⚜️ राष्ट्रभक्ती ⚜️
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'आझाद हिंद सेनेची' स्थापना केली. आझाद हिंद सेनेच्या खर्चासाठी देणग्या देण्याचे आवाहन जनतेला केले. त्या आवाहनाला जनतेने मुक्त प्रतिसाद दिला. नेताजींच्या प्रत्येक सभेत नोटाचा ढीग जमत असे. अनेक स्त्रिया अंगावरचे दागिने काढून ते निधीत टाकत.
अशीच एक सभा संपल्यानंतर एक वृध्द स्त्री काठीच्या साह्याने चालत सुभाषबाबूंच्या जवळ आली. नमस्कार करुन तिने एक, दोन, पाच रुपयांच्या चुरगाळलेल्या नोटा सुभाषबाबुंच्या हातात दिल्या. म्हणाली, 'लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे, मी म्हातारी इतकंच देऊ शकते ! सुभाष बाबूंना त्या म्हातारीचं औदार्य बघून भरुन आले. ते म्हणाले, 'माते, मी हे पैसे घेणार नाही, ते तुझ्याकडे ठेव. तुलाच त्याची जास्त गरज आहे.
वृध्देने ते घ्यायचे नाकारले. म्हणाली, 'मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी.
नेताजींनी तिला नमस्कार केला. त्यांची खात्री पटली की, ज्या देशातील माणसं इतकी देशभक्त आहेत, तो देश जास्त दिवस पारतंत्र्यात राहूच शकणार नाही.
तात्पर्य
देशभक्ती ही पैशाने ठरत नसून ती दातृत्वाने व मनाने ठरते
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर बोधकथा वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर निबंध वाचन करायचं असेल तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment