SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, November 30, 2022

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जीवन परिचय

 ⚜️ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ⚜️


                 राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म बिहार प्रांतातील सारन जिल्ह्यातील जिरादोई नावाच्या एका छोट्या गावात 30 डिसेंबर 1884 रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम होती. त्यांच्या घरात बालपणापासून देशी वस्तू वापरीत असत. आपल्या देशाबद्दल घरातील सर्व लोकांना अत्यंत आदराची भावना होती.

               बालपणापासून राजेंद्रबाबू अतिशय हुशार होते. त्यांचे सर्व लक्ष अभ्यासाकडे होते. एकदा लक्षपूर्वक वाचलेली गोष्ट त्यांच्या स्मरणात रहात असे. शालेय शिक्षणास सुरुवात झाल्यावर ते शाळेत नेहमी प्रथम क्रमांक मिळवत असत. शिक्षकांना त्यांच्याबद्दल स्वाभिमान होता. महाविद्यालयातही हुशार आणि गुणग्राही विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध पावले होते. एम.ए. परीक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. काही काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांना सरकारी नोकरी करावयाची नव्हती. 

                राजेंद्रबाबू यांनी एल्. एल्. एम. ची परीक्षा दिली. ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. कलकत्ता येथे वकिली करू लागले. त्यानंतर ते पाटण्याला आले आणि तेथेही वकिली करू लागले. वकिली व्यवसायात त्याना भरपूर पैसे मिळू लागले. त्यांनी १८९७ मध्ये त्यांचा राजबन्सदेवींशी विवाह झाला. प्रपंचाला सुरुवात झाली. वकिलीचा खूप पैसे मिळू लागले होते; परंतु त्यातील काही पैसे ते गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करत होते. तसेच गरजू लोकांनाही ते पैसे देत होते. त्यांचे राहणीमान साधे होते. समाजबांधवांबद्दल त्यांच्या मनात करुणा नांदत होती.

                 १९१७ साली महात्मा गांधी चंपारण्यात सत्याग्रह करण्यासाठी गेले. ही बातमी राजेंद्रबाबूना कळताच तेही सत्याग्रहात चंपारण्य सत्याग्रहात सामील झाले. महात्मा गांधींशी त्यांचा घनिष्ठ परिचय झाला. राजेंद्र बाबूंनी सत्याग्रहात भाग घेतला. हा सत्याग्रह यशस्वी झाला. १९१९ मध्ये भारतावर मुद्दाम लादलेला जुलमी रौलेट कायदा रद्द व्हावा म्हणून देशव्यापी चळवळ सुरू झाली. त्यामध्येही राजेंद्रबाबूंनी भाग घेतला. त्यांनी वकिली सोडून दिली. आपल्या पैशापेक्षा त्यांनी देशहिताचा विचार केला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ही त्यांची तीव्र इच्छा होती.

                 वकिलीच्या व्यवसायाचा त्याग केल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, मात्र देशहिताचा ध्यास घेतलेल्या राजेंद्र प्रसादांनी स्वदेशीचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. मुळातच बुद्धिमान असल्याने त्यांना मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भारतीय स्वातंत्र्य, देशहित आणि सर्वसामान्यांचा विकास यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले.

               राजेंद्रबाबूंनी राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली. भारत छोडो चळवळीत भाग घेतला. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका झाली.

               १९४६ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यवर्ती हंगामी सरकारात राजेंद्रबाबू अन्नमंत्री होते. ९ डिसेंबर रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटनासमिती स्थापन करण्यात आलीय, या समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीने अपार कष्ट घेऊन राज्यघटना तयार केली.

             १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. १९५० साली ते प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. त्यांनी तेथेही बराच खर्च कमी केला. अनेक देशांचा प्रवास केला. तेथील मानवी जीवन व संस्कृतीचे आणि सभ्यता यांच निरीक्षण केले. मानवी जीवन सुखकर कसे होईल याचा ते सातत्याने प्रयत्न करत होते. गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. द्विखंड भारत व आत्मकथा ही त्यांची दोन पुस्तके अतिशय गाजली. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती.

              राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर बिहारमधील सदाकत आश्रमात ते राहावयास गेले. १९६२ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे


⚜️ जन्म 3 डिसेंबर 1884 जिरादेई (आजच्या बिहारमध्ये )

⚜️ डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पुर्वज मुळरूपाने कुआँगाव उत्तरप्रदेशचे रहिवाशी होते. तेथून बिहारमधील सारन जिल्ह्यात जिरादेई येथे आले.

⚜️ त्यांचे वडिल महादेव सहाय हे संस्कृत व फारसीचे विद्वान होते.

⚜️ 1902 ला कलकत्ता विद्यापिठात दाखल झाले. 1907 ला कलकत्याहून एम. ए. झाले.

⚜️ 1910 ला बॅचलर ऑफ लॉ व 1915 ला मास्टर ऑफ लॉ या पदव्या मिळविल्या.

⚜️ 1911 ला कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरु केली.

⚜️ बिहार व बंगाल या प्रांतामध्ये 1914 ला आलेल्या महापुरादरम्यान त्यांनी पुरपिडीतांना मदत केली.

⚜️ गांधीजींच्या 1917 च्या चंपारण्य सत्याग्रहात भाग घेतला.

⚜️ 1920 च्या असहकार चळवळीत सहभाग. त्यांनी 1921 ला बिहार विद्यापिठाची स्थापना केली.

⚜️ 1924 ला पाटणा मनपाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.

⚜️ 1934 च्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले.

⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग व कारावास

⚜️ 1946 च्या हंगामी सरकारमध्ये अन्न व कृषी मंत्रीपद स्वीकारले. 

⚜️ 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1947 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

⚜️ स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले.

⚜️ 1962 मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान केला गेला. 

⚜️ लेखन - इंडिया डिवायडेड, आत्मकथा, सत्याग्रह ॲट चंपारण्य, गांधीजी की देन, बापु के कदमो मे बाबु

⚜️ त्यांना देशरत्न, अजातशत्रू म्हटले जाते.

⚜️ निधन - 28 फेब्रुवारी 1963

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महामानवांचा जीवन परिचय वाचण्यासाठी खालील क्षेत्राला टच करा.



संख्या व संख्यांचे प्रकार

 संख्या व संख्यांचे प्रकार




संख्याचे प्रकार : 

एक पासून सुरु होणाऱ्या सर्व क्रमिक मोज संख्यांना 'नैसर्गिक संख्या म्हणतात.

⚜️ नैसर्गिक संख्या :-

 दैनंदिन जीवनात ज्या संख्यांचा वापर करतात. त्या सर्व संख्यांना 'नैसर्गिक संख्या' म्हणतात. 

उदा :- 10 रु. 2 डझन केळी, 4 रु. किलो, 50 वह्या इ.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ समसंख्या :- 

ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येस 'समसंख्या' म्हणतात. ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो. त्या संख्यांना 'समसंख्या' म्हणतात.

2, 4, 6, 8, 10, 12, ...... 20, 200,1002, 111114 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ विषम संख्या :-

 ज्या संख्येच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 ही अंक असतात. अशा संख्यांना 'विषम संख्या' म्हणतात. ज्या संख्येला 2 ने भाग घातला असता बाकी 1 उरते, अशा संख्यांना 'विषम संख्या' म्हणतात.

उदा :- 1,3,5,7,9, 11, 13, .25...49....1331 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ मुळसंख्या :- 

ज्या संख्येला 1 किंवा त्या संख्येशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना 'मूळ संख्या' म्हणतात.

 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97

1 ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्याही नाही.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ पूर्णसंख्या :- 

0, 1,2,3 शुन्या पासून सुरुवात होऊन तयार होणाऱ्या संख्यांना 'पूर्ण संख्या' म्हणतात. सर्व नैसर्गिक संख्या ह्या 'पूर्ण संख्या' असतात.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ संयुक्त संख्या :- 

ज्या संख्येचे 1 पेक्षा जास्त अवयव पडतात त्या संख्यांना 'संयुक्त संख्या' म्हणतात.

 उदा :- 4, 6, 8, 9, 15 इ.

2 x 2 = 4, 2x3 = 6, 3×3 = 9, 3x5 = 15 इ. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ त्रिकोणी संख्या :-

 दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस 'त्रिकोणी संख्या' म्हणतात.

उदा :- 1x 2 = 2, 2 ची निमपट = 1 2 x 3 = 6, 6 ची निमपट = 3

3x4 = 12, 12 ची निमपट = 6 

4 x 5 = 20, 20 ची निमपट= 10

5 x 6 = 30, 30 ची निमपट = 15 इ..

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ विरुद्ध संख्या :-

 एखादी संख्या धन असेल तर तिची विरुद्ध संख्या म्हणजे ऋण संख्या असते. ज्या दोन संख्येची बेरीज () येते. त्या संख्यांना परस्परांच्या 'विरुद्ध संख्या' म्हणतात. 

उदा :- 1 ची विरुद्ध संख्या = -1

          2 ची विरुद्ध संख्या = 2

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ पूर्णांक संख्या :-

 कोणतीही संख्या जी संख्या अंश व छेद या स्वरुपात लिहिली असता छेद नेहमी एक असतो. त्यास 'पूर्णांक संख्या' म्हणतात.

-5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ परिमेय संख्या :-

 x व y या पूर्णांक संख्या असतील व y≠ 0 तर x / y या स्वरुपात असलेल्या संख्यांना 'परिमेय संख्या' म्हणतात.

 उदा :-4 18 7'19

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ अपरिमेय संख्या :- 

ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रुपांतर अनंत अनावर्ती असते त्या संख्येस 'अपरिमेय संख्या' म्हणतात.

उदा :- √8, √13, √17 इ.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ वास्तव संख्या :- 

सर्व परिमेय व अपरिमेय संख्यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांना 'वास्तव संख्या' म्हणतात.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ व्यस्त संख्या :- 

ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या

संख्यांना एकमेकींच्या गुणाकार 'व्यस्त संख्या' म्हणतात.

3

4

उदा :

या गुणाकार व्यस्त संख्या आहेत.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️ चौरस संख्या :-

 कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस 'चौरस संख्या' म्हणतात.

उदा :- 1, 4, 9, 16, 25.....

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ अनुक्रमिक / क्रमवार संख्या :- 

कोणत्याही संख्येपेक्षा 1 ने मोठी असलेल्या संख्येस त्या संख्येची 'अनुक्रमिक संख्या किंवा क्रमवार संख्या' असे म्हणतात.

 उदा :- 1 ची अनुक्रमिक संख्या 2 आहे.

7 ची अनुक्रमिक संख्या 8 आहे.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

⚜️ मोठयात मोठी संख्या :

 विशिष्ट अंकी मोठ्यात मोठया संख्येत प्रत्येक अंक 9 असतो.

उदा :- तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 असते

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 ⚜️लहानात लहान संख्या :-

 विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक 1 हा असून पूढील सर्व अंक 0 असतात.

उदा :- तीन अंकी लहानात लहान संख्या - 100 

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

संख्या व संख्यांचे प्रकार हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 संख्या व संख्यांचे प्रकार या घटकावरील सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️




विभाज्यतेच्या कसोट्या

 ⚜️ विभाज्यतेच्या कसोट्या ⚜️



❇️ 1 ची कसोटी :

✍️ प्रत्येक संख्येला । ने भाग जातो.

एकने भाग घातल्यास संख्येत काहीच फरक पडत नाही.उत्तर तीच संख्या असते. 

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 2 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 ही अंक असतात त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो. भाग जातो.

कोणत्याही समसंख्येला 2 ने निःशेष

उदा 1234, 1000 इत्यादी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 ❇️ 3 ची कसोटी :

✍️ दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराला 3 ने भाग जात असेल किंवा ती संख्या 3 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3 ने नि:शेष भाग जातो.

 उदा: 6930 = 6+9+3+0=18

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 ❇️ 4 ची कसोटी :

✍️ संख्येतील शेवटचा म्हणजे एकक व दशक स्थानाची अंकानी मिळुन होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो.

ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी 00 असतील तर त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो.

उदा: 1244, 320, 100, 1234588 इ.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 5 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असेल तर

त्या संख्येला 5 ने नि:शेष भाग जातो.

उदा : 5, 50, 115, 300, 133450, 100 इत्यादी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 6 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येला 2 व 3 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येला6 ने निःशेष भाग जातो. 

उदा: 30, 12, 42, 60, 120, 666 इत्यादी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 7 ची कसोटी :

✍️ दिलेल्या संख्येचे एकक, दशक, शतक असा एक व हजार, दहा हजार, कोटी अशा प्रकारे दोन भाग करून या दोन संख्येचा फरकाला जर 7 ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 7 ने निःशेष भाग जातो.

उदा : 35756-35,756

1. 756

     -35

------------

     721

35756 या संख्येला 7 ने नि:शेष भाग जातो.

2. 1050 

          1

--------------

        49

49 ला 7 ने भाग जातो म्हणून 1050 ला सुध्दा जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 ❇️ 8 ची कसोटी

✍️ ज्या संख्येला शेवटच्या 3 अंकाना 8 ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 8 ने पुर्ण भाग जातो. - एखादया संख्येच्या शेवटी 3 शुन्य असतील तर त्या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो.

उदा: 3000, 448, 1872, 41704, 53888 इत्यादी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 ❇️ 9 ची कसोटी:

✍️ संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने नि:शेष भाग जातो. 

उदा:

 320493+2+0+4+9=18

18 ला 9 ने भाग जातो म्हणुन 32049 ला निःशेष भाग जातो.

2. 6327

6+3+2+7= 18

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 10 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे अशा संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.

उदा: 10, 100, 50, 130, 520, 11120 इत्यादी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 11 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येतील एक आड एक अंकाच्या बेरजेतील फरक ) किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो. 

उदा: 1452 

= 1+5=6

   4+2=6

=6-6=0

8261

8+6=14

2+1=3.

=14-3=11

 या संख्यांना 11 ने नि:शेष भाग जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 12 ची कसोटी :

✍️ एखादया संख्येला 3 व 4 ने भाग जात असेल तर त्या संपुर्ण संख्येला 12 ने पुर्ण भाग जातो. 

उदा: 36, 60, 120, 24 इत्यादी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 13 ची कसोटी:

✍️ ज्या संख्येच्या एकक, दशक, शतक यातील अंकातून डावी कडील उरलेल्या संख्या तयार होणारी संख्या बजा केल्यास उत्तर जर 13च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 13 पुर्ण भाग जातो.

उदा: 39, 91, 117 इत्यादी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 14 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येला 2 व 7 ने पुर्ण भाग जातो त्या संख्येला 14 ने पुर्ण भाग जातो.

उदा: 70, 42, 210, 1722 इत्यादी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 15 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येला 3 व 5 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने नि:शेष भाग जातो.

उदा: 30, 150, 600, 450 इत्यादी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

❇️ 36 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येतील अंकाना 4 व 9 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 36 ने नि:शेष भाग जातो.

उदा: 1296

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 ❇️ 72 ची कसोटी :

✍️ ज्या संख्येला 9 ने व 8 ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला 72 निःशेष भाग जातो.

उदा: 5184

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

विभाज्यतेच्या कसोट्या हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

विभाज्यतेच्या कसोट्या सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



Tuesday, November 29, 2022

बोधकथा चुकीचा मार्ग

 ⚜️ चुकीचा मार्ग ⚜️



              एक अतिशय सुंदर जंगल रान होते. त्या रानात एक पांढरा शुभ्र ससा राहात होता. ससा म्हटला म्हणजे तो फक्त हिरवे गवत खाऊन जीवन जगणारा प्राणी. त्या सशाला कोवळे गवत फार आवडायचे. त्यामुळे तो रानात जास्त कष्ट न घेता आपल्या घराजवळील कोवळे आणि लुसलुशीत हिरवे गवत खाऊन पोट भरत असे.

              ससा स्वभावाने अतिशय साधा व सरळ होता. त्याला जंगली प्राण्यांच्या वृत्तीबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यांच्या स्वभावाची त्याला जरादेखील कल्पना नव्हती. कारण जंगलात अनेक प्रकारचे प्राणी रहात असतात.

               एकंदरीत खरी गोष्ट अशी होती की, त्या सशावर एक लबाड लांडगा टपून बसलेला होता. त्या सशाची शिकार करून त्याचे मऊ मांस खाण्याची त्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा जेव्हा लांडगा सशाला पाहायचा तेव्हा तेव्हा त्या लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटत असे व मनात एक विचार येत असे की, आपण ह्या सशाला केव्हा खाऊ. परंतु तो ससा काही लांडग्याच्या हाती लागत नव्हता. एकदा त्या लांडग्याने तशी संधी साधलीच व सशावर नजर ठेवून त्याने त्याचा पाठलाग केला; सशाला हे माहीत नव्हते. ससा आपल्याच नादात रानात गवत खात फिरत असताना अचानकपणे लांडग्याने त्याच्यावर झडप घातली. परंतु सशाचे दैव आडवे आले व तो सुदैवाने लांडग्याच्या तावडीतून सुटून जीव घेऊन पळत सुटला.

                 ससा पळत होता. त्याला फक्त आपला जीव वाचविण्याची चिंता होती. जीव घेऊन पळण्याच्या नादात आपण कुठे जात आहोत याचे त्याला अजिबात भान नव्हते. कारण अशा प्रसंगी कोणालाही भान रहात नाही. पळता पळता त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत खूप अंधार होता. तेथे तो आपला जीव धरून बसला. त्याला हायसे वाटले. आपला जीव वाचल्याचे त्याला समाधान वाटले. परंतु ते समाधान थोड्याच वेळपर्यंत टिकले. कारण त्याला लगेच वाघाची डरकाळी ऐकू आली. ती ऐकून सशाची पाचावर धारण बसली. कारण वाघ म्हटल्यानंतर जंगलाचा राजा ! म्हणून ससा घाबरला.

                 वाघाने सशाला आपल्या गुहेत पाहून आनंद व्यक्त केला. कारण त्याला आयती शिकार मिळणार होती. त्याप्रमाणे वाघाने एका क्षणात सशाचा चट्टामट्टा केला. म्हणजेच सशाला खाऊन टाकले.

⚜️ तात्पर्य ⚜️

 प्रत्येक माणसाने एखाद्या छोट्याशा संकटातून बाहेर पडण्याकरिता सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेतला व तो चुकीच्या मार्गाने गेला तर हमखासपणे तो मनुष्य मोठ्या संकटात सापडतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 

जिल्हाअंतर्गत बदली

  शिक्षकांनी अपील कसे करावे? सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



Monday, November 28, 2022

जिल्हाअंतर्गत बदली

 बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा प्रसिद्ध करणे vinsys यांचा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



Sunday, November 27, 2022

सराव चाचणी बुद्धिमत्ता 3 इयत्ता 3 री व 4 थी

 

महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटनाक्रम

 ⚜️महात्मा फुले यांच्या जीवनातील  महत्त्वाचा घटनाक्रम⚜️




⚜️ जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले.

⚜️ फुलेंच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे मुळ आडनाव गोन्हे होते. पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारावरून फुले हे आडनाव पडले. 

⚜️ महात्मा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले.

⚜️ म. फुले यांच्या पुर्वजांचे मुळ गाव सातारा जिल्हयातील कटगुण होय म. फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला.

⚜️ शेजारी गफार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. 

⚜️ 1841 ते 1847 स्कॉटिश मिशन शाळा पुणे येथे शिक्षण घेतले. 1840 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण व समता या तत्वांना प्राधान्य दिले.

⚜️ म. फुलेंनी लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी हा यांचे प्रशिक्षण घेतले.

⚜️ 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरु केली. 

⚜️ 1852 मध्ये वेताळपेठेत पुणे येथे अस्पृशांसाठी दोन शाळांची स्थापना केली. 

⚜️ 1852 मध्येच पुना लायब्ररीची स्थापना केली.

⚜️ 1852 मध्ये मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1853 मध्ये महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी स्थापन केली. 1854 मध्ये स्कॉटीश मिशन शाळेत अध्यापन. 

⚜️ 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. ही भारतातील पहिली रात्रशाळा होय. 

⚜️ 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

⚜️ 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. 1865 मध्ये केशवपन बंदीसाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला.

⚜️ 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृशांसाठी खुला केला.

⚜️ 1869 मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार केला.

⚜️ 1873 मध्ये 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडलक होते. पुण्यात परांजपे या मित्राच्या लग्नवरातीत एका सनातन्याने फुल्यांचा शूद्र म्हणून अपमान केला. या बाबींचा फुल्यांवर परिणाम होऊन ते समाजसेवेकडे ओढले गेले. फुल्यांना अहमदनगरच्या मिस फरार या मिशनरी बाईंनी चालविलेल्या मुलींच्या शाळेची प्रेरणा होती...

⚜️ ब्रिटीश सरकारने फुल्यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राईज फंडाद्वारे मदत केली. 5 सप्टेंबर 1875 ला पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची मिरवणूक निघाली. तित सहभाग घेतला व मिरवणुकीला संरक्षण पुरविले.

⚜️ इ.स. 1875 पुणे व अहमदनगर जिल्हयातील शेतकन्यांनी सावकारशाही विरुध्द फुल्यांच्या नेतृत्वाखाली (शेतकऱ्यांनी) उठाव / बंड केले. हे बंड खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. ( कर न देणे, सावकारशाहीस विरोध यासाठीचे बंड होते. )

⚜️ 2 जून 1876 ला सत्यशोधक समाजाच्या मंगलाष्टक पुजावीधींचे प्रकाशन केले.

⚜️ 1876 ते 1882 पुणे महानगरपालिकेचे सदस्य (नगरसेवक) म्हणून कार्य केले. 1877 ला धनकवडी येथे दुष्काळपिडीतांसाठी कॅम्प काढला.

⚜️ सत्यशोधक समाजाचा मुळ उद्देश शूद्रांना साक्षर करणे, धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे हा होता. विद्येविना मती गेली। मती विना निती गेली.. या ओळी म.फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातील आहेत,

⚜️ सत्यशोधक समाजाचा मानवतावाद सार्वजनिक सत्यधर्ममध्ये प्रसिध्द केला.सत्यशोधक समाजाचे ब्रिदवाक्य सर्वसाक्ष जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी ।। सार्वजनिक सत्यधर्मास विश्वकुटुंबाचा जाहीरनामा, विश्वधर्माचा अमरकोष म्हणतात.

⚜️ फुलेंनी सावित्रीबाईस साक्षर करून शाळेत शिक्षिका म्हणून नेमले. फुलेंनी कंत्राटदाराचा व्यवसाय केला. त्यांनी पुना कमर्शीयल अॅन्ड कॉन्ट्रक्टींग कंपनीची स्थापना केली. फुलेंनी खडकवासला तलावाचे काम पुर्ण केले.

⚜️ ब्राम्हण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शूद्र बाधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ आहे. अशी प्रस्तावना म. फुलेंनी ब्राम्हणांचे कसब या ग्रंथात मांडली.

⚜️ शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मांडले. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे असे म. फुलेंनी म्हटले. इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी संकेत आहे. असे मानणाऱ्यापैकी फुले होते.

⚜️ ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो. त्या दिवशी त्याचा अर्धा सदगुण जातो. या होमरच्या वचनाने गुलामगिरी या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे. बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री

⚜️ म. फुले हे आयदलितोधारक आहेत महर्षी वि. रा. शिंदे म. फुलेंनी आंबालहरी, सत्सार, दिनबंधू ही वृत्तपत्रे काढली. सत्य सर्वांचे आदीधर । रूप धर्माचे माहेर ।। म. फुले

⚜️ शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागणारे पहिले सुधारक महात्मा फुले / पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत म. फुले होय. फुले आपल्या मजुरांना बोनस वाटत असत.

⚜️ सदाशिव चल्लाळ गावंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल माळवेकर या फुल्यांच्या मित्रांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.

⚜️ वज्रसूची, संत कबिरांचे विप्रमती (बीजक), थॉमस पेनचा राईट्स ऑफ मैन या ग्रंथाचा फुल्यांवर प्रभाव होता.

⚜️ सार्वजनिक काकांनी (ग.वा. जोशी) म. फुलेंना अनेकदा सहकार्य केले. ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये यासाठी म. फुलेंनी पंडिता रमाबाई व लेलेशास्त्री यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजात राजकीय विषयावर बोलणे वर्ज्य होते.

⚜️ म. फुलेंनी सत्यशोधक चळवळ, ब्राम्हणेतर चळवळ यांचा पाया घातला. न्हाव्यांचा संप सर्वप्रथम फुल्यांनी घडवून आणला पुणे, ओतूर, तळेगाव ढमढेरे येथे फुले ईश्वरास निर्मिक म्हणतात.

⚜️ मेकालेच्या पाझर सिध्दांतास फुलेंनी विरोध केला. तळापासून शिक्षण दयावे असे सांगितले.

⚜️ म. फुलेंना सयाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानचे बुकर टी वाशिंग्टन म्हटले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी ॥ म. फुले

⚜️ परोपकार, त्याग, मानवता, हे गुण फुलेंनी ख्रिस्ती धर्माकडून स्विकारले. शालेय जीवनात जोतिबांवर छ. शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता.

⚜️ धनंजय कीर जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.

⚜️महात्मा गांधी म्हणतात जोतिबा हे खरे महात्मा होते. 1877 मध्ये दीनबंधू मुखपत्र सुरु केले. याच वर्षी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.

⚜️ कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या मुखपत्राचे संपादक होते. 1882 मध्ये शिक्षण विषयक हंटर कमिशनसमोर साक्ष दिली.

⚜️ 1887 ला मृत्यूपत्र तयार करून त्याची नोंदणी केली. 1888 मध्ये इंग्लंडचा प्रिन्स ड्युक याच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकन्यांच्या वेशात जावून शेतकऱ्यांच्या परीस्थितीचे वर्णन केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भुषण असा केला आहे.

⚜️ त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरी केली होती. याच गृहातील काशीबाई या ब्राम्हण विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते.

⚜️ नारायण लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या बॉम्बे मिल हैंड्स असोसिएशन या कामगार संघटनेमागील प्रेरणा म. फुले. होते.

⚜️ त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ गुलामांना दास्यते मधून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला. महात्मा फुले यांचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा मरणोत्तर 1891 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ होय. त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरुपात लिहिलेला आहे.

⚜️1882 मध्ये टिळक व आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर म. फुले यांनी मुंबईला त्यांचा सत्कार केला होता.

⚜️ ज्योतिबांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने रावबहादूर वडेकर यांच्या हस्ते दिली.

⚜️ शुद्र जगदगुरु या शब्दात महात्मा फुले यांच्यावर विष्णू शास्त्री चिपळूणकर टिका करत. त्यांचा समाजसुधारकाचे अग्रणी, स्त्रियांचे उद्धारकर्ते, आदय- दलितोद्धारक क्रांतिसूर्य, समाजक्रांतीचे जनक या शब्दांत गौरव केला जातो.

⚜️ थॉमस पेन या उदार-मानवतावादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवर होता.

⚜️ म. फुलेंनाच महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर कींग असे ही म्हणतात. 28 नोव्हेंबर 1890 ला त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला.

⚜️महात्मा फुलेंचे साहित्य - गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसुड, शिवाजी - महाराजांचा पोवाडा, ब्राम्हणाचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी काव्यरचना, सत्सार, इशारा इत्यादी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांची माहिती वाचण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


Saturday, November 26, 2022

महात्मा ज्योतिबा फुले माहिती

   ⚜️महात्मा ज्योतिबा फुले माहिती⚜️


       जोतिबा फुले यांचा जन्म पुण्यात 11 एप्रिल 1827 रोजी झाला. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. ते एक वर्षाचे असताना आईचे निधन झाले. त्यामुळे वडिलांनी त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ केला. जोतीबा याचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील कटगूण होय. आडनाव गोऱ्हे. जोतिबांच्या वडिलांनी पुण्यात येऊन फुलांचा व्यापार करीत असत त्यामुळे फुले हे आडनाव सुरू झाले.

          वयाच्या सातव्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले. बालपणापासून ते अतिशय हुशार होते. अभ्यासाची त्यांना मनापासून आवड होती. काही कर्मठ मंडळींनी त्यांना शिक्षणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी जोतिबाला शाळेतून काढून शेतात काम करावयास लावले. शेतात ते काम करीत असताना पुस्तक वाचत होते.

          जोतिबांची शिक्षणाप्रती आवड लक्षात येताच एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना पाश्चात्त्य शिक्षण देणार मिशनरी शाळेत शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या हाती थॉम पेनचा 'राईटस ऑफ मॅन' (मानवाचे हक्क) हा ग्रंथ पडला. 'राईटस ऑफ मॅन' या ग्रंथात मांडलेल्या विचारांस प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला. भारतातील समाजव्यवस्थेतील विषमतेला जो धार्मिक आधार देण्यात आला होता, त्यावर जोतिबांनी प्रखर शब्दात टीका केली. विशेषत: हिंदू समाजात जी विषमता निर्माण झालेल आहे, ती प्रस्थापित समाजानेच निर्माण केली अशी जोतिबांची ठाम धारणा बनली.

            पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव जोतिबांवर पडल्याने सामाजिक सुधारणा घडवून आणणे अतिशय गरजेचेहरा आहे. शूद्र, स्त्रिया, शोषित समाजाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून द्यायचा असेल तर समाजातील घटकांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः स्त्रियांना साक्षर व सुशिक्षित करणे गरजेचे आहे, अ‍शी जोतिबांची पक्की धारणा बनली. समाजातील विषमता ईश्वरनिर्मित नसून मानवानेच निर्माण केलेली आहे समता प्रस्थापित करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केले पाहिजेत असे ठाम मत जोतिबांनी मांडले. मुलींना शिक्षण देण्यासाठी जोतीबांनी पुण्यातील भिडे वाड्यात १८४८ साली मुलींसाठी शाळा काढली


                  शाळेमध्ये शिकावयास व शिकवायला येण्यास कोणी तयार होईना. त्यामुळे जोतिबांनी आपली पत्नी सावित्रीला शिकवून तयार केले. सावित्रीबाईंनीच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास चालना दिली. जोतीबांचे हे कार्य पाहून समाजातील काही मंडळींनी त्यांना छळाण्यास सुरुवान केली; पण दोघे, पती-पत्नी डगमगले नाहीत. त्यांनी सर्वांसाठी मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा काढली. त्यांनी आपल्य हौदावर पाणी भरण्यास सर्वांना परवानगी दिली. 

              शेतकरी व मजुरांची स्थिती अतिशय गरीब होती. जोतिबांन मजुरांच्या मुलांना शाळेत घेऊन शिकविले. १८७३ मध्ये त्यांनी 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन केली. सर्व विश्वाचा चालक ईश्वर हा एक आहे आणि त्याने निर्माण केलेली सर्व माणसे समान आहेत, ही तत्त्वे समाजाला शिकविली. ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. 'जातिभेद', 'दिवेकरार', 'गुलामगिरी', 'सार्वजनिक सत्य धर्म प्रकाश', 'शेतकऱ्यांचा आसूड' अशी पुस्तके लिहिली. मुंबईत त्यांचा सत्कार होऊन महात्मा ही पदवी देण्यात आली. १९ व्या शतकात महाराष्ट्रात समाजजागृती करण्याचे, बहुजन समाजाला | हक्क मिळविण्यासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य जोतिबांनी केले. अशा या थोर समाजसुधारकाचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


Thursday, November 24, 2022

निबंध महात्मा ज्योतिबा फुले

 🕳️ महात्मा ज्योतिबा फुले 🕳️



                महात्मा जोतिबा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. ते जातीने माळी होते. त्यांचे वडील फुले विकण्याचा व्यवसाय करीत म्हणून त्यांना फुले असे आडनाव मिळाले.

               ज्योतिबा खूप हुशार होते परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण थांबवावे लागले. तेव्हा त्यांच्या शेजा-याने त्यांची हुशारी बघून त्यांना पुन्हा शाळेत घालण्यासाठी त्यांच्या वडिलांचे मन वळवले. मग १८४१ साली पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कुल शाळेत ते जाऊ लागले.

                 शिक्षणामुळे ज्योतिबांना आत्मभान आले. त्या काळात सर्वत्र उच्च जातींचे वर्चस्व होते. खालच्या जातीतील लोकांना अन्यायाने वागवले जात होते. त्या वर्चस्वाविरूद्ध ज्योतिबा फुले उभे राहिले. अनाथ हिंदू मुलांसाठी पहिला अनाथाश्रम त्यांनीच काढला.

                फुले यांचा विवाह खंडूजी निवासी पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला फुलांनी प्रथम आपल्या पत्नीला शिकवून पुण्यामधील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. 

                थॉमस पॅनेचे 'राईट्स ऑफ मॅन' हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्या विचारात खूप बदल घडला. दलित आणि स्त्रियांनी शिक्षण घेतले तरच परिस्थितीत सुधारणा होईल असे त्यांना पटले. स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांनी पत्नी सावित्री हिला शिकवले. आणि मुलींसाठी शाळा काढली. सत्यशोधक समाज ही संस्थाही काढली. त्यांनी लिहिलेले 'शेतक-याचा आसूड' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

अशा ह्या महामानवाचे निधन २८ नोव्हेंबर, १८९० रोजी झाले.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



Sunday, November 20, 2022

यशवंतराव चव्हाण यांची संपूर्ण माहिती

 ⚜️ यशवंतराव चव्हाण यांची संपूर्ण माहिती ⚜️



                यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील 'देवराष्ट्रे' या गावी एका शेतकरी कुटुंबात 12 मार्च 1913 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांनी कराड येथे घेतले. पुढील शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले. ते बी.ए. एल्. एल्. बी. झाले.

                १९३० साली म. गांधींनी सुरू केलेल्या ब्रिटिश सरकार विरोधी कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला; त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली. कारावासात ते आपला बहुमूल्य घालवीत होते. तुरुंगात असताना त्यांनी कार्लमार्क्स व मानवेंद्र रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मानवेंद्र वेळ वाचनात रॉय यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.

               १९४२ साली म. गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारला त्यांनी भूमिगत राहून सहकार्य केले. पुढे ते पकडले गेले. त्यानंतर त्यांची सुटका झाली.

               १९४६ साली त्या वेळच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन त्यामध्ये ते निवडूनआले. संसदीय चिटणीस बनले. १९५२ सालच्या निवडणुकीत निवडून येऊन ते मंत्री झाले व नोव्हेंबर १९५६ साली त्यांनी द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 

             जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांना भेटून महाराष्ट्राची बाजू मांडली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी पूर्ण करून घेतली. त्या राज्याचे तेच मुख्यमंत्री झाले. पुढे १९६२ ते १९६६ या काळी ते भारताचे संरक्षण मंत्री झाले. १९६६ ते ७० गृहमंत्री व १९७० ते ७४ ते परराष्ट्र मंत्री अशी विविध पदे भूषविली. पुढे ते उपप्रधानमंत्री होते. 

               सर्वसामान्य जनतेचीही ते काळजी घेत होते. सर्वांशी ते आपुलकीने वागत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ यांसारख्या अनेक सांस्कृतिक व लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या. मराठी विश्वकोषाच्या निर्मितीस त्यांचे सहकार्य लाभले.

                  यशवंतराव चव्हाण हे प्रभावी वक्ते होते. अनेक नवनवीन योजना ते मांडत असत. नवीन विचारांतून ते समाज प्रबोधन करत असत. सह्याद्रीचे वारे व युगांतर हे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. अशा या थोर मानवाचा मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 रोजी झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे मुद्दे


⚜️ यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 देवराष्ट्र, सातारा (सध्या हे गाव सांगली जिल्ह्यात येते) येथे झाला.

⚜️ 1938 ला मुंबई विद्यापिठातून बी.ए. झाले.

⚜️ जवाहरलाल नेहरु, केशवराव जेधे, सरदार पटेल या नेत्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

⚜️ 1930 ला सविनय कायदेभंग आंदोलनात सहभाग घेतला.

⚜️  26 जानेवारी 1932 ला सातारा येथे भारतीय ध्वज फडकविला म्हणून त्यांना 18 महिन्यांचा कारावास झाला.

⚜️ 1940 ला सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी अटक व शिक्षा झाली.1944 ला कारागृहातून बाहेर आले.

⚜️ 1946 ला दक्षिण सातारा मतदारसंघातून मुंबई प्रांताच्या विधीमंडळ सदस्यपदी निवडून आले. आणि मुंबईराज्य गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नेमणुक झाली.

⚜️ 1952 मध्ये परत मुंबई प्रांताच्या विधानसभेवर सदस्य म्हणून निवड व मंत्रीपदी नेमणूक. 

⚜️ 1953 च्या नागपूर करारातील हस्ताक्षर कर्त्यांपैकी एक प्रमुख नेते होते.

⚜️ 1956 मध्ये महाराष्ट्र-गुजरात या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले.

⚜️ संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी पं. नेहरू, गोविंद वल्लभपंत यांचे मन वळविले.

⚜️ 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासा- साठी त्यांनी प्रयत्न केले.

⚜️ त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात.

⚜️ 1962 मध्ये भारताचे संरक्षणमंत्री झाले.

⚜️ 1979 ला चरणसिंग सरकारमध्ये भारताचे उपपंतप्रधान झाले.

⚜️ यशवंतराव चव्हाण हे राजकारणी, उत्कृष्ट प्रशासक, साहित्यीक, कणखर नेता होते.

⚜️ लेखन - सह्याद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध, कृष्णाकाठ (आत्मचरित्र)

⚜️निधन 25 नोव्हेंबर 1984 त्यांची समाधी प्रीतीसंगम, कराड

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

यशवंतराव चव्हाण यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पहायचा असेल तर खालील चित्राला टच करा



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवायचे असल्यास खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


सैनिकी स्कूल माहिती

 सैनिक स्कूल माहिती


👉👉महत्वाची सूचना👇👇


सैनिकी स्कूल प्रवेशासाठी online form भरणे सुरू झालेले आहे .ज्यांना form भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर form भरून घ्या.

परीक्षा 8 जानेवारी 2023 ला आहे.

form भरण्याची शेवटची तारीख :30 नोव्हेंबर 2022 आहे परंतु लवकरात लवकर form भरून घ्या.

form भरण्यासाठी तुमचा जन्म  1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 यात असायला हवा.

पूर्ण माहिती खाली pdf मध्ये देत आहे  व्यवस्थित वाचा .

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माहितीपत्र DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा



Friday, November 18, 2022

इंदिरा गांधी संपूर्ण माहिती

⚜️ इंदिरा गांधी ⚜️



                अलाहाबाद हे प्रसिद्ध शहर. येथे गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा संगम आहे. या गावात इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917रोजी झाला. दिवाळीचा उत्सव चालू असताना इंदिरा गांधी जन्मल्या) वडील जवाहरलाल आणि आईचे नाव कमला. आजोबा मोतीलाल नेहरू. यांच्यापासून राजकीय वारसा लाभला होता. त्यांच्या घराण्यात देशभक्ती नांदत होती. वडिलांनी नाव इंदिरा ठेवले होते; परंतु त्याच्या जोडीला 'प्रियदर्शनी' म्हणत. (आजोबा, वडील यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावे लागत होते त्यामुळे इंदिराजी यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले. अलाहाबाद येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले .

                    इंदिराजी पुण्यात आल्या आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्या वेळी लाठी, हुतुतू, लेझीम, पर्वतारोहण यांमध्येही त्या भाग घेत असत. पुढे त्या गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये राहिल्या, त्यानंतर आई आजारी पडल्यामुळे हवापालट करण्यासाठी त्या आईबरोबर इंग्लंडला गेल्या. ऑक्सफर्ड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागल्या. तेथील शिक्षणात बरेच अडथळे आल्याने त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

                   दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी त्या भारतात आल्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी निगडित असलेल्या विविध चळवळींत सहभाग घेतला. कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. १९४२ सालच्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला. २६ मार्च १९४२ साली त्यांचा फिरोज गांधींबरोबर विवाह संपन्न झाला, त्यांना राजीव, संजय असे दोन मुले झाली. १९५९ मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. १९६० मध्ये त्यांना पतीनिधनाचा आघात सहन करावा लागला.

                 १९६४ साली पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पद सांभाळले. दीड वर्षात त्यांचेही निधन झाले. इंदिराजी आरंभी मंत्रिमंडळात नभोवाणी खाते सांभाळत होत्या. शास्त्रींनंतर त्या भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या. त्यांनी गरिबी हटविण्यासाठी एकवीस कलमी कार्यक्रमाचे आयोजन केले.२४ जानेवारी १९६६ ला पंतप्रधान झाल्यावर सतत १८ वर्षे त्या त्या पदावर कार्य वात करत होत्या. या काळात अनेक संकटे आली; पण त्या कधीही डगमगल्या नाहीत राष्ट्रीय एकात्मता निर्माण मल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतात सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इंदिराजींनी कला प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. संस्थानिकांचे हक्क, सवलती, तनखे रद्द करून टाकले. समाजवादी, पुण्या समाजरचना निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न सर्गद केले. पाकिस्तानच्या पूर्व बंगालमधील त्रासलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी लष्करी मदत केली आणि पूर्व पाकिस्तानला बांगलादेश हा दर्जा मिळवून दिला. राष्ट्रपतींनी त्यांना १९७१ मध्ये भारतरत्न किताब दिला.

             ३ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाक युद्ध झाले. त्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पूर्ण पराभव केला. कीर्ती इंदिराजींनी कणखर भूमिका घेतली होती. १९७५ साली इंदिराजींनी देशात आणिबाणी जाहीर केली. दीड वर्षात आणीबाणी उठली. नव्यानेच स्थापन झालेल्या जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली, मात्र अल्पावधीतच अंतर्गत मतभेदामुळे जनता पक्षाचे सरकार कोसळले, मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका घोषित करण्यात आल्या. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली परत एकदा सरकार प्रस्थापित झाले. देशाची अखंडता राखण्याचा त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केला इंदिराजींच्या शरीररक्षकांनीच त्यांच्यावर १६ गोळ्या झाडून त्यांना मारले. शेवटच्या  क्षणापर्यंत त्यांनी भारतमातेची सेवा केली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे

⚜️ जन्म 19 नोव्हेंबर 1917 ला उत्तरप्रदेशात अलाहाबाद येथे झाला. 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.

⚜️ 1959 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

⚜️ 1964 मध्ये शास्त्रीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होत्या. 1966 मध्ये पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

⚜️ 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 1971 मध्ये निवडणुक प्रचारादरम्यान गरीबी हटाओ चा नारा दिला. 1971 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला.

⚜️ 1972 मध्ये सिमला करार केला.

⚜️ 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.

⚜️ 1974 मध्ये पहिला अणुस्फोट पोखरण येथे.

⚜️ 1980 मध्ये 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 31 ऑक्टोंबर 1984 ला त्यांच्या अंगरक्षकाने त्यांची गोळ्या हत्या केली.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

इंदिरा गांधी यांचा निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इंदिरा गांधी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सराव चाचणी सोडवण्यासाठी करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



जिल्हाअंतर्गत बदली सुधारित वेळापत्रक

 जिल्हाअंतर्गत बदली सुधारित वेळापत्रक


जिल्हाअंतर्गत बदली सुधारित वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.



Wednesday, November 16, 2022

निबंध इंदिरा गांधी

 ⚜️ इंदिरा गांधी ⚜️



             इंदिरा गांधी ह्या पंडित नेहरू आणि कमला नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद येथे  झाला. त्या लहान असताना पंडितजी बराच काळ तुरुंगात असत कारण ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते. तर आईला क्षयरोग झाल्यामुळे तिला विश्रामधामात ठेवलेले होते. त्यामुळे इंदिराजींचे बाळपण एकाकी स्थितीत गेले. परंतु पंडित नेहरू नेहमी आपल्या कन्येला तुरूंगातून पत्रे पाठवत असत. त्या पत्रांतूनच त्या बापलेकीतील नाते घट्ट होत गेले.

              पंडितजी आणि गांधीजी ह्यांच्याकडे त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यामुळे नेहरूंच्या पश्चात् लालबहादुर शास्त्री ह्यांचे अचानक निधन झाले तेव्हा इंदिरा गांधी ह्याच भारताच्या तिस-या पंतप्रधान बनल्या.

             त्यांच्या पतीचे नाव फिरोझ गांधी असे होते आणि मुलांची नावे राजीव आणि संजय अशी होती.

              १९७२ साली पाकिस्तानशी युद्ध करून त्यांनी बांगला देश ह्या नव्या देशाची निर्मिती केली. म्हणून त्यांना दुर्गादिवी अशी पदवी लोकांनी दिली.

त्या खूप जिद्दी, करारी आणि कणखर पंतप्रधान होत्या. ३० ऑक्टोबर, १९८४ रोजी त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांची हत्या केली.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इंदिरा गांधी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सराव चाचणी सोडवण्यासाठी करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️