🌲🎅 नाताळ 🎅🌲
नाताळ हा ख्रिश्चन धर्मीय लोकांचा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी येतो. ह्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव मेरी असे होते. त्याचा जन्म बेथलहेम येथे झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा आकाशातून एक तेजस्वी तारा तुटला. त्या वेळेस तीन शहाण्या माणसांना साक्षात्कार झाला की देवाचा पुत्र जन्माला आलेला आहे.
येशूला लोक ज्यूंचा राजा मानत होते म्हणून रोमनांनी आणि ज्यू पुजा-यांनी येशूला क्रुसावर चढवले.
नाताळ हा सण युरोप, अमेरिका आणि जगात जिथेजिथे ख्रिश्चनधर्मीय आहेत तिथेतिथे साजरा केला जातो. ह्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. ह्या दिवशी लहान मुले खूप खुशीत असतात. ती रात्री झोपी जातात तेव्हा सांताक्लॉज हा पांढ-या दाढीचा जादूचा म्हातारा माणूस येतो आणि त्यांना चॉकलेट, खाऊ आणि खेळणी ठेवून जातो. खरे सांगायचे तर त्यांचे आईबाबाच त्या वस्तू ठेवत असतात पण हे मुलांना न कळल्यामुळे त्यांना वाटते की सांताक्लॉजनेच ह्या वस्तू ठेवल्या आहेत....
या सणाला ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जातात तिथे येशूंची गाणी म्हणतात एकमेकांना शुभेच्छा देतात भेटवस्तू आणि मिठाई देतात नाताळच्या दिवशी सर्वजण आपले घर सजवतात दिवाळी सारखाच ख्रिस्ती बांधव हा नाताळ सण साजरा करतात
असा हा सण फारच उत्साहाने सर्वत्र साजरा होतो.
🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲🎅🌲
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅🎅
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
No comments:
Post a Comment