⚜️महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटनाक्रम⚜️
⚜️ जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले.
⚜️ फुलेंच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. त्यांचे मुळ आडनाव गोन्हे होते. पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारावरून फुले हे आडनाव पडले.
⚜️ महात्मा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले.
⚜️ म. फुले यांच्या पुर्वजांचे मुळ गाव सातारा जिल्हयातील कटगुण होय म. फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला.
⚜️ शेजारी गफार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
⚜️ 1841 ते 1847 स्कॉटिश मिशन शाळा पुणे येथे शिक्षण घेतले. 1840 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण व समता या तत्वांना प्राधान्य दिले.
⚜️ म. फुलेंनी लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी हा यांचे प्रशिक्षण घेतले.
⚜️ 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरु केली.
⚜️ 1852 मध्ये वेताळपेठेत पुणे येथे अस्पृशांसाठी दोन शाळांची स्थापना केली.
⚜️ 1852 मध्येच पुना लायब्ररीची स्थापना केली.
⚜️ 1852 मध्ये मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1853 मध्ये महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी स्थापन केली. 1854 मध्ये स्कॉटीश मिशन शाळेत अध्यापन.
⚜️ 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. ही भारतातील पहिली रात्रशाळा होय.
⚜️ 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
⚜️ 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला. 1865 मध्ये केशवपन बंदीसाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
⚜️ 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृशांसाठी खुला केला.
⚜️ 1869 मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार केला.
⚜️ 1873 मध्ये 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडलक होते. पुण्यात परांजपे या मित्राच्या लग्नवरातीत एका सनातन्याने फुल्यांचा शूद्र म्हणून अपमान केला. या बाबींचा फुल्यांवर परिणाम होऊन ते समाजसेवेकडे ओढले गेले. फुल्यांना अहमदनगरच्या मिस फरार या मिशनरी बाईंनी चालविलेल्या मुलींच्या शाळेची प्रेरणा होती...
⚜️ ब्रिटीश सरकारने फुल्यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिणा प्राईज फंडाद्वारे मदत केली. 5 सप्टेंबर 1875 ला पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतींची मिरवणूक निघाली. तित सहभाग घेतला व मिरवणुकीला संरक्षण पुरविले.
⚜️ इ.स. 1875 पुणे व अहमदनगर जिल्हयातील शेतकन्यांनी सावकारशाही विरुध्द फुल्यांच्या नेतृत्वाखाली (शेतकऱ्यांनी) उठाव / बंड केले. हे बंड खतफोडीचे बंड म्हणून ओळखले जाते. ( कर न देणे, सावकारशाहीस विरोध यासाठीचे बंड होते. )
⚜️ 2 जून 1876 ला सत्यशोधक समाजाच्या मंगलाष्टक पुजावीधींचे प्रकाशन केले.
⚜️ 1876 ते 1882 पुणे महानगरपालिकेचे सदस्य (नगरसेवक) म्हणून कार्य केले. 1877 ला धनकवडी येथे दुष्काळपिडीतांसाठी कॅम्प काढला.
⚜️ सत्यशोधक समाजाचा मुळ उद्देश शूद्रांना साक्षर करणे, धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे हा होता. विद्येविना मती गेली। मती विना निती गेली.. या ओळी म.फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातील आहेत,
⚜️ सत्यशोधक समाजाचा मानवतावाद सार्वजनिक सत्यधर्ममध्ये प्रसिध्द केला.सत्यशोधक समाजाचे ब्रिदवाक्य सर्वसाक्ष जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी ।। सार्वजनिक सत्यधर्मास विश्वकुटुंबाचा जाहीरनामा, विश्वधर्माचा अमरकोष म्हणतात.
⚜️ फुलेंनी सावित्रीबाईस साक्षर करून शाळेत शिक्षिका म्हणून नेमले. फुलेंनी कंत्राटदाराचा व्यवसाय केला. त्यांनी पुना कमर्शीयल अॅन्ड कॉन्ट्रक्टींग कंपनीची स्थापना केली. फुलेंनी खडकवासला तलावाचे काम पुर्ण केले.
⚜️ ब्राम्हण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शूद्र बाधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ आहे. अशी प्रस्तावना म. फुलेंनी ब्राम्हणांचे कसब या ग्रंथात मांडली.
⚜️ शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मांडले. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे असे म. फुलेंनी म्हटले. इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी संकेत आहे. असे मानणाऱ्यापैकी फुले होते.
⚜️ ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो. त्या दिवशी त्याचा अर्धा सदगुण जातो. या होमरच्या वचनाने गुलामगिरी या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे. बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
⚜️ म. फुले हे आयदलितोधारक आहेत महर्षी वि. रा. शिंदे म. फुलेंनी आंबालहरी, सत्सार, दिनबंधू ही वृत्तपत्रे काढली. सत्य सर्वांचे आदीधर । रूप धर्माचे माहेर ।। म. फुले
⚜️ शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागणारे पहिले सुधारक महात्मा फुले / पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत म. फुले होय. फुले आपल्या मजुरांना बोनस वाटत असत.
⚜️ सदाशिव चल्लाळ गावंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल माळवेकर या फुल्यांच्या मित्रांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.
⚜️ वज्रसूची, संत कबिरांचे विप्रमती (बीजक), थॉमस पेनचा राईट्स ऑफ मैन या ग्रंथाचा फुल्यांवर प्रभाव होता.
⚜️ सार्वजनिक काकांनी (ग.वा. जोशी) म. फुलेंना अनेकदा सहकार्य केले. ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये यासाठी म. फुलेंनी पंडिता रमाबाई व लेलेशास्त्री यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजात राजकीय विषयावर बोलणे वर्ज्य होते.
⚜️ म. फुलेंनी सत्यशोधक चळवळ, ब्राम्हणेतर चळवळ यांचा पाया घातला. न्हाव्यांचा संप सर्वप्रथम फुल्यांनी घडवून आणला पुणे, ओतूर, तळेगाव ढमढेरे येथे फुले ईश्वरास निर्मिक म्हणतात.
⚜️ मेकालेच्या पाझर सिध्दांतास फुलेंनी विरोध केला. तळापासून शिक्षण दयावे असे सांगितले.
⚜️ म. फुलेंना सयाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानचे बुकर टी वाशिंग्टन म्हटले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी ॥ म. फुले
⚜️ परोपकार, त्याग, मानवता, हे गुण फुलेंनी ख्रिस्ती धर्माकडून स्विकारले. शालेय जीवनात जोतिबांवर छ. शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता.
⚜️ धनंजय कीर जोतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली.
⚜️महात्मा गांधी म्हणतात जोतिबा हे खरे महात्मा होते. 1877 मध्ये दीनबंधू मुखपत्र सुरु केले. याच वर्षी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना केली.
⚜️ कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या मुखपत्राचे संपादक होते. 1882 मध्ये शिक्षण विषयक हंटर कमिशनसमोर साक्ष दिली.
⚜️ 1887 ला मृत्यूपत्र तयार करून त्याची नोंदणी केली. 1888 मध्ये इंग्लंडचा प्रिन्स ड्युक याच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकन्यांच्या वेशात जावून शेतकऱ्यांच्या परीस्थितीचे वर्णन केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भुषण असा केला आहे.
⚜️ त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरी केली होती. याच गृहातील काशीबाई या ब्राम्हण विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते.
⚜️ नारायण लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या बॉम्बे मिल हैंड्स असोसिएशन या कामगार संघटनेमागील प्रेरणा म. फुले. होते.
⚜️ त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ गुलामांना दास्यते मधून सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला. महात्मा फुले यांचा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा मरणोत्तर 1891 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ होय. त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरुपात लिहिलेला आहे.
⚜️1882 मध्ये टिळक व आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर म. फुले यांनी मुंबईला त्यांचा सत्कार केला होता.
⚜️ ज्योतिबांना महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा, मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने रावबहादूर वडेकर यांच्या हस्ते दिली.
⚜️ शुद्र जगदगुरु या शब्दात महात्मा फुले यांच्यावर विष्णू शास्त्री चिपळूणकर टिका करत. त्यांचा समाजसुधारकाचे अग्रणी, स्त्रियांचे उद्धारकर्ते, आदय- दलितोद्धारक क्रांतिसूर्य, समाजक्रांतीचे जनक या शब्दांत गौरव केला जातो.
⚜️ थॉमस पेन या उदार-मानवतावादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवर होता.
⚜️ म. फुलेंनाच महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर कींग असे ही म्हणतात. 28 नोव्हेंबर 1890 ला त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला.
⚜️महात्मा फुलेंचे साहित्य - गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसुड, शिवाजी - महाराजांचा पोवाडा, ब्राम्हणाचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी काव्यरचना, सत्सार, इशारा इत्यादी
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा फुले यांची माहिती वाचण्यासाठी खालील चित्राला टच करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा फुले यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील चित्राला टच करा
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment