SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, November 9, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संपूर्ण माहिती

   ⚜️पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती ⚜️



       या लेखांमध्ये आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती ही निबंध रुपात व काही मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत.

                   पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घराणे मूळचे कश्मीरचे. बालपणापासून त्यांच्या घराण्यात श्रीमंती होती. त्यामुळे बालपण सुखात गेले. घरात पाश्चिमात्य संस्कृती नांदत होती. पण आईने मात्र भारतीय संस्कृती हृदयात अंकित केली होती.

प्राथमिक इंग्रजीचे शिक्षण घरात शिक्षक बोलवून केले. आणि माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला ठेवले. तेथे त्यांनी हँरो, केंब्रिज व ट्रिनिटी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. शिक्षणाबरोबर इतर अनेक ग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले. त्यामुळे अनेक देशभक्तांचे जीवन त्यांना समजू लागले. त्यांचे विचार उदारमतवादी बनले. आपल्या देशासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे असे त्यांना जाणवू लागले.

                कमलादेवी कौल नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. उच्च शिक्षण घेण्यासाठी पंडित नेहरू इंग्लंडला गेले. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 1912 साली भारतात आल्यावर त्यांनी अलाबाद उच्च न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू केला. जवाहरलाल नेहरूंवर गांधीजींच्या विचाराचा प्रभाव होता. सहाजिकच त्यांचे वकिलीत मन रमेना. गांधीजींप्रमाणेच आपणही देश वासियांसाठी वाहून घेतले पाहिजे असे नेहरूंची मानसिकता तयार झाली. 1916 साली त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. या कन्येचे नाव इंदिरा प्रियदर्शनी असे ठेवण्यात आले.

             लखनऊ येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांची महात्मा गांधींची भेट झाली. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. गांधीजींच्या मार्गदर्शनावरून जायचे असे त्यांनी निश्चय केला. सत्याग्रह अहिंसेचा मार्ग त्यांना पटला. स्वदेशाबद्दलचे प्रेम अधिक जागृत झाले. असहकाराचा मार्ग वापरला तर इंग्रज या देशातून जाऊ शकतील असा त्यांना विश्वास वाटू लागला.

महात्मा गांधीजींनी 1921 साली असहकारतेची चळवळ सुरू केली. त्या वेळापासून 1942 च्या 'भारत छोडो' चळवळीपर्यंत जवाहरलाल यांनी भाग घेतला. आयुष्याची पंधरा वर्षे त्यांनी कारावासात काढली. देश प्रेमासाठी ती सजा त्यांनी आनंदाने भोगली. तेथे असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. सायमन कमिशन भारतात आले त्यावेळी काँग्रेसने त्याविरुद्ध लखनऊ येथे निदर्शने केली. त्यात जवाहरलाल नेहरू यांचा सहभाग होता 1929 साली लाहोरला काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्याच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू होते. या अधिवेशनात भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करूनही घेतला.

            15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. देशाची फाळणी झाली. स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. स्वातंत्र भारतापुढे अनेक मोठमोठे प्रश्न होते. अज्ञान, बेकारी, दुष्काळ निर्वासित असे अनेक गंभीर प्रश्न त्यांनी सोडवले. त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता. भारतात अनेक खेडी आहेत व शेती करतात हे जाणून त्यांनी शेतीची प्रगती करण्यासाठी अनेक योजना राबवल्या. स्वतंत्र भारत हा प्रगती पथावर आणण्याच्या उद्देशाने नेहरूंनी पंचवार्षिक योजना आखल्या व अमलात आणल्या.

             पंडित नेहरू हे कवी मनाचे होते. त्यांनी तुरुंगातून इंद्राजींना पाठवलेली पत्रे याची साक्ष आहे. त्यांना गुलाबाची फुले फार आवडत असत. ते कोटाला नेहमी गुलाबाची फुले लावत असत. ते लहान मुलांवर फार प्रेम करत. जगभर त्यांना फुलामुलांचे नेहरू म्हणून ओळखले जाते. 14 नोव्हेंबर हा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. परदेशातील मुलांमध्येही ते रमून जात होते. लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. सातत्याने ते 18 वर्षे भारताचे पंतप्रधान होते. 1952 साली राष्ट्रपतींनी त्यांना 'भारतरत्न' किताब देऊन सन्मानित केले. आधुनिक भारताची जडणघडण करण्यात पंडित नेहरूंचे जे योगदान दिले ते अविस्मरणीय असेच आहे. अशा या थोर मानवाचा मृत्यू 27 मे 1964 साली झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी महत्त्वाचे मुद्दे व घटनाक्रम

⚜️ जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. पंडित नेहरू यांना मुले चाचा नेहरु म्हणत.

⚜️ वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूपराणी असे आहे. केंब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी विज्ञानाची पदवी 1910 ला घेतली. 1912 ला लंडनमधून बॅरिस्टर झाले व अलाहाबाद उच्च न्यायालयात

⚜️ वडिलांसोबत ज्युनियरशीप सुरु केली.

⚜️ 1916 ला राजकारणात प्रवेश करावा या उद्देशाने त्यांनी गांधीजींची भेट घेतली.

⚜️ 1916-1917 ला डॉ. अँनि बेझंट यांच्या होमरुल लीगमध्ये सहभाग. 1919 मध्ये ते होमरुल चळवळीचे अध्यक्ष बनले.

⚜️ 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला त्यासाठी सहा महिने कारावासाची शिक्षा भोगली.

⚜️ 1927 मध्ये त्यांनी रशियाचा दौरा केला. तेथील समाजवादी प्रयोगाने प्रभावित झाले. 1928 मध्ये सायमन कमिशनला विरोध केला. 1929 मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनले.

⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत महत्वाचा सहभाग घेतला... 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत भाग घेतला.

⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात त्यांचा सहभाग महत्वाचा होता. काँग्रेसने ही चळवळ सुरु करावी यासाठी त्यांनी गांधीजींचे मन वळविले. ब्रिटीश शासनाने त्यांना ताबडतोब अटक केली व अहमदनगर जेलमध्ये ठेवले. तेथे त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.

⚜️ 1946 च्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली.

⚜️ 1946 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत ते पंतप्रधानपदावर आरुढ होते.

⚜️ त्यांनी परराष्ट्रसंबंधविषयक पंचशील सिध्दांत मांडला. (सविस्तर बघा या पुस्तकातील प्रकरण - परराष्ट्र संबंध)

⚜️ त्यांनी भारतात आर्थिक नियोजन सुरु केले. पंचवार्षिक योजना राबविल्या. भारतात लोकशाही पध्दत रुजविण्यासाठी कष्ट घेतले.

⚜️ लेखन - अॅन ऑटोबायोग्राफी (आत्मचरित्र), डिस्कव्हरी ऑफ इंडिया, गीम्प्लेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी त्यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

⚜️ पंडीत नेहरूंना 9 वेळा कारावास भोगावा लागला. त्यांनाच अलिप्ततावादाचे उद्गाते व पंचशील तत्वांचे जनक म्हटले जाते.

⚜️ 27 मे 1964 मध्ये त्यांचे निधन झाले.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
पंडित जवाहरलाल नेहरू यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निबंध वाचायचा असेल तर खालील चित्राला टच करा.



No comments:

Post a Comment