⚜️ दादाभाई नौरोजी ⚜️
दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नौरोजी पालनजी दोर्दी व आई माणिकाबाई या होत्या. वडील पारशी समाजाचे पौरोहित्य करून आपला प्रपंच चालवीत होते.
दादाभाई चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने पालन पोषण केले. दादाभाईंचे प्राथमिक शिक्षण सुरू असताना आईने त्यांचे लग्न सोराबजी श्रॉफ यांची सात वर्षाची मुलगी गुलाबी हिच्यासोबत लावून दिले.
ते लहानपणापासून अत्यंत हुशार होते अत्यंत एकाग्रतेने ते अभ्यास करत असत. त्यामुळे त्यांच्या जाणीव लहानपणापासूनच प्रकल्प होत. गेल्या 845 मध्ये त्यांनी मुंबईच्या एलफिस्टंट कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. अध्ययन व अध्यापन यामुळे त्यांना समाजाची ओळख होऊ लागली आणि त्यांनी आपल्या सार्वजनिक कामास सुरुवात केली. त्यांनी मराठी व पारशी मुलांसाठी काही शाळा काढल्या. तसेच त्यांनी 1851 मध्ये रास्त गोफ्तार (खरी बातमी) हे गुजराती साप्ताहिक काढले.
1855 मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली. आणि ते कामा आणि कंपनीचे व्यवस्थापक म्हणून लंडनला गेले. तेथे त्यांनी अनेक भारतीय संस्थांची संबंध ठेवला. आणि भारतीयांची मने जिंकून घेतली. लंडनमध्ये काम करताना त्यांनी तेथील वृत्तपत्रात लेख लिहून भारताबद्दल असलेले गैरसमज दूर केले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात गुजराती भाषा शिकवण्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865 साली इंग्लंडमध्ये वास्तव्य करणाऱ्या व्ही. सी. बॅनर्जी यांच्या साह्याने त्यांनी "लंडन इंडिया सोसायटी" ही संस्था सुरू केली. हळूहळू संस्थेचे कार्य वाढू लागले.
1869 मध्ये दादाभाई भारतात परत आले त्यावेळी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले 1873 साली त्यांनी "प्रॉव्हर्टी इन् इंडिया" हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक "कंडिशन ऑफ इंडिया" या नावाने प्रसिद्ध झालेल्या वास्तवात त्यांनी भारतातील परंपरागत रुढीत गुंतलेला समाज पाहिला.
मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे हे होते. त्यांच्या कौन्सिलमध्ये काम करत असताना ते पुन्हा इंग्लंडला गेले. 1892 मध्ये ते इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून आले. पार्लमेंटमध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी भारतीय लोकांना जो त्रास होतो, त्याचा विचार पार्लमेंटमध्ये निर्भीडपणे मांडला. इंग्लंड सरकारच्या मालाच्या रूपाने भारतातील पैसा इकडे कसे आणले जातात, याचे प्रतिपादन केले. "भारतीयांची गरिबी आणि ब्रिटिशांचे जुलमी राज्य" या ग्रंथात त्यांनी साधार विचार व्यक्त केले.
सामाजिक विषमता त्यांच्या अंतरंगाला मानवत नव्हती. स्त्री व पुरुषांना समान महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणत. स्त्रियांनी शिक्षण घेतलेच पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. विधवा विवाह हा अवश्य व्हावा असे त्यांचे स्पष्ट मत होते.
1885 मध्ये सर ऍलन ह्युम यांनी मुंबईत इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. यावेळी दादाभाई तेथे हजर होते. ते काँग्रेसचे सभासद बनले. आपले स्वराज्याचे विचार ते सातत्याने समाजासमोर मांडत असत. इंग्रजांच्या राजकारणातील दोष दाखवीत त्यांनी सामाजिक जागृती केली. 1886 कलकत्ता, 1893 लाहोर व 1906 साली कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनात ते अध्यक्ष होते.
कलकत्ता अधिवेशनात लोकमान्य टिळकांची भेट झाली. भारत स्वतंत्र झाल्याशिवाय आम्हाला प्रगती करता येणार नाही असे ते आपल्या सभेत जाहीर करत असत. लक्षावधी लोकांना त्यांनी आपल्या विचारांनी भारून टाकले. परदेशी मालावर बहिष्कार घाला व देशी मालाचा स्वीकार करा हे शिकवले. आम्हाला संपूर्ण "स्वराज्य" पाहिजे असे ते इंग्रजांना स्पष्टपणे सांगत असत.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे पितामह असे गौरविण्यात आले. वयाच्या 92 व्या वर्षी 30 जून 1917 रोजी मुंबईत त्यांची प्राणज्योत मावळली.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दादाभाई नौरोजी यांच्या जीवनावरील काही महत्त्वाचे मुद्दे~
🔖 दादाभाई नवरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरात मधील नौसारी या गावी पारशी कुटुंबात झाला.
🔖 एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते गणित या विषयाचे पहिले प्राध्यापक होते.
🔖 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.
🔖 1861 साली त्यांनी "रास्त गोफ्तार" या साप्ताहिकाची सुरुवात केली.
🔖 1873 मध्ये ड्रेन थेअरी (लुटीचा सिद्धांत) मांडला.
🔖 1874 मध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण बनले.
🔖 1875 मध्ये मुंबई महापालिकेचे सदस्य.
🔖 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग होता.
🔖 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य.
🔖 भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे त्यांना म्हटले जाते.
🔖 क्विन्समेरी मतदारसंघातुन निवडुन येऊन हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले हिंदी सभासद 1892 ला बनले.
🔖 1887 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.
🔖 "पावर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया" हा ग्रंथ लिहिल
🔖 इंग्रजांनी त्यांना "जस्टीस ऑफ पीस" हा किताब दिला
🔖 विल्बी कमिशन समोर साक्ष दे देणारे पहिले भारतीय होय.
🔖 त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, पितामह, ग्रँड-ओल्ड-मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते.
🔖 त्यांचे निधन 30 जून 1917 मध्ये मुंबई येथे झाले.