SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, November 7, 2022

ग्रहण माहिती

 ⚜️ ग्रहण ⚜️



ग्रहण हे दोन प्रकारचे असते.

 1) चंद्रग्रहण

a} खंडग्रास चंद्रग्रहण

b} खग्रास चंद्रग्रहण

 2) सूर्यग्रहण 

a} खंडग्रास सूर्यग्रहण 

b} खग्रास सूर्यग्रहण

c} कंकणाकृती सूर्यग्रहण

चंद्रग्रहण

 खंडग्रास चंद्रग्रहण - पृथ्वीच्या चंद्रावरील सावलीमूळे चंद्राचा काही भाग झाकतो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.

खग्रास चंद्रग्रहण - पृथ्वीच्या सावलीमुळे संपूर्ण चंद्र झाकतो त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.



⚜️ चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते.

⚜️ सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येला घडते.

⚜️ अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.

सूर्यग्रहण

सूर्यग्रहणात पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो यालाच सूर्यग्रहण. म्हणतात.

सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 107 मिनीटे असतो.

⚜️ खंडग्रास सूर्यग्रहण - चंद्राच्या पृथ्वीवरील उपच्छायेमुळे सुर्याचा काही. भागच झाकला जातो यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.


⚜️ खग्रास सूर्यग्रहण - चंद्राच्या पृथ्वीवरील प्रच्छायेने संपूर्ण सुर्य झाकला जातो यालाच खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 

सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनीटे 20 सेकंद.



⚜️ कंकणाकृती सूर्यग्रहण - चंद्राच्या अपभू स्थितीत चंद्राची सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. चंद्राच्या प्रच्छायेमुळे सूर्याचा मधलाच भाग. झाकतो यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

No comments:

Post a Comment