SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, August 24, 2022

शिवराम हरी राजगुरू

 शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1960 साली पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते अमरावतीस गेले. तेथे त्यांच्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली.

राजगुरू यांना बालपणापासून व्यायामाची गोडी लागली. ते आवडीने व्यायाम करू लागले. कोणतेही कार्य करावयाचे असेल तर शरीर बलशाली पाहिजे याची त्यांना माहिती झाली. व्यायाम शाळेत अनेक मुले व्यायाम करत होती. व्यायाम झाला की मुलांच्या गप्पागोष्टी होत होत्या. मुले देश प्रेमा संबंधी बोलत असत ते ऐकून राजगुरू यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली.

वयाच्या पंधराव्या वर्षी ते बनारसला आले. आणि तेथे राहून संस्कृतीचे अध्ययन करू लागले. बनारसला अनेक प्रांतातून मुले येत होती व संस्कृतीचे अध्ययन करत होती. राजगुरू यांचा स्वभाव ज्ञान संपादन करण्याचा होता. त्यामुळे मुलांकडून त्यांनी इंग्रजी, हिंदी, उर्दू ,मल्याळम ,कन्नड, गुजराती इत्यादी भाषा शिकून घेतल्या.

छत्रपती शिवरायांचे चरित्र त्यांच्या हाती पडले आणि ती स्फूर्ती ज्योत अधिकच प्रज्वलित झाली. शिवाजी महाराजांची युद्धातील कौशल्य त्यांनी अभ्यासले ते शिवाजी महाराजांना आपले दैवत मानत असत. बनारस येथे असताना ते काही काळ सेवादलात ही जात होते. सेवा दलातून त्यांना विविध गोष्टी शिकून घेता आल्या. तसेच तेथे असताना क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांच्याशी संबंध आला. ते त्यांच्या संघटनेत स्वयंस्फूर्तीने सामील झाले लढाईचे अनेक मंत्र त्यांनी शिकून घेतले, आणि बंदूक कशी चालवायची याचे ज्ञान प्राप्त करून घेतले. आपली शिकार कशी ठेवावी हे त्यांनी अभ्यासाने आत्मसात केले.

इंग्रजांच्या गुलामगिरीत आपला देश सापडला आहे, हे त्यांनी ओळखले. भारतमातेला आपण मुक्त करायचा प्रयत्न केला. पाहिजे हे ओळखले. 30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन कमिशन लाहोरला होते. त्यावेळी लाला लजपत राय यांनी पुढाकार घेऊन एक मोठी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीवर इंग्रज सरकारच्या शिपायांनी जोरदार लाठीहल्ला केला होता. एक लाठी लाला लजपतराय यांना वर्मी लागली व त्यामुळे आजारी पडून लालजींचा अंत झाला होता. ही घटना पाहून सर्व क्रांतिकारक अतिशय संतापले होते. लाहोर येथे पोलिस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी या दुःखद घटनेस कारणीभूत होते.

राजगुरू यांना लालाजींचा अंत पाहून फारच दुःख झाले होते. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंह यांच्या क्रांतिकारक संघटनेत राजगुरू सामील असल्यामुळे सर्वांनी एक कट रचला. राजगुरू बंदूक उत्तम तऱ्हेने चालवीत होते. ते पोलिस अधिकाऱ्यास बरोबर मारतील हे जाणून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दिली होती.

सर्वांनी मिळून योग्य प्रकारे नियोजन केले 17 डिसेंबर 1928 रोजी सँडर्स यांना बरोबर हेरली पहिल्या दोन गोळ्या बरोबर राजगुरू यांनी मारल्या आणि नंतर भगत सिंह यांनी मारल्या त्यांना पडावयास चननसिंग गेले. त्यावेळी चंद्रशेखर आजाद यांनी चननसिंग यांना बरोबर गोळी मारली. भारतीय क्रांतिकारकांनी जय जयकार केला.

आता येथे राहणे शक्य नाही. हे जाणून वेषांतर करून तेथून निघून गेले. अनेक गावोगावी वास्तव्य करून ते पुण्यात आले. नऊ महिन्यांचा काळ लोटला, पण इंग्रजांच्या ताब्यात राजगुरू सापडले नव्हते. परंतु 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना इंग्रज पोलिसांनी पकडले. त्यांना कैद करून तुरुंगात ठेवण्यात आले.

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर इंग्रजांनी खटला भरला. न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. 23 मार्च 1931 रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली. तिघेजण भारत मातेचा जयजयकार करत आनंदाने फाशी गेले. कोणतीही भीती त्यांच्या चेहर्‍वर नव्हती. आपल्या फाशीमुळे क्रांतीची बिजे पेरली जातील आणि देश लवकरच स्वतंत्र होईल याची त्यांना जाणीव होती. खेड या गावचे नाव राजगुरू यांच्या स्मरणार्थ राजगुरूनगर असे ठेवण्यात आले आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

शहीद राजगुरू (महत्त्वाचे मुद्दे)

🔖 जन्म 24 ऑगस्ट 1908 खेड, पुणे येथे झाला.

🔖 पूर्ण नाव ~ शिवराम हरी राजगुरू.

🔖 कमी वयात वाराणशी येथे विद्याभ्यास करण्यासाठी व              संस्कृत शिकण्यासाठी गेले.

🔖 त्यांना व्यायामाचा छंद होता .अमरावती येथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी मर्दानी खेळ प्रशिक्षण घेतले.

🔖 वाराणसी येथे शिक्षण घेताना अनेक क्रांतिकारकांच् सोबत त्यांचा संबंध आला. चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी ते अधिक प्रभावित झाले, आणि ' हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ' या संघटनेला जोडले गेले.

🔖 चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेत राजगुरूंना रघुनाथ या नावाने ओळखले जाई.

🔖 चंद्रशेखर आजाद, सरदार भगतसिंग, जतींद्रनाथ दास इत्यादी क्रांतिकारक राजगुरूंचे घनिष्ठ मित्र होते.

🔖 राजगुरू हे एक उत्तम निशानेबाज होते.

🔖 सँडर्स खुनसाठी राजगुरूंनी, भगतसिंग व सुखदेव यांना संपूर्ण साथ दिली.

🔖 पुढे त्यांना अटक झाली व सँडर्स खून खटल्यात 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल कारागृहात फाशी दिली गेली. अशाप्रकारे राजगुरू शहीद झाले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment