माझे वर्गशिक्षक
माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव संदीप गुळवे. ते खूप चांगले आहेत. मी याच वर्षी या शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे नवी शाळा कशी असेल याचे दडपण माझ्या मनावर आले होते. परंतु गुळवे सरांचा हसरा चेहरा पहिल्या दिवशी पाहिला आणि मनावरचे सगळे दडपण निघून गेले.
गुळवे सर खूप प्रेमळ आहेत. ते सर्व विषय समरस होऊन शिकवतात. आम्हाला गृहपाठ खूप जास्त देत नाहीत.
त्यांचे वर्गातील सर्व मुलांकडे चांगले लक्ष असते. कोणी जास्त दिवस शाळेत आले नाही तर त्यांना काळजी वाटते. आम्हाला ते अभ्यासक्रमाबाहेरच्या कविता आणि गोष्टीही सांगतात. जी मुले गुण कमी मिळवतात त्यांच्याकडे ते जास्त लक्ष देतात. त्या मुलांना काय कळत नाही ते समजून घेतात आणि त्यांना ती पुन्हा पुन्हा समजून देतात.
शिस्त पाळावी, अक्षर चांगले काढावे, स्वच्छता पाळावी ह्या गोष्टी ते आम्हाला शिकवतात. माझ्या चांगल्या अक्षराचे गुरुजींना खूप कौतुक वाटते. मला त्यांनी वर्गाचे मॉनिटर केले आहे.
गुरुजींचा मला फार आधार वाटतो. शाळा सोडल्यावर ही मी गुरुजींना कधीच विसरणार नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment