NMMS परीक्षा 22 डिसेंबर 2024 अंतरिम अधिकृत उत्तर सूची उपलब्ध
![]() |
Nmms अंतरिम उत्तर सूची |
शालेय क्षमता चाचणी {SAT} अंतरिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
बौद्धिक क्षमता चाचणी {MAT} अंतरिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रसिध्दीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. ०१/०१/२०२५ ते दि. ०८/०१/२०२५ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दिनांक ०८/०१/२०२५ विहित मुदती नंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
दिनांक :- ०१/०१/२०२४
सदरचे प्रसिद्धीपत्रक DOWNLOAD करण्यासाठी ~
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा
No comments:
Post a Comment