⚜️ इंदिरा गांधी ⚜️
अलाहाबाद हे प्रसिद्ध शहर. येथे गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा संगम आहे. या गावात इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917रोजी झाला. दिवाळीचा उत्सव चालू असताना इंदिरा गांधी जन्मल्या) वडील जवाहरलाल आणि आईचे नाव कमला. आजोबा मोतीलाल नेहरू. यांच्यापासून राजकीय वारसा लाभला होता. त्यांच्या घराण्यात देशभक्ती नांदत होती. वडिलांनी नाव इंदिरा ठेवले होते; परंतु त्याच्या जोडीला 'प्रियदर्शनी' म्हणत. (आजोबा, वडील यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावे लागत होते त्यामुळे इंदिराजी यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले. अलाहाबाद येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले .
इंदिराजी पुण्यात आल्या आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्या वेळी लाठी, हुतुतू, लेझीम, पर्वतारोहण यांमध्येही त्या भाग घेत असत. पुढे त्या गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये राहिल्या, त्यानंतर आई आजारी पडल्यामुळे हवापालट करण्यासाठी त्या आईबरोबर इंग्लंडला गेल्या. ऑक्सफर्ड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागल्या. तेथील शिक्षणात बरेच अडथळे आल्याने त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी त्या भारतात आल्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी निगडित असलेल्या विविध चळवळींत सहभाग घेतला. कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. १९४२ सालच्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला. २६ मार्च १९४२ साली त्यांचा फिरोज गांधींबरोबर विवाह संपन्न झाला, त्यांना राजीव, संजय असे दोन मुले झाली. १९५९ मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. १९६० मध्ये त्यांना पतीनिधनाचा आघात सहन करावा लागला.
१९६४ साली पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पद सांभाळले. दीड वर्षात त्यांचेही निधन झाले. इंदिराजी आरंभी मंत्रिमंडळात नभोवाणी खाते सांभाळत होत्या. शास्त्रींनंतर त्या भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या. त्यांनी गरिबी हटविण्यासाठी एकवीस कलमी कार्यक्रमाचे आयोजन केले.२४ जानेवारी १९६६ ला पंतप्रधान झाल्यावर सतत १८ वर्षे त्या त्या पदावर कार्य वात करत होत्या. या काळात अनेक संकटे आली; पण त्या कधीही डगमगल्या नाहीत राष्ट्रीय एकात्मता निर्माण मल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतात सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इंदिराजींनी कला प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. संस्थानिकांचे हक्क, सवलती, तनखे रद्द करून टाकले. समाजवादी, पुण्या समाजरचना निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न सर्गद केले. पाकिस्तानच्या पूर्व बंगालमधील त्रासलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी लष्करी मदत केली आणि पूर्व पाकिस्तानला बांगलादेश हा दर्जा मिळवून दिला. राष्ट्रपतींनी त्यांना १९७१ मध्ये भारतरत्न किताब दिला.
३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक युद्ध झाले. त्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पूर्ण पराभव केला. कीर्ती इंदिराजींनी कणखर भूमिका घेतली होती. १९७५ साली इंदिराजींनी देशात आणिबाणी जाहीर केली. दीड वर्षात आणीबाणी उठली. नव्यानेच स्थापन झालेल्या जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली, मात्र अल्पावधीतच अंतर्गत मतभेदामुळे जनता पक्षाचे सरकार कोसळले, मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका घोषित करण्यात आल्या. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली परत एकदा सरकार प्रस्थापित झाले. देशाची अखंडता राखण्याचा त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केला इंदिराजींच्या शरीररक्षकांनीच त्यांच्यावर १६ गोळ्या झाडून त्यांना मारले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी भारतमातेची सेवा केली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे
⚜️ जन्म 19 नोव्हेंबर 1917 ला उत्तरप्रदेशात अलाहाबाद येथे झाला. 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.
⚜️ 1959 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.
⚜️ 1964 मध्ये शास्त्रीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होत्या. 1966 मध्ये पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
⚜️ 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 1971 मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान गरीबी हटाओ चा नारा दिला. 1971 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला.
⚜️ 1972 मध्ये सिमला करार केला.
⚜️ 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.
⚜️ 1974 मध्ये पहिला अणुस्फोट पोखरण येथे.
⚜️ 1980 मध्ये 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 31 ऑक्टोंबर 1984 ला त्यांच्या अंगरक्षकाने त्यांची गोळ्या हत्या केली.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
इंदिरा गांधी यांचा निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इंदिरा गांधी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
सराव चाचणी सोडवण्यासाठी करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment