास्त्राच्या शिक्षणाची सुरुवात केली 12 डिसेंबर 2006 ला ती अवकाश स्थानकात जाऊन पोहोचली. तिने एकूण 194 दिवस अवकाश स्थानकात विविध कामे केली. इतका प्रदीर्घ काळ अवकाशात राहण्याचा मान मिळवणारी जगातील ती पहिली महिला ठरली आहे.

             अवकाश प्रवास पूर्ण झाल्यावर सप्टेंबर 2007 मध्ये ती भारतात आली होती. तेव्हा तिने आपले रोमांचक अनुभव सर्वांना ऐकवले. त्यामुळे भारतातील युवकांना आता अंतराळ प्रवासाची ओढ लागली आहे. अज्ञात गोष्टींचा वेध घेतल्यानेच माणसाची प्रगती होते. हा संदेश सुनीताने आपल्या कर्तुत्वाद्वारे दिला आहे.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Tuesday, October 4, 2022

बोधकथा छान अद्दल घडली

 ⚜️छान अद्दल घडली⚜️



          एका जंगलात एका झाडावर वानर राहत होता. अगदी एकटाच होता तो. त्याला कोणीही नव्हते. बिचाऱ्याला अगदी कंटाळा आला.

          एकटा एकटाच किती दिवस राहणार मग त्याने ठरवले. आता दुसरीकडे कुठेतरी निघून जावे. त्याच झाडावर एका ठिकाणी घारही राहत होती. घारीला वाटले वानर चांगले काहीतरी खायला आणतो आणि आपल्यालाही देतो. तो जर येथून निघून गेला तर आपल्याला कोणीच सोबती राहणार नाही. म्हणून घार वानराला म्हणते 'दादा तुही येथे रहा. मी तुला रोज गोष्टी सांगत जाईल. वानर ठीक आहे म्हणते आणि तेथेच राहू लागते. 

               वानर रोज काहीतरी नवनवीन खायला आणायचे व त्यातील थोडे घारीलाही द्यायचे. घार त्याला गोष्ट सांगायची परंतु घारीच्या मनात वाईट विचार आले. आपण माकडाने सर्वच आणलेले खावे असे तिला वाटू लागले. माकड बाहेर गेली की घर माकडाच्या घरातील इतर पदार्थ खायची एकदा हे माकडाच्या लक्षात आले. 

               माकडाने कुठून तरी जळते कोळशाची निखारे आणले. घारीला वाटले हे तर मांसाचे तुकडे आहेत. माकड बाहेर गेले की घारीने ते तुकडे गडबडीत आपल्या तोंडामध्ये घेतले. तोच घारीचे तोंड एकदम भाजून निघाले. अशा पद्धतीने घारीला चोरी करण्याची चांगलीच शिक्षा मिळाली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर बोधकथा वाचायचे असतील तर खालील बटनाला टच करा.



Monday, October 3, 2022

दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन

 ⚜️दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन⚜️



⚜️वाचन पद्धती

कोणत्याही संख्येचे वाचन करताना उजवीकडून गट करून वाचल्यास सोयीचे जाते

म्हणजेच एकक दशक चा एक गट शतक चा एक गट त्यानंतर डावीकडे दोन दोन स्थानांचा एक गट करावा

उदाहरण

5, 17, 12,11,715

पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा



⚜️ संख्या लेखन

✍️ संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर असलेल्या संख्येतील योग्य क्रम लिहा.

✍️ एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर शून्य हा अंक लिहावा.

अकरा हजार पंधरा 👉  11,015

या ठिकाणी शतक स्थानी अंक नाही म्हणून आपण शून्य लिहिला आहे.


✍️ संख्यांमध्ये डावीकडील प्रत्येक स्थान 10 पटीने वाढत जाते तर उजवीकडील प्रत्येक स्थान 10 पटीने कमी होत जाते.

1 हजार ~ 1 हजार × 10 = 10 हजार


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🧐 तुम्हाला जर दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🧐 तुम्हाला जर पाच अंकी संख्या पर्यंतचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


🧐 तुम्हाला जर तीन अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन करण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


✍️ तुम्हाला जर दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन या घटकाची सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील बटनाला टच करा.


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠