आचार्य विनोबा भावे
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी गोगोते पेन जिल्हा रायगड येथे झाला त्यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे हे होत.
त्यांचे बालपण एका खेडेगावातील सुसंस्कारित घरात गेले. 'विनू, नेहमी दुसऱ्याचा विचार आधी करावा, ' हा बहुमोल संस्कार छोट्या विनूवर आईने केला. त्यामुळेच त्यांना पुढे भूदानाची कल्पना सुचली असावी.
बापूजी म्हणजे महात्मा गांधीजी हे विसाव्या शतकातील एक महान नेते. त्यांनी एखाद्याला आपला सच्चा चेला, पहिला अनुयायी ठरवणे हा केवढा मोठा मान आहे! हा मान विनायक नरहर भावे यांना मिळाला होता. बापूंनीच त्यांना 'विनोबा' म्हणून प्रथम संबोधले आणि मग ते सर्वांचेच विनोबा झाले!
गणित आणि तत्त्वज्ञान हे विनोबांचे अत्यंत आवडते विषय होते. त्यांनी आजन्म देशभक्तीचे व्रत स्वीकारले. पवनारच्या आश्रमात राहणारे विनोबा सतत पदयात्रा करत. हरिजनोद्धार, साक्षरताप्रसार, गोरगरिबांची सेवा हीच त्यांनी आपली ध्येये मानली होती. अशा या देशभक्ताने सर्वोदयाचा ध्यास घेतला होता.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment