SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, November 8, 2022

निबंध - पंडित जवाहरलाल नेहरू

  ⚜️ पंडित जवाहरलाल नेहरू ⚜️



              भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूप राणी हे होते. घरच्या श्रीमंतीमुळे त्यांचे बालपण खूप लाडात गेले. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेली. केंब्रिज येथे त्यांनी तीन वर्ष अभ्यास केला.

             मुले नेहरूंना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. मुलांना चाचा नेहरू खूप आवडायचे. ते मुलांत खूप रमायचे. 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा वाढदिवस मुलांना या दिवशी खूप आनंद व्हायचा. त्यादिवशी चाचा नेहरू मुलांना मिठाई देत. मुले त्यांच्या भोवती आनंदाने नाचत, बागडत. त्यांचा जन्मदिवस 'बालदिन' म्हणून आजही साजरा केला जातो. मुलांप्रमाणे गुलाबाचे फुलही चाचा नेहरूंना खूप आवडायचे.

                  चाचा नेहरूंचे भारतभूमीवर जसे प्रेम होते. तसे नद्यांवर, झाडाझुडपांवर खूप प्रेम होते. भारतभूमीला स्वतंत्र्य करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. त्यांना 9 वेळा तुरुंगवास भोगला. त्यांनी तरुणांना संघटित केले. त्यांना स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली. स्वतः खूप हाल अपेष्टा सहन करून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

             स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जग त्यांना 'शांतिदूत' म्हणून ओळखू लागले. 27 मे 1964 मध्ये चाचा नेहरूंचा मृत्यू झाला.

पंडित नेहरूंना अलिप्तवादाचे उद्गाते व पंचशील तत्त्वांचे जनक म्हटले जाते. पंडित नेहरू सच्चे देशभक्त होते. त्यांचे माय भूमीवर अलोट प्रेम होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या अखेरच्या इच्छेतून मातृभूमीबद्दल असलेली तळमळ व्यक्त होते. ती इच्छा पुढील प्रमाणे आहे.

         "माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी. उरलेली रक्षा उंच विमानातून आकाशात न्यावी ती मातृभूमीवर पसरून टाकावी. ज्या ठिकाणी शेतकरी काबाडकष्ट करतो तेथे पडावी."

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंधाचे वाचन करण्यासाठी खालील बटनाला टच करा.







No comments:

Post a Comment