⚜️ इंदिरा गांधी ⚜️
इंदिरा गांधी ह्या पंडित नेहरू आणि कमला नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद येथे झाला. त्या लहान असताना पंडितजी बराच काळ तुरुंगात असत कारण ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते. तर आईला क्षयरोग झाल्यामुळे तिला विश्रामधामात ठेवलेले होते. त्यामुळे इंदिराजींचे बाळपण एकाकी स्थितीत गेले. परंतु पंडित नेहरू नेहमी आपल्या कन्येला तुरूंगातून पत्रे पाठवत असत. त्या पत्रांतूनच त्या बापलेकीतील नाते घट्ट होत गेले.
पंडितजी आणि गांधीजी ह्यांच्याकडे त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यामुळे नेहरूंच्या पश्चात् लालबहादुर शास्त्री ह्यांचे अचानक निधन झाले तेव्हा इंदिरा गांधी ह्याच भारताच्या तिस-या पंतप्रधान बनल्या.
त्यांच्या पतीचे नाव फिरोझ गांधी असे होते आणि मुलांची नावे राजीव आणि संजय अशी होती.
१९७२ साली पाकिस्तानशी युद्ध करून त्यांनी बांगला देश ह्या नव्या देशाची निर्मिती केली. म्हणून त्यांना दुर्गादिवी अशी पदवी लोकांनी दिली.
त्या खूप जिद्दी, करारी आणि कणखर पंतप्रधान होत्या. ३० ऑक्टोबर, १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांची हत्या केली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इंदिरा गांधी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
सराव चाचणी सोडवण्यासाठी करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment