जसे दिसते तसे नसते
एकदा एक होता कोल्हा. तो एकदा एका गावात आला. त्याला कुत्र्यांनी पाहिले. ते जोरजोरात भुंकू लागले. कोल्हा घाबरला आणि एका घरात घुसला. घरात घुसल्याने तो एका पिंपात पडला. त्या पिंपात निळीचे पाणी होते. कोल्हा संपूर्ण निळा झाला. तो कसाबसा बाहेर पडला आणि जंगलात पळून गेला.
जंगलात त्याला इतर प्राण्यांनी पाहिल्यावर सगळे घाबरले. कोल्ह्याच्या हे लक्षात आले. तो लबाड होता. तो त्यांना म्हणाला, "मला देवाने पाठवले आहे. मी आता तुमचा राजा आहे."
सगळ्या प्राण्यांनी मग एक सभा घेतली. निळा कोल्हा ऐटीत बसला होता. तेवढ्यात दुरून कोल्हेकुई ऐकू आली. निळा कोल्हापण ओरडू लागला. अरे, हा तर साधा कोल्हा! कोल्ह्याचे खरे रूप सगळ्यांना कळले. वाघाने एक डरकाळी फोडली. कोल्हा घाबरला आणि पळून गेला. सगळे प्राणी खो खो हसू लागले.
तात्पर्य -
जो खोटेपणाने वागतो, त्याची फजिती होते.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment