रघु नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते.
भरत नावाच्या एका घोड्याच्या व्यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला.
भरतने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले. भरतने रघुच्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला.
दुसरीकडून रघु घोड्यावर बसून येत होता तेव्हा भरत जोरजोराने विव्हळू लागला, गयावया करू लागला. रघुने ते पाहिले व तो भरतपाशी थांबला.
भरत रघुला म्हणाला, ’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का,’’
रघुला त्याची दया आली, त्याने त्याला घोड्यावर बसविले, आणि स्वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच भरत त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला.
दुस-या दिवशी भरत रघुकडे आला व म्हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्यावे लागले.’’
यावर रघु शांतपणे भरतला म्हणाला,’’
मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्वासघात करणे महापाप आहे.
:-गरजूला मदत करण्यापूर्वी तो खराच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.
No comments:
Post a Comment