गणपती उत्सव
दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी पासून गणपती उत्सव सुरू होतो. सारे हिंदू ह्या दिवशी गणेशाची पूजा करतात.
स्वतंत्र्यापूर्वी हा सण घरगुती स्वरूपात साजरा होत. असे परंतु लोकमान्य टिळकांनी ओळखले की लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने जर आपण ह्या सणाचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात केली तर खूप चांगले होईल. तो काळ पारतंत्र्याचा होता सणाच्या निमित्ताने लोकजागृतीचे काम करता येईल असा हेतू त्यामागे होता.
सुरुवातीच्या काळात तो हेतू साध्य ही होत होता. कारण स्वतः लोकमान्य टिळक, केळकर गोखले, आणि रानडे यांसारखे वक्ते उत्सवाच्या वेळेस भाषणे करत असत. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा यांसारख्या गायिका तिथे येऊन मैफिली गात असत.
नंतर पुढे स्थानिक कलाकार नाटके, नृत्य बसू लागली. वेगवेगळ्या स्पर्धा होऊन स्थानिक मुलामुलींच्या कलागुणांना उत्तेजन मिळू लागले. लोकांनी सांस्कृतिक भूक भागू लागली. एकोपाही वाढू लागला.
आता मात्र ह्या उत्सवाला विकृत रूप मिळू लागले आहे. गणपतीच्या प्रचंड मूर्ती, अश्लील गाण्यांचा दणदणात, प्रदूषण, रस्ते अडवून घातलेले मंडप ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी घालून हा उत्सव चांगल्या स्वरूपात सादर झाला पाहिजे.
No comments:
Post a Comment