SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, October 21, 2024

संकलित चाचणी 1 शिक्षक मार्गदर्शिका

 *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*

शिक्षक मार्गदर्शिका

STARS अंतर्गत PAT २  संकलित चाचणी -१  साठी शिक्षक मार्गदर्शिका  Download करण्यासाठी खालील लिंक वर click करा.

भाषा मराठी माध्यम शिक्षक मार्गदर्शिका पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


भाषा इतर माध्यमाच्या शिक्षक मार्गदर्शिका पाहण्यासाठी ~ Click here


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

गणित मराठी माध्यम शिक्षक मार्गदर्शिका पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा



गणित इतर माध्यमाच्या शिक्षक मार्गदर्शिका पाहण्यासाठी ~ Click here



टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता वरील लिंक वर उपलब्ध असेल.


*मूल्यमापन विभाग*


सौजन्य ~ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित भाषणी-१ करिता शाळा भेटीबाबत.

 STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ करिता शाळा भेटीबाबत.

संकलित चाचणी 1


विषय:- STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ करिता शाळा भेटीबाबत.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते मववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांये नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, य तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वी तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची संकलित चाचणी -१ होणार आहे.

• संकलित मूल्यमापन भाचणी-१ वेळापत्रक (कालावधी दि. २२ ते २५ऑक्टोबर २०२४)


शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी.विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

                   इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजनकरण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा या विषयांची दुवार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही. 

               तरी सदर कालावधीत उपरोक्त सर्व अधिकान्यांनी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत किमान तीन शाळाभेटी कराव्यात. सदर शाळाभेटी करताना सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचा यात समावेश असावा. तसेच सदर शाळाभेटी संदर्भातील माहिती https://forms.gle/NM4cM6AUbfwuMcAm9 या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.

संकलित चाचणी-१ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ च्या शाळाभेटीसाठी उपरोक्त सर्व अधिकारी यांनी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या संपर्क वालुक्यात सदर भेटीसाठी आवश्यकतेनुसार आदेशित करावे. तसेच संबंधित सर्व जिल्ह्यातील प्राचार्य, (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांनी PAT शाळाभेटीचा व संकलित चाचणी-१ नंतर १०% शाळांच्या १०% विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांची/उत्तरपत्रिकांची फेरतपासणी बाबतचा एकत्रित अहवाल सदर कार्यालयास मूल्यमापन विभागाच्या evaluationdept@maa.ac.in या इमेल वर पाठविण्यात यावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा




Friday, October 18, 2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2025 च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत...

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2025 च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत...


विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2025 च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत...

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.

सोबत :- अधिसूचना


विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...


शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

                उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. 

सोबत :- अधिसूचना



१.३ ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक :-

२) शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :-

> पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.

> प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

> पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-

१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित/ विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष :-

> शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

१) पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. शाळा ग्रामीण भागातील असावी.

3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. 

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

> आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.

4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.

5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

➤ विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दबडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा.

3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

५) परीक्षेचे माध्यम :-

५.१ परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

१. मराठी.     २. उर्दू.         ३. हिंदी.         ४. गुजराती

५. इंग्रजी.      ६. तेलुगु.       ७. कन्नड

५.२ उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत.

१. मराठी + इंग्रजी.        २. उर्दू + इंग्रजी

३. हिंदी + इंग्रजी.           ४. गुजराती + इंग्रजी

५. तेलुगु + इंग्रजी.            ६. कन्नड + इंग्रजी

५.३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी

पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

६) वयोमर्यादा :-

६.१ या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय दि. ०१ जून २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.

६.२ आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकीची नोंदविल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरवरून खात्री करुनच जन्मतारीख अचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे.

६.३ चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

६.४ अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदविलेली असल्यास (उदा. ३१ एप्रिल) ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपध्दतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी.

६.५ उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्यास सस्क्रीनवर 'विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे, तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.' असा संदेश दिसेल. अशा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच सदर वाव संबंधित विद्यार्थी व पालक यांच्याही निदर्शनास आणून द्यावी.

७) परीक्षा शुल्क :-

७.१ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. ११/११/२०२१, दि. १५/११/२०१६ व

कार्यकारी समिती सभा क्र. २९, दि. १२/०४/२०१८, ठराव क्र. ४७० नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत.

७.२ महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B,

NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली

असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.

७.३ सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुध्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

७.४ उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल.

८) शुल्क भरण्याची पध्दत :-

८.१ शाळांसाठी सूचना : उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करुन इयत्तानिहाय (इ. ५ वी व इ. ८ वी) स्वतंत्रपणे शक्यतो एकाचवेळी भरावे.

८.२ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शाळांसाठी सूचना: ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजे दि. ३०/११/२०२४ रोजीपर्यंतच उपलब्ध करुन देण्यात येईल. नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरावयाचे असल्यास संबंधित शाळेला विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील.

८.३ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्यासाठी सूचना :- ज्या जिल्ह्यांमध्ये सदर परीक्षेच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड

/ मनपा निधीमधून भरली जाते, त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी यांनी शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार सन २०२१ २२ च्या परीक्षेपासून शुल्क वाढ झाली असल्याची बाब जि. प. मनपाच्या संबंधित समितीच्या निदर्शनास आणावी.

आपल्या जिल्ह्यातील नियमित शुल्काच्या मुदतीत आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुल्काची एकूण रक्कम तात्काळ उपलब्ध करुन घ्यावी व परिषदेच्या खात्यावर इयत्तानिहाय ऑनलाईन पेमेंटव्दारे दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेरपर्यंत भरावी. सदर शुल्क भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उपरोक्तनुसार शुल्काचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार नाहीत. तसेच जिल्हा परिषद / मनपा शाळांना नियमित शुल्काच्या मुदतीनंतरचे (दि. ३०/११/२०२४ नंतरचे) कोणतेही विलंब शुल्क माफ केले जाणार नाही, त्यामुळे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना नियमित मुदतीत आवेदनपत्र भरण्याच्या लेखी सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

९) परीक्षा परिषद शाळा सांकेतांक :-

शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व कामकाज युडायस कोडनुसार करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक नोंदविण्याची आवश्यकता नाही.

१०) ग्रामीण, शहरी क्षेत्र निकष :-

१०.१ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ अन्वये पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" भागात करण्यात यावी. तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील (ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात नसल्यास) शाळांची गणना "शहरी" भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी अधिनस्त शाळांच्या क्षेत्राबाबत खात्री करावी.

१०.२ दि. १७/१०/२०२४ पासून शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरूवात होणार असल्याने दि. १६/१०/२०२४ या दिनांकास / दिनांकापूर्वी जी स्थिती असेल ती ग्रामीण / शहरी बाबत ग्राहय धरण्यात यावी. उदा :- एखाद्या गावातील ग्रामपंचायतीचे रुपांतर दि. १६/१०/२०२४ वा तारखेनंतर नगरपंचायत / नगरपरिषद / नगरपालिका इ. मध्ये झाले असल्यास संबंधित शाळा ग्रामीण क्षेत्रातच ग्राहय धरली जावी.

११) C.B.S.E. व I.C.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत :-

शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ नुसार I.C.S.E. आणि C.B.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या ५० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही.

१२) बार्टी शिष्यवृत्ती :-

मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या कार्यालयामार्फत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती' अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन २०१४ पासून देण्यात येते.

त्यानुसार इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठविण्यात येते.

१३) ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना :-

१. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहेत. ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

२. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय, आदिवासी, विजाभज विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी एकत्रित एकच आवेदनपत्र आहे. त्यात इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रतेनुसार विकल्प उपलब्ध आहेत.

३. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी / खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी. याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.

४. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट, आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.

५. ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील.

६. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रू.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

७. विद्यार्थ्यांचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.

८. मुद्दा क्रमांक ६ व ७ मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावेत.

९. ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुद्देनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.

१०. संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची / व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी.

११. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून (इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या शाळा, नेट कॅफे इ.) आवेदनपत्रे भरावीत.

१२. नेट कॅफेमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगीनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुनच सबमीट करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.

१३. परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.

१४. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच भरावीत.

१५. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत करावे.

१६. आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट (Broadband) कनेक्शनचा उपयोग करावा.

१७. आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ७५ व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राऊजरचाच वापर करावा. जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.

१८. आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी युडायस कोड असणे अनिवार्य आहे.

१९. आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे.

२०. आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्दयांची (Mandatory Field) माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र SAVE होणार नाही.

२१. Login Id व Password जतन करून ठेवावेत. ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत.

२२. विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक अनिवार्य आहे. तथापि बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही, मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळा मुख्याध्यापकांची राहील.

१४) परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती :-

१. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.

२. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.

३. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत) देण्यात येणार नाही.

४. उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.

५. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील.

६. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.

१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)

उदा. :- विद्यार्थ्यांचा फोटो 

          विद्यार्थ्यांची स्वाक्षरी

२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)

३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)

४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.

१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :-

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बँक खात्याची माहिती (विद्यार्थ्याशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी.

१७) शिष्यवृत्ती रकमेतील वाढ :-

शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. ५ वीच्या सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु.५०००/- प्रतिवर्ष) व इ. ८ वीच्या सर्व संचांकरीता रु.७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु.७५००/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.

१८) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा :-

शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र. ३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार इ. ५ वी व इ. ८ वीच्या मागासवर्गीय मुले/मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) या शिष्यवृत्ती संचांकरीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात आलेली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.




Tuesday, October 15, 2024

संकलित मूल्यमापन सत्र एक

 संकलित मूल्यमापन चाचणी ~ 1

सौजन्य ~ शिक्षकमित्र समूह अहमदनगर


इयत्ता पहिली 


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता दुसरी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 इयत्ता तिसरी व चौथी परिसर अभ्यास


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता चौथी 


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता पाचवी


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता सहावी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इयत्ता सातवी

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 इयत्ता पहिली व दुसरी इंग्रजी पेपर

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 

Monday, October 14, 2024

प्रधानमंत्री पोषणशक्ती आहाराबाबत

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नागरी भागातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत...

प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजना


प्रस्तावना:-

              केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.

सदर योजनेंतर्गत नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहार पुरवठा करण्यात येतो. यासाठी संबंधित महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद /कटकमंडळे यांच्या स्तरावर स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबवून महिला बचत गट / स्वयंसेवी संस्था / अशासकीय संस्था यांची निवड करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथ.) यांच्या स्तरावरून दि.१६ मार्च, २०१९ व दि.१३ मे, २०२२ रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यात महानगरपालिका/नगरपालिकाक्षेत्रात अन्न शिजवणाऱ्या संस्थांची निवड करण्यात येत आहे. सदरप्रमाणे केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालींद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी संस्थांच्या निवडीकरीता राबविण्यात येणाऱ्या स्वारस्याच्या अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेमध्ये अनियमितता होत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. तसेच, केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीव्दारे पुरवठा करण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, विद्यार्थ्यांना शासन नियमाप्रमाणे पुरक आहार न देणे आदीबाबतच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. तसेच, नियुक्त महिला बचत गट / संस्था यांना मुदत संपल्यानंतरही शासन धोरणाविरुध्द महानगरपालिका/नगरपालिका स्तरावर परस्पर मुदतवाढ देण्याची प्रकरणे शासनाच्या निदर्शनास आले आहेत.

राज्यातील नागरी भागातील शाळांना केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या निवडीकरिता राबविण्यात येत असलेल्या स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी लक्षात घेता, योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण / विकेंद्रिकरणाच्या दृष्टीने तसेच, जास्तीत जास्त महिला बचत गटांना तयार आहाराचा पुरवठा करण्याचे कामकाज मिळण्याकरीता नागरी भागातील योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

                 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

i. नागरी भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी महिला बचतगट / संस्थांची निवड करण्याचे अधिकार यापुढे नागरी भागातील संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहेत.

              ii. नागरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने प्रति दिन प्रति विद्यार्थी निर्धारित केलेला तांदूळ व आहार खर्चाची रक्कम संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात येईल. नियुक्त बचत गट/संस्था यांनी शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीप्रमाणे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक राहील.

                iii. नागरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक स्तरावरील महिला बचतगट / संस्थांची प्राधान्याने नियुक्ती करण्याकरीता संबंधित शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बहुमताने ठराव करुन घेण्यात यावा. तसेच, शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्त केलेल्या बचतगट/संस्थासोबत प्रतिवर्षी करारनामा करण्यात यावा.

                  iv. सद्यस्थितीत राज्यातील ज्या नागरी भागातील शाळांना केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालींद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्याकरीता महानगरपालिका/नगरपालिका यांच्यामार्फत स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेव्दारे महिला बचत गट / संस्थांची निवड करण्यात आलेली आहे, प्रस्तुत संस्था / महिला बचत गट यांच्यासोबत करण्यात आलेला करारनामा अस्तित्वात आहे तोपर्यंतच त्यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्यात यावा. सदर करारनाम्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रस्तुत संस्थांना/बचत गटांना कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ देण्यात येऊ नये.

              V. महानगरपालिका / नगरपालिका / कटकमंडळ यांच्या स्तरावरुन स्वारस्यांची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रियेद्वारे निवड केलेल्या संस्था/ बचत गट यांच्याशी केलेला करारनामा संपुष्टात आल्यावर संबंधित महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील शाळांना बचतगट निवडीचे अधिकार राहतील. तद्नंतर

 संबंधितमहानगरपालिका/नगरपालिका/ कटकमंडळ यांनी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरीता स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबविण्यात येऊ नये.

                vi. महानगरपालिका/नगरपालिका कार्यक्षेत्रामधील योजनेंतर्गत पात्र शाळांपैकी काही शाळांना योजनेचा लाभ एखाद्या सेवाभावी अशासकीय संस्थेमार्फत (उदा. अक्षयपात्र, अन्नामृत इ.) देण्याबाबतचा ठराव संबंधित महानगरपलिका/नगरपालिका यांच्या सर्वसाधारण सभेने घेतला असल्यास त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिका/नगरपालिका यांच्याकडे राहतील. प्रस्तुत महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील उर्वरित शाळांना आहार पुरवठा करण्यासाठी संस्था/बचत गट नियुक्तीचे अधिकार संबंधित शाळांना राहतील. तसेच, महानगरपालिका/नगरपालिका यांनी स्वयंसेवी संस्था यांना वाटप केलेल्या शाळांची माहिती संबंधित महानगरपालिका/नगरपालिका यांनी शिक्षण संचालक (प्राथ.) यांना देणे आवश्यक राहील.

               vii. नागरी भागातील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळांना आहार पुरवठा करण्यासाठी बचत गटांच्या निवडीचे निकष, देयके अदायगी, नियंत्रण आदीबाबतच्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक (प्राथ.) यांच्या स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१४१८०९५१७७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करायचे असल्यास खालील चित्राला टच करा.



Saturday, October 12, 2024

STARS प्रकल्प अंतर्गत ब्लेंडेड मोड कोर्स

 STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत..


विषय : STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत..


संदर्भ : १. STARS प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५

२) STARS प्रकल्प मान्यता मंडळ इतिवृत्त सन २०२४-२५ दि.३१ जानेवारी २०२४

३. प्रस्तुत कार्यालयाची मंजूर टिपणी दि. ३०/०९/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

त्यानुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि. २०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि.२१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एकदिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे. उपलब्ध कोर्स पूर्ण करणेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे.


* शिक्षकांसाठी सूचना :

1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.

2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व तो पूर्ण करू शकतात.

3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तर कोर्स साठी नोंदणी करावी.

4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करावी.

5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.

6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावरच मूल्यमापनासाठी प्रश्न उपलब्ध होतील.

7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक दिवसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे.

8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० तास ग्राह्य धरण्यात येतील.

9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येईल.

10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील.


गटसाधन केंद्र/शहर साधन केंद्र (BRC /URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी :


1. राज्यस्तर/जिल्हास्तर वरून प्राप्त झालेल्या ब्लेंडेड कोर्स संदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे.

2. आपल्या बीआरसी/युआरसी कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्सला नोंदणी करण्यासंदर्भातील पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे.

3. ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय व्हाट्सअप गट तयार करून कोर्स बाबत वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे.

4. वरिष्ठ स्तरावरून कोर्स संदर्भातील आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार PLC चे आयोजन करणे.

5. पीएलसी च्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पीएलसी पूर्ण करणे.

6. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.


* ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांची भूमिका :


1. शिक्षकांनी ब्लेंडेड कोर्स करण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे व शिक्षकांना प्रोत्साहन देणे,

2. ब्लेंडेड कोर्स संदर्भात नोंदणी, कोर्स माहिती, PLC माहिती बाबत केंद्र स्तरावर उद्बोवन सत्र आयोजन करणे.


3. ब्लेंडेड कोर्स मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना सूचित करणे.


4. ब्लेंडेड कोर्स शिक्षकांच्या सीपीडी साठी तयार करण्यात आलेला असून जे शिक्षक कोर्स पूर्ण करतील त्यांच्या प्रमाणपत्राची नोंद आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेकडून सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करणे.


5. जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने तालुकास्तरीय पीएलसीला भेटी देण्याचे नियोजन करणे.


ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिका :


1. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकांपर्यंत प्रसारित करणे.


2. ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्वयक म्हणून नेमून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविणे.


3. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/URC पर्यत पोहोचवणे.


4. ब्लेंडेड कोर्स संदर्भात जिल्हास्तरीय आढाबा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे,


5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात पीएलसी चे नियोजन व आयोजन करणे,


6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे.

उक्त नमूद सर्व बाबीच्या अधीन राहून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांना कोर्सेस पूर्ण करणेसाठी योग्य समन्वय साधावा.

सोबत - ब्लेंडेंड कोर्सची स्मार्ट Pdf.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.





Friday, October 11, 2024

पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

 पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.



विषयः- पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

संदर्भ:-१. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६६६/टिएनटी-१, दि.१०/०९/२०२४. २. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडील दि.१३.०९.२०२४ रोजीची पत्र.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न) 

                  १. भरती प्रक्रीयेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहीलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रीयेचाच एक भाग आहे. यानुसार या पूढील सर्व भरती प्रक्रीयेमध्ये अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरुन सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.

                   २. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतूदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्यावत बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत फळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.

                     ३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्यअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणा-या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेवून प्रवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

                       पवित्र पोर्टलमार्फत दुस-या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.

 सोबतः-संदर्भीय पत्र

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.





Sunday, October 6, 2024

I am winner ऑक्टोंबर ऑनलाईन टेस्ट

 ध्येय प्रकाशन अकॅडमी ऑफ महाराष्ट्रा संचलित I am winner राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा

Marathi/Semi English Medium  Online test  September 2024

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

आय एम विनर स्पर्धा परीक्षेची माहिती व्हिडिओ ~

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


I AM WINNER स्पर्धा परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ~ CLICK HERE

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️


जर तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका व्हाट्सअप वर हव्या असतील तर ~ 

CLICK HERE


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

खालील इयत्तेला टच करून आपल्या वर्गाची ऑनलाईन टेस्ट सोडवावी



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Thursday, October 3, 2024

नवोपक्रम २०२४-२५

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

नवोपक्रम


विषय : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

                  राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्याधर्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

                प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.

                    प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी देण्यात यावी. तसेच सदर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-मेल पत्त्यावर कळविण्यात यावा. प्रस्तुत स्पर्धा ही सन २०२४-२५ साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी संबंधितांना अवगत करण्यात यावे.

त्यानुसार आपल्या अधिनस्त उपरोक्त नमूद पाच गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहिती पत्रक निदर्शनास आणून द्यावे. संबंधित स्पर्धकांनी माहिती पत्रकाचे अवलोकन करावे. आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी लिंक देण्यात येईल. दिलेल्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

सोबत : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ संभाव्य वेळापत्रक आणि माहिती पत्रक

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ 

माहितीपत्रक

                राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. याच बरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

⚜️ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.

२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.

४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.

५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.


⚜️ नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४) नवोपक्रमाचे नियोजन -

          १) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण

          २) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा

          ३) आवश्यक साधनांचा विचार

         ४) करावयाच्या कृतींचा क्रम

         ५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

          ६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

          ७) उपक्रमासाठी इतरांची मदत

          ८) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे


५) नवोक्रमाची कार्यपद्धती -

       1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

       2. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन

       3. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

       4. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी

        5. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)

               या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.

७) समारोप - आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.

८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7 BjMmcx1Hc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थ देण्यात आली आहे.)


🏆 स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

            १. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

              २. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

               ३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

              ४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

               ५. सन २०२३ २४-पासून मराठी माध्यमासह इतर शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी, किंवा इंग्रजी भाषेमध्ये च सादर करावा.


🏆 स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५. नवोपक्रम लेखन मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.

७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या कालावधीमध्ये राबविण्यात

आलेला असावा. ९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादित नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.

१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.

१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल.

१५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.


नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन :

                 नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग म्जगवा द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.


                   जिल्हास्तर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर प्रथम फेरीत नवोपक्रम अहवालांचे मूल्यांकन करून प्रथम १ ते ७ क्रमांकावर असलेल्या नवोपक्रमांचे सादरीकरण कार्यालयात करून द्वितीय फेरीत मूल्यांकन करण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारावरच जिल्हा व विभाग प्रथम पाच क्रमांक निर्धारित करण्यात येऊन तेच पुढे राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.

(टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यमापन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल.)

नवोपक्रम अहवालाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर मूल्यांकन पुढील निकषांच्या आधारावर करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून राहील.


             राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.


⚜️ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :

पहिला टप्पा :


अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार -

पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आ)


🏆 विभागस्तरावरील पुरस्कार -

विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले

जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. (टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण,

मुंबई या स्तरावर करण्यात येईल)

दुसरा टप्पा :

राज्यस्तरावरील पुरस्कार -

नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील पाच गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.


⚜️ नवोपक्रम बँक :

राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त सर्व नवोपक्रमांचा तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रमांचा समावेश राज्याच्या नवोपक्रम बँक (Innovation Bank) मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम SCERT, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या वेबसाईट वर Innovation Bank मध्ये प्रसिध्द करण्यात येतील.


🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.