⚜️ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ⚜️
राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म बिहार प्रांतातील सारन जिल्ह्यातील जिरादोई नावाच्या एका छोट्या गावात 30 डिसेंबर 1884 रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम होती. त्यांच्या घरात बालपणापासून देशी वस्तू वापरीत असत. आपल्या देशाबद्दल घरातील सर्व लोकांना अत्यंत आदराची भावना होती.
बालपणापासून राजेंद्रबाबू अतिशय हुशार होते. त्यांचे सर्व लक्ष अभ्यासाकडे होते. एकदा लक्षपूर्वक वाचलेली गोष्ट त्यांच्या स्मरणात रहात असे. शालेय शिक्षणास सुरुवात झाल्यावर ते शाळेत नेहमी प्रथम क्रमांक मिळवत असत. शिक्षकांना त्यांच्याबद्दल स्वाभिमान होता. महाविद्यालयातही हुशार आणि गुणग्राही विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध पावले होते. एम.ए. परीक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. काही काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांना सरकारी नोकरी करावयाची नव्हती.
राजेंद्रबाबू यांनी एल्. एल्. एम. ची परीक्षा दिली. ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. कलकत्ता येथे वकिली करू लागले. त्यानंतर ते पाटण्याला आले आणि तेथेही वकिली करू लागले. वकिली व्यवसायात त्याना भरपूर पैसे मिळू लागले. त्यांनी १८९७ मध्ये त्यांचा राजबन्सदेवींशी विवाह झाला. प्रपंचाला सुरुवात झाली. वकिलीचा खूप पैसे मिळू लागले होते; परंतु त्यातील काही पैसे ते गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करत होते. तसेच गरजू लोकांनाही ते पैसे देत होते. त्यांचे राहणीमान साधे होते. समाजबांधवांबद्दल त्यांच्या मनात करुणा नांदत होती.
१९१७ साली महात्मा गांधी चंपारण्यात सत्याग्रह करण्यासाठी गेले. ही बातमी राजेंद्रबाबूना कळताच तेही सत्याग्रहात चंपारण्य सत्याग्रहात सामील झाले. महात्मा गांधींशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. राजेंद्र बाबूंनी सत्याग्रहात भाग घेतला. हा सत्याग्रह यशस्वी झाला. १९१९ मध्ये भारतावर मुद्दाम लादलेला जुलमी रौलेट कायदा रद्द व्हावा म्हणून देशव्यापी चळवळ सुरू झाली. त्यामध्येही राजेंद्रबाबूंनी भाग घेतला. त्यांनी वकिली सोडून दिली. आपल्या पैशापेक्षा त्यांनी देशहिताचा विचार केला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ही त्यांची तीव्र इच्छा होती.
वकिलीच्या व्यवसायाचा त्याग केल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, मात्र देशहिताचा ध्यास घेतलेल्या राजेंद्र प्रसादांनी स्वदेशीचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. मुळातच बुद्धिमान असल्याने त्यांना मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भारतीय स्वातंत्र्य, देशहित आणि सर्वसामान्यांचा विकास यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले.
राजेंद्रबाबूंनी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली. भारत छोडो चळवळीत भाग घेतला. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका झाली.
१९४६ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यवर्ती हंगामी सरकारात राजेंद्रबाबू अन्नमंत्री होते. ९ डिसेंबर रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटनासमिती स्थापन करण्यात आलीय, या समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीने अपार कष्ट घेऊन राज्यघटना तयार केली.
१९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. १९५० साली ते प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांनी तेथेही बराच खर्च कमी केला. अनेक देशांचा प्रवास केला. तेथील मानवी जीवन व संस्कृतीचे आणि सभ्यता यांच निरीक्षण केले. मानवी जीवन सुखकर कसे होईल याचा ते सातत्याने प्रयत्न करत होते. गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. द्विखंड भारत व आत्मकथा ही त्यांची दोन पुस्तके अतिशय गाजली. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती.
राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर बिहारमधील सदाकत आश्रमात ते राहावयास गेले. १९६२ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे
⚜️ जन्म 3 डिसेंबर 1884 जिरादेई (आजच्या बिहारमध्ये )
⚜️ डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पुर्वज मुळरूपाने कुआँगाव उत्तरप्रदेशचे रहिवाशी होते. तेथून बिहारमधील सारन जिल्ह्यात जिरादेई येथे आले.
⚜️ त्यांचे वडिल महादेव सहाय हे संस्कृत व फारसीचे विद्वान होते.
⚜️ 1902 ला कलकत्ता विद्यापिठात दाखल झाले. 1907 ला कलकत्याहून एम. ए. झाले.
⚜️ 1910 ला बॅचलर ऑफ लॉ व 1915 ला मास्टर ऑफ लॉ या पदव्या मिळविल्या.
⚜️ 1911 ला कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरु केली.
⚜️ बिहार व बंगाल या प्रांतामध्ये 1914 ला आलेल्या महापुरादरम्यान त्यांनी पुरपिडीतांना मदत केली.
⚜️ गांधीजींच्या 1917 च्या चंपारण्य सत्याग्रहात भाग घेतला.
⚜️ 1920 च्या असहकार चळवळीत सहभाग. त्यांनी 1921 ला बिहार विद्यापिठाची स्थापना केली.
⚜️ 1924 ला पाटणा मनपाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
⚜️ 1934 च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.
⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग व कारावास
⚜️ 1946 च्या हंगामी सरकारमध्ये अन्न व कृषी मंत्रीपद स्वीकारले.
⚜️ 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1947 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
⚜️ स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले.
⚜️ 1962 मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान केला गेला.
⚜️ लेखन - इंडिया डिवायडेड, आत्मकथा, सत्याग्रह ॲट चंपारण्य, गांधीजी की देन, बापु के कदमो मे बाबु
⚜️ त्यांना देशरत्न, अजातशत्रू म्हटले जाते.
⚜️ निधन - 28 फेब्रुवारी 1963
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महामानवांचा जीवन परिचय वाचण्यासाठी खालील क्षेत्राला टच करा.
No comments:
Post a Comment