SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label बोधकथा. Show all posts
Showing posts with label बोधकथा. Show all posts

Tuesday, November 29, 2022

बोधकथा चुकीचा मार्ग

 ⚜️ चुकीचा मार्ग ⚜️



              एक अतिशय सुंदर जंगल रान होते. त्या रानात एक पांढरा शुभ्र ससा राहात होता. ससा म्हटला म्हणजे तो फक्त हिरवे गवत खाऊन जीवन जगणारा प्राणी. त्या सशाला कोवळे गवत फार आवडायचे. त्यामुळे तो रानात जास्त कष्ट न घेता आपल्या घराजवळील कोवळे आणि लुसलुशीत हिरवे गवत खाऊन पोट भरत असे.

              ससा स्वभावाने अतिशय साधा व सरळ होता. त्याला जंगली प्राण्यांच्या वृत्तीबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यांच्या स्वभावाची त्याला जरादेखील कल्पना नव्हती. कारण जंगलात अनेक प्रकारचे प्राणी रहात असतात.

               एकंदरीत खरी गोष्ट अशी होती की, त्या सशावर एक लबाड लांडगा टपून बसलेला होता. त्या सशाची शिकार करून त्याचे मऊ मांस खाण्याची त्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा जेव्हा लांडगा सशाला पाहायचा तेव्हा तेव्हा त्या लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटत असे व मनात एक विचार येत असे की, आपण ह्या सशाला केव्हा खाऊ. परंतु तो ससा काही लांडग्याच्या हाती लागत नव्हता. एकदा त्या लांडग्याने तशी संधी साधलीच व सशावर नजर ठेवून त्याने त्याचा पाठलाग केला; सशाला हे माहीत नव्हते. ससा आपल्याच नादात रानात गवत खात फिरत असताना अचानकपणे लांडग्याने त्याच्यावर झडप घातली. परंतु सशाचे दैव आडवे आले व तो सुदैवाने लांडग्याच्या तावडीतून सुटून जीव घेऊन पळत सुटला.

                 ससा पळत होता. त्याला फक्त आपला जीव वाचविण्याची चिंता होती. जीव घेऊन पळण्याच्या नादात आपण कुठे जात आहोत याचे त्याला अजिबात भान नव्हते. कारण अशा प्रसंगी कोणालाही भान रहात नाही. पळता पळता त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत खूप अंधार होता. तेथे तो आपला जीव धरून बसला. त्याला हायसे वाटले. आपला जीव वाचल्याचे त्याला समाधान वाटले. परंतु ते समाधान थोड्याच वेळपर्यंत टिकले. कारण त्याला लगेच वाघाची डरकाळी ऐकू आली. ती ऐकून सशाची पाचावर धारण बसली. कारण वाघ म्हटल्यानंतर जंगलाचा राजा ! म्हणून ससा घाबरला.

                 वाघाने सशाला आपल्या गुहेत पाहून आनंद व्यक्त केला. कारण त्याला आयती शिकार मिळणार होती. त्याप्रमाणे वाघाने एका क्षणात सशाचा चट्टामट्टा केला. म्हणजेच सशाला खाऊन टाकले.

⚜️ तात्पर्य ⚜️

 प्रत्येक माणसाने एखाद्या छोट्याशा संकटातून बाहेर पडण्याकरिता सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेतला व तो चुकीच्या मार्गाने गेला तर हमखासपणे तो मनुष्य मोठ्या संकटात सापडतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 

Sunday, November 13, 2022

बोधकथा ~ राष्ट्रभक्ती

  ⚜️ राष्ट्रभक्ती ⚜️



                   नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'आझाद हिंद सेनेची' स्थापना केली. आझाद हिंद सेनेच्या खर्चासाठी देणग्या देण्याचे आवाहन जनतेला केले. त्या आवाहनाला जनतेने मुक्त प्रतिसाद दिला. नेताजींच्या प्रत्येक सभेत नोटाचा ढीग जमत असे. अनेक स्त्रिया अंगावरचे दागिने काढून ते निधीत टाकत.

               अशीच एक सभा संपल्यानंतर एक वृध्द स्त्री काठीच्या साह्याने चालत सुभाषबाबूंच्या जवळ आली. नमस्कार करुन तिने एक, दोन, पाच  रुपयांच्या चुरगाळलेल्या नोटा सुभाषबाबुंच्या हातात दिल्या. म्हणाली, 'लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे, मी म्हातारी इतकंच देऊ शकते ! सुभाष बाबूंना त्या म्हातारीचं औदार्य बघून भरुन आले. ते म्हणाले, 'माते, मी हे पैसे घेणार नाही, ते तुझ्याकडे ठेव. तुलाच त्याची जास्त गरज आहे.

             वृध्देने ते घ्यायचे नाकारले. म्हणाली, 'मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी.

             नेताजींनी तिला नमस्कार केला. त्यांची खात्री पटली की, ज्या देशातील माणसं इतकी देशभक्त आहेत, तो देश जास्त दिवस पारतंत्र्यात राहूच शकणार नाही.

तात्पर्य

 देशभक्ती ही पैशाने ठरत नसून ती दातृत्वाने व मनाने ठरते

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर निबंध वाचन करायचं असेल तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️



Tuesday, October 4, 2022

बोधकथा छान अद्दल घडली

 ⚜️छान अद्दल घडली⚜️



          एका जंगलात एका झाडावर वानर राहत होता. अगदी एकटाच होता तो. त्याला कोणीही नव्हते. बिचाऱ्याला अगदी कंटाळा आला.

          एकटा एकटाच किती दिवस राहणार मग त्याने ठरवले. आता दुसरीकडे कुठेतरी निघून जावे. त्याच झाडावर एका ठिकाणी घारही राहत होती. घारीला वाटले वानर चांगले काहीतरी खायला आणतो आणि आपल्यालाही देतो. तो जर येथून निघून गेला तर आपल्याला कोणीच सोबती राहणार नाही. म्हणून घार वानराला म्हणते 'दादा तुही येथे रहा. मी तुला रोज गोष्टी सांगत जाईल. वानर ठीक आहे म्हणते आणि तेथेच राहू लागते. 

               वानर रोज काहीतरी नवनवीन खायला आणायचे व त्यातील थोडे घारीलाही द्यायचे. घार त्याला गोष्ट सांगायची परंतु घारीच्या मनात वाईट विचार आले. आपण माकडाने सर्वच आणलेले खावे असे तिला वाटू लागले. माकड बाहेर गेली की घर माकडाच्या घरातील इतर पदार्थ खायची एकदा हे माकडाच्या लक्षात आले. 

               माकडाने कुठून तरी जळते कोळशाची निखारे आणले. घारीला वाटले हे तर मांसाचे तुकडे आहेत. माकड बाहेर गेले की घारीने ते तुकडे गडबडीत आपल्या तोंडामध्ये घेतले. तोच घारीचे तोंड एकदम भाजून निघाले. अशा पद्धतीने घारीला चोरी करण्याची चांगलीच शिक्षा मिळाली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर इतर बोधकथा वाचायचे असतील तर खालील बटनाला टच करा.



Saturday, October 1, 2022

बोधकथा ~ ससाणा आणि कोकिळा

 ⚜️ससाणा आणि कोकिळा⚜️



एक भुकेलेला ससाणा भक्षासाठी फिरत असता त्याला एक कोकिळा सापडला. तो कोकिळा त्याला म्हणाला 'भाऊ मला सोड, मी इतका लहान आहे की मला खाल्ल्याने तुझं पोट नक्कीच भरणार नाही. मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल.'

 ससाणा म्हणाला 'तू कितीही लहान असलास तरी, माझ्यासारख्या भुकेलेल्या प्राण्याला तुझ्या मासाचा बराच उपयोग होईल. शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्या इतका मी नक्कीच मूर्ख नाही .


🕳️ तात्पर्य 🕳️

हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथांचे वाचन करण्यासाठी खाली टच करा.


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️


निबंध वाचन करण्यासाठी खालील बटनाला टच करा.




Friday, September 23, 2022

बोधकथा~ विद्येची किंमत

⚜️ विद्येची किंमत ⚜️



एकदा रामकृष्ण परमहंस शिष्यांसह गंगा स्नानासाठी गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध महापुरुष तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले. व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले,' तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.

शिष्यांनी रामकृष्ण यांना सांगितले. रामकृष्ण म्हणाले त्यांना सांग, 'तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा सुद्धा नाही.' शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला. म्हणाला,' पुन्हा असे म्हणालात तर, तुम्हाला भस्म करून टाकीन.'

रामकृष्ण पुन्हा तसेच म्हटले. तेव्हा प्रत्यक्ष सिद्ध पुरुषाने त्यांना येऊन विचारले,' याचा अर्थ काय आहे?'

रामकृष्ण म्हणाले,' नावाडी सुद्धा दोन आण्यात पहिल्या तिराला घेऊन जातो. त्याचा इतरांना उपयोग होतो. पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. ज्या विद्येचा लोकांना उपयोग नाही तिची किंमत शून्य आहे. म्हणून तुमच्या या विद्येची किंमत दोन आणे सुद्धा नाही.'

तात्पर्य

माणसाने आपल्या विद्येचा कर्तुत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा तरच त्या व्यक्तीला अर्थ प्राप्त होतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Sunday, September 11, 2022

बोधकथा ~ सत्य धर्म

 

⚜️ सत्य धर्म ⚜️  



             कवी कनकदास यांचा जन्म विजयनगर साम्राज्यातील बंकापूर प्रांतातील एका गरीब कुटुंबात झाला. तो आपला बहुतेक वेळ आपल्या प्रमुख देवतेसाठी श्लोक रचण्यात घालवत असे. गरिबांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असत. एकदा त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले भांडे सापडले. ही बाब त्यांनी सर्वांना सांगितल्यावर भांडे मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र एकही मालक पुढे आला नाही.
                अखेर ते भांडे कनकदासच्या हवाली करण्यात आले . तो पैसा स्वतःवर खर्च करणे कनकदासाने पाप मानले. बराच विचार केल्यावर त्यातील अर्धा पैसा त्यांनी गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला आणि निम्म्याने कुलदेवता आदि केशवांचे मंदिर बांधले. यानंतरही थोडेफार पैसे वाचले. आपल्या कुटुंबातील एका सदस्याने यातील काही भाग आपल्या कुटुंबाच्या गरजांवर का खर्च करू नये.
               हे ऐकून ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना म्हणाले, 'कष्ट न करता मिळालेला पैसा स्वतःच्या सुखासाठी वापरणे हे धर्माविरुद्ध आहे. मी माझ्या कवितांद्वारे लोकांना धार्मिकतेचा उपदेश करतो, मग मी स्वतः अधर्म कसा करू? मी माझ्या कुटुंबाच्या गरजांसाठी कठोर परिश्रम करून पैसे कमवू शकतो. तुम्हा सर्वांना माहित आहे की मला कविता खूप आवडतात. माझी ही क्षमता सुधारून मी पैसे कमवले पाहिजेत. त्या पैशाचा वापर माझ्यासाठी योग्य आहे का? हे ऐकून त्यांच्या घरातील सदस्य शांत झाले. कनकदासांनी उरलेली संपत्ती अपंगांमध्ये वाटून दिली.

Thursday, September 8, 2022

बोधकथा ~ एकाग्रतेचे महत्व

 

⚜️ एकाग्रतेचे महत्व ⚜️ 


 
   वीर बहादूर सर्कसमध्ये काम करायचे. तो धोकादायक सिंहाला काही वेळातच पाळीव करत असे. एके दिवशी एक तरुण सर्कशीत आला. प्राण्यांच्या हावभाव आणि हालचालींवर तो संशोधन करत होता.
   तो वीर बहादूरला म्हणाला, "मी तुझे नाव खूप ऐकले आहे. तुम्ही धोकादायक सिंह कसे पाळता?" वीर बहादूर हसले आणि म्हणाले, 'हे बघा, हे रहस्य नाही. तुम्ही योग्य वेळी आला आहात. आज मला धोकादायक सिंह पाळायचा आहे. त्याने अनेकांना आपला बळी बनवले आहे. तू तिथे माझ्याबरोबर चाल आणि मी हे कसे करतो ते स्वतःच पहा.' त्या तरुणाने पाहिले की वीर बहादूर आपल्या सोबत कोणतेही हत्यार किंवा बचावासाठी इतर कोणतीही वस्तू घेऊन गेला नाही. त्याने नुकतेच एक लाकडी स्टूल सोबत घेतले आहे. वीर बहादूर धोकादायक सिंहाला स्टूलवरून कसे नियंत्रित करू शकतील असा प्रश्न त्याला पडला. वीर बहादूरकडे सिंह गर्जना करताच तो स्टूलचे पाय सिंहाकडे वळवायचे.
   सिंह आपले लक्ष स्टूलच्या चार पायांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि असहाय्य होतो.लक्ष विभागल्यामुळे, थोड्याच वेळात सिंह वीर बहादूरचा पाळीव प्राणी बनला.यानंतर वीर बहादूर त्या तरुणाला म्हणाले, 'अनेकदा असे घडते की एकाग्रता असलेला माणूस सामान्य असतानाही यशस्वी होतो, परंतु असाधारण माणूसही विचलित झाल्यामुळे सिंहासारखा पराभूत होतो.' या तरुणाने तेव्हाच ठरवले की जीवनातील प्रत्येक गोष्ट एकाग्रतेने करायची.


  ⚜️ तात्पर्य ⚜️

 एकाग्रतेने अभ्यास केला की जास्त गुण मिळवता येतात.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

Wednesday, September 7, 2022

बोधकथा ~ निवड

 

⚜️ निवड ⚜️


    
                  दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.

                ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा प्रेम यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.

तात्पर्य -

जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव हि येते.

Tuesday, September 6, 2022

बोधकथा ~ विश्वासाला तडा

 

⚜️विश्वासाला तडा⚜️


    
        रघु नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते.

         भरत नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला.

       भरतने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. भरतने रघुच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला.

          दुसरीकडून रघु घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा भरत जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रघुने ते पाहिले व तो भरतपाशी थांबला.

       भरत रघुला म्‍हणाला, ’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’

       रघुला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच भरत त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला.

       दुस-या दिवशी भरत रघुकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’

         यावर रघु शांतपणे भरतला म्‍हणाला,’’

         मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे.

      ⚜️ तात्पर्य ⚜️

:-गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खराच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.