⚜️ मौलाना अबुल कलाम आझाद ⚜️
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 साली झाला. अकबराच्या दरबारात जलालुद्दीन हे महान पंडित होते. मौलाना आझाद हे त्यांचे वंशज होते. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन 1857 साली यात्रेसाठी भारत सोडून मक्केला जाऊन स्थायिक झाले.
मौलाना आझाद यांचा जन्म नदाडा ,{मक्का} येथे झाला. काही वर्षांनी हे कुटुंब भारतात परत आले. कलकत्ता शहरात त्यांनी वास्तव्य केले. आझाद लहानपणापासून हुशार होते. त्यांचे शिक्षण इजिप्त मधील कैरो येथील 'अल् अजहर' या विद्यापीठात झाले. सातत्याने ते अभ्यासात मग्न असत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी अरबी, फारसी व उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यांची निरीक्षण शक्ती अतिशय सूक्ष्म होती. वयाच्या विसाव्या वर्षी इजिप्त, तुर्कस्थान, इराण इत्यादी देशांचा प्रवास केला. प्रवासामुळे त्यांची अनुभव संपन्नता वाढली.
त्यांचे मूळ नाव मोहिमुद्दीन अहंमद परंतु अबुल कलाम म्हणजे 'वाचस्पती' अथवा 'पंडित' या अर्थाचे नाव त्यांना त्यांच्या अलौकिक बुद्धीमुळे प्राप्त झाले. आपणास मिळालेले ज्ञान हे सर्व समाजाच्या उपयोगी यावे असे त्यांना आतून जाणवू लागले. त्यामुळे लिहिण्याची स्फूर्ती आतून प्रकट होऊ लागली.
प्रारंभी आझाद यांनी कलकत्त्यातील वृत्तपत्रातून आपले विचार प्रकट करावयास सुरुवात केली. वृत्तपत्रातील लेखन लोकांना आवडू लागले. 1905 साली ते लखनऊ येथील 'अल् नदवा' या वृत्तपत्राचे संपादक झाले. या वृत्तपत्रातून निर्भीडपणे जहाल विचार मांडत होते. 1912 साली त्यांनी कलकत्ता येथे स्वतःचे 'अल् हिलाल' नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यामुळे त्यांना आपले विचार अधिक स्पष्ट स्वरूपात मांडता येऊ लागले.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात काही उलट सुलट प्रवाह वाहत होते. त्यामुळे लोकांचा अधिक गोंधळ होत होता. मौलाना आझाद यांनी प्रतिगामी विचारांवर टीका केली. हिंदुस्तान हा एक आहे व या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा आणि इंग्रजांना आपल्या देशात परत पाठवावे असे सडेतोड विचार ते वृत्तपत्रातून मांडत होते. अल् हिलाल मधून ब्रिटिशांच्या अत्याचारांवर ते जोरदार टीका करत होते. ब्रिटिश शासन आजादांच्या टिकेमुळे संतप्त झाले. त्यांच्यावर दहा हजार रुपये दंड ठोठावला. त्यामुळे ते वृत्तपत्र बंद पडले. मात्र मौलाना आझाद कधीही शांत बसले नाहीत.
त्यांनी 'अल् बलाग' नावाचे दुसरे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रातून ते इंग्रजी शासनावर जहाल टीका करत होते. इंग्रजांचा हिंदुस्थानावर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. त्यांनी मांडलेल्या विचारांमुळे मुसलमान समाजात जागरूकता निर्माण झाली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना स्थानबद्ध केले. 1915 ते 1919 पर्यंतचे कारागृहात होते. त्या काळात त्यांनी कुराणाच्या सटीक उर्दू भाषांतरणाची काम पूर्ण केले. रांची येथील त्यांची स्थानबद्धता संपली. आझाद यांनी देशबंधू दास यांच्याबरोबर जोमाने कार्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघांनाही कारावासाची शिक्षा भोगावे लागली.
1923 साली दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. 1942 च्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा शिक्षा झाली. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या फाळणीसाठी त्यांनी नाईलाजास्तव मान्यता दिली. 1947 ते 1958 पर्यंत आजाद हे काँग्रेसच्या राजकारणामध्ये समन्वयकवादी भूमिका बजावत होते. 'तरजुमानुल कोरान' या कुराणाच्या उर्दू अनुवादामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. भारताच्या मंत्रिमंडळामध्ये ते शिक्षण मंत्री झाले. सतत अकरा वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवले. हिंदू आणि मुसलमानांचे ऐक्य रहावे ही त्यांची सद्भावना होती. मृत्यूनंतर इंडिया विन्स फ्रीडम ही त्यांच्या आत्मचरित्रातील 33 पाने 1980 साली प्रसिद्ध करण्यात आली. त्यांचा मृत्यू 22 फेब्रुवारी 1958 साली झाला.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटनाक्रम
⚜️ जन्म 11 नोव्हेंबर 1888, मक्का येथे झाला.
⚜️ पूर्ण नाव - मुहीयुद्दीन महमंद खैरुद्दीन
⚜️ मौलाना आझाद हे अफगाणी उलेमांच्या परिवाराशी संबंध असणारे होते. त्यांचे पुर्वज बाबराच्या वेळी भारतात आले.
⚜️ त्यांचे कुटुंब 1857 ला भारत सोडून मक्का येथे गेले होते. त्यांचे वडिल 1890 ला पुन्हा भारतात परतले.
⚜️ कलकत्ता येथे एक मुस्लीम विद्वान म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे बरेचसे शिक्षण हे घरी व मशिदीत इस्लामी पध्दतीने झाले.
⚜️ याशिवाय तत्वज्ञान, इतिहास, गणित, भाषा यांचे शिक्षण विविध गुरूंकडून घेतले.
⚜️ 1905 साली ते मध्य आशियात गेले. त्यांनी अनेक मुस्लिम देशांना भेटी दिल्या. कैरो येथील अल् अझर विद्यापिठालाही भेट दिली.
⚜️ 1906 ला मक्का येथे मुल्लामौलवींद्वारे त्यांचा सत्कार व अबुल कलाम ही पदवी बहाल केली गेली. आझाद हे त्यांचे टोपण नाव होते.
⚜️ दिल्ली येथे 1920 ला गांधीजींची भेट घेतली व काँग्रेसमध्ये सामील झाले.
⚜️ 1920 च्या असहकार चळवळीत सहभाग. 1923 च्या दिल्ली काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनात सहभाग.
⚜️ 1940 ते 1946 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
⚜️ 1942 च्या मुंबई काँग्रेस कमेटी अधिवेशनात मौलाना आझादांच्या अध्यक्षतेखाली चलेजावचा ठराव मंजूर करण्यात आला.
⚜️ त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्न केले. वेगळ्या पाकिस्तानला विरोध केला.
⚜️ 1947 च्या अंतरिम सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते.
⚜️ त्यांची वृत्तपत्रे - अल् हिलाल, अल् बिलाग
⚜️ भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) व विद्यापिठ अनुदान आयोग (UGC) यांच्या स्थापनेचे श्रेय त्यांनाच दिले जाते.
⚜️ त्यांनी 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला होता.
⚜️ मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केलेले लेखन - इंडिया विन्स फ्रिडम, गुब्बारे खातीर, आझाद ऑन पाकिस्तान, ताझकिराह, आयडियाज ऑफ अ नेशन इ.
⚜️ मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन 22 फेब्रुवारी 1958 ला झाले.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment