SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Sunday, November 6, 2022

पदावली

 ⚜️ पदावली ⚜️




 ⚜️ पदावली म्हणजे एखाद्या उदाहरणात बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार यांपैकी दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया असणे.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ एखाद्या उदाहरणात फक्त बेरीज व वजाबाकी असेल तर क्रिया आहे त्याच क्रमाने कराव्यात.

 उदा. : 20 + 8 - 6

        = 28 - 6 

        = 22

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ एखाद्या उदाहरणात गुणाकार व भागाकाराच्या क्रिया करायच्या असतील तर त्या क्रिया आहे त्याच क्रमाने कराव्यात.

उदा. : 30 ÷ 6 x 4 

       =  5 x 4 

       = 20 हे उत्तर.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ एखाद्या उदाहरणात बेरीज व वजाबाकी यापैकी एक क्रिया आणि गुणाकार व भागाकार यापैकी एक क्रिया असेल तर गुणाकार व भागाकार यांपैकी जी क्रिया असेल ती प्रथम करावी व नंतर बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करावी.

उदा - 25 - 20 ÷ 4

       = 25 - 5

       = 20

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ दिलेल्या पदावलीमध्ये चार क्रियांपैकी कोणत्याही तीन क्रिया दिल्या असता प्रथम गुणाकार किंवा भागाकार आहे त्या क्रमाने व नंतर बेरीज व वजाबाकी आहे त्या क्रमाने करावी.

उदा 👉 15 + 10 ÷ 2 - 10

         = 15 + 5 - 10

         =  20 - 10

         =  10 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ पदावलीमध्ये कंसात क्रिया दिल्यास प्रथम कंस सोडवावा व नंतरच्या क्रिया | पदावलीच्या नियमाप्रमाणे कराव्यात.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

पदावली हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 पदावली या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

Whatsapp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा.



No comments:

Post a Comment