SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, January 29, 2025

मंथन सामान्य ज्ञान परीक्षा हॉल तिकीट

हॉल तिकीट 

मंथन सामान्यज्ञान परीक्षा

Admit Card - Manthan General Knowledge Examination 2025 

प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा

{ मंथन }

या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा

⚜️ हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर भरावा 

किंवा

⚜️ विद्यार्थ्यांचा स्टुडन्ट आयडी टाकून आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मंथन सामान्य ज्ञान परीक्षा या परीक्षेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा





राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....

 राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....



विषय - राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....


संदर्भ: जा.क्र राशैसंप्रप/कलाक्रीडा/सूर्यनमस्कार /२०२४-२५/००३७३ दि. २४/०१/२०२५


उपरोक्त विषयानुसार दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमीच्या दिनी जागतिक सूर्यनमस्कार दिन संपन्न होत आहे. या निमित्ताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियमित सूर्यनमस्कार द्वारे आरोग्य जतन करण्याचा संकल्प करणे अपेक्षित आहे. तद्नुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालये यांचे स्तरावर दि ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सूर्यनमस्कार प्रत्याक्षिकाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी परिसरातील सामाजिक संघटना, योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे. जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे, यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा, अशा सर्व सूचना आपले स्तरावरून आपले अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांचेमार्फत सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचे पर्यंत निर्गमित कराव्यात.

गटशिक्षणाधिकारी/विस्तार अधिकारी/सहाय्यक प्रशासकीय अधिकारी/केंद्रप्रमुख/पर्यवेक्षक/मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा, विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्रे आपले स्तरावरून संकलित करून

  dietpune@maa.ac.in 

या इमेल वर सादर करावा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा




Tuesday, January 28, 2025

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेबाबत

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये सुधारणा....


प्रस्तावना:-


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेतंर्गत इ.१ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ.६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच, शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीनुसार पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता. तथापि, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे (Three Course Meal) म्हणजेच तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासन निर्णय दि.११ जून, २०२४ अन्वये निश्चित करण्यात आली होती. तथापि, तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतींमध्ये सुधारणा करण्याकरिता मा. लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था/बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. सदर निवेदने व केंद्र शासनाने निश्चित केलेला प्रति दिन प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता, शासन निर्णय दि. ११ जून, २०२४ मध्ये नमूद केलेल्या आहार पध्दतीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे १२ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे राहील.


२) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्त्यातील अनु.क्र.१ ते १० पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. तसेच, प्रस्तुत अनु.क्र.१ ते १० पैकी कोणत्याही दोन अतिरिक्त पाककृतीची निवड करुन विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत.

३) उपरोक्त पाककृतींमधील अनु.क्र.११ (अंडा पुलाव) व अनु.क्र.१२ (गोड खिचडी/नाचणी सत्व) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात येत आहे. केंद्र शासनाने स्नेह भोजनाव्दारे योजनेंतर्गत लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने सदर दोन पाककृतीचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा, याकरिता शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येत नाही.

४) परिशिष्ट "अ" मध्ये पाककृतीनिहाय दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यांसाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे.

५) सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. त्यानुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे निर्णय घ्यावा, तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घ्यावा. प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक राहील.

६) सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावरुन परिपत्रकान्वये आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

७) प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१२८१७५०३९३७२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

PM POSHAN {शालेय पोषण} आहारामध्ये नवीन मेनू कसे ॲड करावेत याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा




इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत...

 इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांबाबत...




संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११६/एसडी-४, दिनांक ०८ मार्च, २०२३

२) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांचे पत्र क्र. ह / भाषा-भाषेतर/६०६०, दिनांक १८.१२.२०२४


प्रस्तावना :-

शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे; या सर्व मुद्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. या शासन निर्णयातील अनु. क्र. ८ मध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष २०२४-२५ पासून सदर योजना पुढे सुरु ठेवावी, असे नमूद करण्यात आले आहे.


संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांनी यासंदर्भात संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की, सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, ही योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता, पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही.

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन, संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.


शासन निर्णय :-

संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०१२८१६०१०२४०२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा



अभिरूप परीक्षेची अंतिम उत्तर सूची

 अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा

अंतिम उत्तर सूची

2024-25

अंतिम उत्तर सूची

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


इयत्ता पहिली ते आठवी मराठी व इंग्रजी माध्यमाची ची अंतिम उत्तरसूची पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

👇


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहितीचा VIDEO पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या अधिक माहितीसाठी ~ 

8308823022



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

👇



⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

👇




अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे इयत्ता पहिली

   अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे

अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे


इयत्ता पहिलीच्या सर्व विषयांच्या घटकांनुसार टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे व्हिडिओ पाहण्यासाठी

CLICK HERE 


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Whatsapp Group वर सराव चाचण्या हवी असतील तर ~

 CLICK HERE






घरदर्शक शब्द

   घरदर्शक शब्द

घरदर्शक शब्द


इयत्ता पहिलीच्या सर्व विषयांच्या घटकांनुसार टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

घरदर्शक शब्दाचा व्हिडिओ पाहण्यासाठी

CLICK HERE 


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Whatsapp Group वर सराव चाचण्या हवी असतील तर ~

 CLICK HERE

पिल्लू दर्शक शब्द इयत्ता पहिली

   पिल्लूदर्शक शब्द

पिल्लूदर्शक शब्द


इयत्ता पहिलीच्या सर्व विषयांच्या घटकांनुसार टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

पिल्लूदर्शक शब्दाचा व्हिडिओ पाहण्यासाठी

CLICK HERE  


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Whatsapp Group वर सराव चाचण्या हवी असतील तर ~

 CLICK HERE

ध्वनीदर्शक शब्द इयत्ता पहिली

 ध्वनीदर्शक शब्द

ध्वनीदर्शक शब्द


इयत्ता पहिलीच्या सर्व विषयांच्या घटकांनुसार टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

ध्वनीदर्शक शब्दाचा व्हिडिओ पाहण्यासाठी

CLICK HERE 


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Whatsapp Group वर सराव चाचण्या हवी असतील तर ~

 CLICK HERE

समूहदर्शक शब्द इयत्ता पहिली

  समूहदर्शक शब्द

समूहदर्शक शब्द


इयत्ता पहिलीच्या सर्व विषयांच्या घटकांनुसार टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

समूहदर्शक शब्दाचा व्हिडिओ पाहण्यासाठी

CLICK HERE 


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता पहिलीच्या भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 CLICK HERE

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Whatsapp Group वर सराव चाचण्या हवी असतील तर ~

 CLICK HERE


Saturday, January 25, 2025

राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत

 राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत


राष्ट्रगीत DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

राज्यगीत Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

ध्वजगीत DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

वंदे मातरम् DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Thursday, January 23, 2025

नवोदय PDF पेपर 4

 नवोदय पेपर

 

सौजन्य ~ साईसिद्धेश क्लासेस बोधेगाव


नवोदय परीक्षेचा PDF स्वरूपातील पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇

Pepar 



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप च्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

 CLICK HERE

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



नवोदय PDF पेपर

 नवोदय पेपर

 

सौजन्य ~ साईसिद्धेश क्लासेस बोधेगाव


नवोदय परीक्षेचा PDF स्वरूपातील पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇

Pepar 



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप च्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

 CLICK HERE

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



नवोदय पेपर 2

 नवोदय पेपर

 सन ~ 2024 - 25

सौजन्य ~ साईसिद्धेश क्लासेस बोधेगाव


नवोदय परीक्षेचा PDF स्वरूपातील पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇

Pepar 



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप च्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

 CLICK HERE

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



नवोदय पेपर

 नवोदय पेपर

 सन ~ 2024 - 25

सौजन्य ~ साईसिद्धेश क्लासेस बोधेगाव


नवोदय परीक्षेचा PDF स्वरूपातील पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇

Pepar 



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

उत्तर सूची पाहण्यासाठी करण्यासाठी खालील बटनाला टच कर


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप च्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

CLICK HERE

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.



Saturday, January 18, 2025

नवोदय संभाव्य उत्तर सूची

 

नवोदय परीक्षा संभाव्य उत्तरसूची 2025

नवोदय 2024~25



🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका Download करण्यासाठी खालील चित्राला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा




कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताह राबविण्याबाबत

 कॉपी मुक्त अभियान जनजागृती सप्ताह राबविण्याबाबत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत.


.

विषय-उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत...


उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.


सदर दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गांनी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात, त्याअनुषंगाने


१) मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत, मा. शिक्षणमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेचे वेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक २० जानेवारी ते दिनांक २६ जानेवारी २०२५ या कालावधीत कॉपीमुक्त


अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.


याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा तपशील सोबत पाठविण्यात येत आहे. सदर सप्ताह आयोजित करणेसंदर्भात आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत सूचित करावे.

२) परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

उपरोक्त प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.





कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी आदर्श कार्यपध्दती


परीक्षापूर्व कालावधीत करावयाची कार्यवाही


१ परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन, जनजागृती व वातावरणनिर्मिती विविध माध्यमांतून करावी.

२ परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणा-या शास्तीची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थी व पालक यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दिली जाईल, याबाबत खातरजमा करण्यात यावी.

३ परीक्षा केंद्रावर परीक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल तसेच निर्धारित वेळेत संपेल याबाबत दक्षता घेण्यात यावी.

४ परीक्षा सनियंत्रणासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेशी संलग्न असलेल्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे.

५ प्रत्येक केंद्रावर उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी (तहसिलदार/गट विकास अधिकारी) यांच्या भेटीसंबधी सुव्यवस्थित नियोजन करणे.

६ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील सर्वसाधारण, संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.

७ प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका भरारी पथकाची नेमणूक करावी. जर एखाद्या तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असेल तर आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती करावी.

८ भरारी पथकात किमान चार सदस्य असावेत. त्यामध्ये वर्ग १ / २ चे अधिकारी असावेत. शिवाय वर्ग ३ चे कर्मचारी असावेत. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश असावा.

९ परीक्षा केंद्रांना भेटी देताना दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख यांच्यासोबत परीक्षा दालनास भेटी देणे.

१० परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चा वापर करण्याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात यावे. परीक्षा केंद्रावर पोलीस अधिनियम ३७ (१) (३) लावूनही बाहय उपद्रव कमी होत नसेल तर अशा केंद्रावर १४४ कलम लागू करावे.

११ सर्व परिरक्षण केंद्रावर हत्यारी पोलीस बंदोबस्त देण्यात यावे.

१२ संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्वसाधारण परीक्षा केंद्रापेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा.

१३ परिरक्षण केंद्रातून प्रश्नपत्रिकांची पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचविण्याची जबाबदारी सहाय्यक परिरक्षकाकडे (रनर) असते. प्रश्नपत्रिका वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत (रनर) सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड शिपाई देण्यात यावा.

१४ परीक्षेचे संचालन सुरळीत होण्यासाठी तसेच परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी परिवहन विभागास योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. परीक्षेच्या कालावधीमध्ये अखंडीत विद्युत पुरवठा करण्याकरीता महावितरण विभागास कळविण्यात यावे.


१५ परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

परीक्षा सुरू असताना करावयाची कार्यवाही


१ सदर भरारी पथकांचे परीक्षा केंद्र भेटीचे नियोजन करताना प्रत्येक भरारी पथक दर दिवशी वेगवेगळया तालुक्यात भेटी देतील असे नियोजन करावे.

२ परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उपलब्ध असेल तर ती यंत्रणा कार्यरत असून चित्रीकरणाची साठवणूक (Data Storage) होत असल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.

३ महत्वाच्या विषयांच्या विशेषतः इ. १० वी साठी इंग्रजी, गणित व विज्ञान, इ. १२ वी साठी इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, चिटणीसाची कार्यपध्दती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, अर्थशास्त्र इ. विषयांच्या परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर भरारी पथके जातील असे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ शिक्षणेतर विभागातून उपलब्ध करून घ्यावे.

४ संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावर आवश्यकता भासल्यास बैठे पथकाची नियुक्ती करावी. बैठे पथक परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर पाठविणेपर्यंत थांबणे आवश्यक आहे.

५ सहाय्यक परिरक्षकाकडून (रनर) केंद्रसंचालकाकडे प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे हस्तांतरीत करताना व सीलबंद प्रश्नपत्रिका पाकिटे परीक्षार्थ्यांचे समक्ष परीक्षा दालनात उघडताना व्हिडीओ चित्रीकरण होत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

६ परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाहय पध्दतीने मोबाईल अथवा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

७ ज्या परीक्षा केंद्रावर दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट होत असतील त्यांना शासन निर्णयानुसार अनुज्ञेय सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची खात्री करावी.

८ ज्या विषयाची परीक्षा आहे त्या दिवशी त्या विषयाचे अध्यापन करणा-या शिक्षकांना दालन पर्यवेक्षकाचे काम देवू नये अशी सूचना देण्यात आलेली आहे. याबाबत खातरजमा करण्यात यावी.

९ जिल्हयातील उच्चपदस्थ अधिका-यांनी (जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, प्रांत इ.) परीक्षा केंद्रांना तसेच परिरक्षण केंद्रांना पूर्वसूचना न देता आकस्मिकपणे भेट द्यावी.

१० परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याबाबत कृपया आदेश देण्यात यावेत.

११ परीक्षा संचालनात कोणत्याही स्तरावर गैरप्रकार आढळून आल्यास राज्य मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात नमूद करून संबंधित केंद्रसंचालकामार्फत विभागीय मंडळास पुढील कार्यवाहीसाठी अवगत करावे.

१२ विद्यार्थ्यांजवळ कॉपीचे साहित्य सापडल्यास त्याची उत्तरपत्रिका, कॉपीचे साहित्य हस्तगत करणे. कॉपी प्रकरणाबरोबर पाठवावयाच्या परिशिष्ट ब मध्ये कॉपी पकडणारे अधिकारी/सदस्य यांनी त्यांचे नाव, स्वाक्षरी व हुद्दा इत्यादी बाबी सुस्पष्ट अभिप्रायासह नमूद करणे.

१३ गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर 'कॉपिंग केस' (Copying Case) असे लिहिणे. त्यावर परीक्षार्थीचे निवेदन घेणे व आपली स्वाक्षरी करणे. गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर कॉपी साहित्य, उत्तरपत्रिका व प्रपत्र इत्यादी माहिती अचूकपणे केंद्रभेट अभिप्राय पुस्तिकेत नमूद करणे.

१४ परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराच्या संदर्भात वृत्तपत्र अथवा अन्य माध्यमांना परस्पर कोणतीही माहिती न देणे.

परीक्षेची वेळ संपल्यानंतर करावयाची कार्यवाही


१. सदर भरारी पथकाने परीक्षा संपल्यानंतर तालुक्याचे ठिकाणी असलेल्या परिरक्षण केंद्राचेही निरीक्षण करावे.

२. सर्व परीक्षा केंद्रावरून प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिकांची यादृच्छिकपणे सरमिसळ (Random Mixing) करून पुढील कार्यवाही होत असल्याबाबत खात्री करण्यात यावी.

३. परिरक्षण केंद्रातून (Custody) प्रश्नपत्रिकांची पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहचविण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक परिरक्षकाचे (Runner) लाईव्ह लोकेशन परिरक्षकाकडून तपासले जात असल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.

४. परिरक्षण केंद्र (Custody) ते मुख्य परीक्षा केंद्र या दरम्यानच्या प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण करून परिरक्षकाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत परिरक्षण केंद्राची तपासणी करत असताना पडताळणी करण्यात यावी.

५. परीक्षा केंद्रावर अनुपस्थित परीक्षार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तसेच जादा असलेल्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राकडून परिरक्षकाकडे जमा केल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.

६. परीक्षा केंद्राचा दैनंदिन अहवाल (उपस्थिती, अनुपस्थिती, गैरमार्ग प्रकरणे इ.) मंडळाकडे सादर करण्याकरीता परिरक्षक व केंद्रसंचालक यांना सूचित करण्यात आलेले आहे. याबाबतची कार्यवाही होत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा