⚜️महात्मा ज्योतिबा फुले माहिती⚜️
जोतिबा फुले यांचा जन्म पुण्यात 11 एप्रिल 1827 रोजी झाला. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. ते एक वर्षाचे असताना आईचे निधन झाले. त्यामुळे वडिलांनी त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ केला. जोतीबा याचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील कटगूण होय. आडनाव गोऱ्हे. जोतिबांच्या वडिलांनी पुण्यात येऊन फुलांचा व्यापार करीत असत त्यामुळे फुले हे आडनाव सुरू झाले.
वयाच्या सातव्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले. बालपणापासून ते अतिशय हुशार होते. अभ्यासाची त्यांना मनापासून आवड होती. काही कर्मठ मंडळींनी त्यांना शिक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी जोतिबाला शाळेतून काढून शेतात काम करावयास लावले. शेतात ते काम करीत असताना पुस्तक वाचत होते.
जोतिबांची शिक्षणाप्रती आवड लक्षात येताच एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना पाश्चात्त्य शिक्षण देणार मिशनरी शाळेत शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या हाती थॉम पेनचा 'राईटस ऑफ मॅन' (मानवाचे हक्क) हा ग्रंथ पडला. 'राईटस ऑफ मॅन' या ग्रंथात मांडलेल्या विचारांस प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला. भारतातील समाजव्यवस्थेतील विषमतेला जो धार्मिक आधार देण्यात आला होता, त्यावर जोतिबांनी प्रखर शब्दात टीका केली. विशेषत: हिंदू समाजात जी विषमता निर्माण झालेल आहे, ती प्रस्थापित समाजानेच निर्माण केली अशी जोतिबांची ठाम धारणा बनली.
पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव जोतिबांवर पडल्याने सामाजिक सुधारणा घडवून आणणे अतिशय गरजेचेहरा आहे. शूद्र, स्त्रिया, शोषित समाजाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर समाजातील घटकांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः स्त्रियांना साक्षर व सुशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी जोतिबांची पक्की धारणा बनली. समाजातील विषमता ईश्वरनिर्मित नसून मानवानेच निर्माण केलेली आहे समता प्रस्थापित करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केले पाहिजेत असे ठाम मत जोतिबांनी मांडले. मुलींना शिक्षण देण्यासाठी जोतीबांनी पुण्यातील भिडे वाड्यात १८४८ साली मुलींसाठी शाळा काढली
शाळेमध्ये शिकावयास व शिकवायला येण्यास कोणी तयार होईना. त्यामुळे जोतिबांनी आपली पत्नी सावित्रीला शिकवून तयार केले. सावित्रीबाईंनीच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास चालना दिली. जोतीबांचे हे कार्य पाहून समाजातील काही मंडळींनी त्यांना छळाण्यास सुरुवान केली; पण दोघे, पती-पत्नी डगमगले नाहीत. त्यांनी सर्वांसाठी मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा काढली. त्यांनी आपल्य हौदावर पाणी भरण्यास सर्वांना परवानगी दिली.
शेतकरी व मजुरांची स्थिती अतिशय गरीब होती. जोतिबांन मजुरांच्या मुलांना शाळेत घेऊन शिकविले. १८७३ मध्ये त्यांनी 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन केली. सर्व विश्वाचा चालक ईश्वर हा एक आहे आणि त्याने निर्माण केलेली सर्व माणसे समान आहेत, ही तत्त्वे समाजाला शिकविली. ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. 'जातिभेद', 'दिवेकरार', 'गुलामगिरी', 'सार्वजनिक सत्य धर्म प्रकाश', 'शेतकऱ्यांचा आसूड' अशी पुस्तके लिहिली. मुंबईत त्यांचा सत्कार होऊन महात्मा ही पदवी देण्यात आली. १९ व्या शतकात महाराष्ट्रात समाजजागृती करण्याचे, बहुजन समाजाला | हक्क मिळविण्यासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य जोतिबांनी केले. अशा या थोर समाजसुधारकाचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment