डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आपणास निबंध तसेच भाषणासाठी उपयुक्त ठरेल
हिंदू म्हणून जन्माला आलो,
पण हिंदू म्हणून मरणार नाही,
अशी घोषणा करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. वडिलांनी त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला पाठविले. एल्फिन्स्टन हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केले, पुढे त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील एम. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते भारतात आले. बडोदा सरकारने दिलेल्या नोकरीवर काम करू लागले. अस्पृश्य म्हणून तेथे त्यांचा अपमान होऊ लागल्याने, त्यांनी ती नोकरी सोडून दिली. मुंबईत येऊन त्यांनी सीडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.
आपण उच्च शिक्षण घेऊनसुद्धा लोक आपल्याशी असे वागतात, तर मग खेड्यातील गरीब अस्पृश्य जनतेचे काय होत असेल याची त्यांना जाणीव झाली. त्यांचे मन अतिशय दुःखीकष्टी झाले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'मूकनायक' नावाचे एक मराठी पाक्षिक सुरू केले. त्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करू लागले. त्यांनी दलित बांधवांना 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' असा दिव्य संदेश दिला.
पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले, आणि अर्थशास्त्रातील बी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. अत्यंत आपुलकीने ते मुलांना शिकवीत होते. पुढे ते त्याच कॉलेजचे प्राचार्य झाले.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृशांना खुले केले. महाडच्या चवदार तळ्यासाठी अस्पृश्य बांधवांना एकत्र करून तळ्यातील पाण्याला स्पर्श केला आणि सर्वांना खुले केले.
गोलमेज परिषदेला ते लंडन येथे गेले आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. म. गांधींना हा विचार पटला नाही. अस्पृश्य समाज हिंदू समाजातून वेगळा पडू नये म्हणून म. गांधींनी पुण्यात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रहिताचा विचार करून आंबेडकर यांनी गांधीजींशी तडजोड केली. या तडजोडीला 'पुणे करार' संबोधले जाते.
१९४२ साली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री झाले. म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अस्पृश्यांसाठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. तसेच औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालय सुरू केले. १९४६ साली त्यांना घटना समितीत घेण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि कायदामंत्रीपद देण्यात आले. भारतीय घटनेचे ते महान शिल्पकार होत.
अस्पृश्यांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिल्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करावा, असे सारखे त्यांना वाटत असे. शेवटी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याच्या शुभदिनी नागपूर येथे आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली, बुद्ध धर्मामध्ये स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही, हे पाहून आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
आपल्या विचारांतून डॉ. आंबेडकरांनी दलितांचा उद्धार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 'शूद्र कोण होते ?' 'पाकिस्तानवर विचार,' 'रिडल्म इन् हिंदूझम्,' 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' असे अनेक इंग्रजी वैचारिक ग्रंथ लिहिले. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करीत करीत ते बौद्धवासी झाले. मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 1 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ~ निबंध क्रमांक 2 वाचायचा असेल तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.
No comments:
Post a Comment