SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label शालेय उपक्रम. Show all posts
Showing posts with label शालेय उपक्रम. Show all posts

Wednesday, January 29, 2025

राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....

 राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....



विषय - राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी "सूर्यनमस्कार" उपक्रम राबविणे बाबत.....


संदर्भ: जा.क्र राशैसंप्रप/कलाक्रीडा/सूर्यनमस्कार /२०२४-२५/००३७३ दि. २४/०१/२०२५


उपरोक्त विषयानुसार दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमीच्या दिनी जागतिक सूर्यनमस्कार दिन संपन्न होत आहे. या निमित्ताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियमित सूर्यनमस्कार द्वारे आरोग्य जतन करण्याचा संकल्प करणे अपेक्षित आहे. तद्नुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालये यांचे स्तरावर दि ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सूर्यनमस्कार प्रत्याक्षिकाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी परिसरातील सामाजिक संघटना, योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे. जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे, यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा, अशा सर्व सूचना आपले स्तरावरून आपले अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांचेमार्फत सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचे पर्यंत निर्गमित कराव्यात.

गटशिक्षणाधिकारी/विस्तार अधिकारी/सहाय्यक प्रशासकीय अधिकारी/केंद्रप्रमुख/पर्यवेक्षक/मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा, विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्रे आपले स्तरावरून संकलित करून

  dietpune@maa.ac.in 

या इमेल वर सादर करावा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा