पहिले महायुद्ध
⚜️ ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध 28 जून 1914 ला युद्ध घोषित केले .
⚜️ पहिले महायुद्ध 1914 ते 1918 असे चार वर्षे चालले या युद्धात 37 देशांनी भाग घेतला.
⚜️ पहिल्या महायुद्धात इंग्लंड, फ्रान्स, रशिया व अमेरिका यांचा दोस्त राष्ट्र गट तयार झाला. दुसरीकडे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कि बुल्गारिया व इटली या मध्यवर्ती (अक्ष) राष्ट्रगट तयार झाला. यामुळे युरोपियन राष्ट्रे दोन गटात विभागली गेली.
⚜️ गुप्त करार करणे व युरोपातील गटबाजीचा जनक जर्मनीचा चँसेलर बिस्मार्क यास मानले जाते.
⚜️ सर्बियाची गुप्त क्रांतिकारी संघटना काळा हात ही होती.
⚜️ अक्ष राष्ट्रांचे नेतृत्व जर्मनीने केले
⚜️ पहिल्या महायुद्धात जर्मनीने रशियावर एक ऑगस्ट 1914 ला आक्रमण केले.
⚜️ पहिल्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर 3 ऑगस्ट 1914 ला आक्रमण केले.
⚜️ इंग्लंड पहिल्या महायुद्धात 4 ऑगस्ट 1914 ला सामील झाले.
⚜️ 26 एप्रिल 1915 ला इटली दोस्त राष्ट्रांच्या वतीने महायुद्धात सामील झाले.
⚜️ अमेरिका 6 एप्रिल 1917 ला दोस्तांच्या बाजूने महायुद्धात सामील झाले.
⚜️ पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन होते.
⚜️ या युद्धात इंग्लंडची लुसिटानिया ही बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडवली.
⚜️ रशिया 1917 पर्यंत या युद्धात दोस्तांच्या बाजूने लढला. परंतु 1917 च्या क्रांतीनंतर रशियाने युद्धातून माघार घेतली.
⚜️ जुलै 1918 पासून अक्ष राष्ट्रगटाची हार होऊ लागली. जर्मन सम्राट कैसर विल्यम दुसरा याने 10 नोव्हेंबर 1918 ला पदाचा राजीनामा दिला व हॉलांड गाठले. यानंतर फ्रेडरिक एबर्ट हा जर्मनीचा चँसलर बनला. त्याने 11 नोव्हेंबर 1918 ला युद्धविराम करारावर हस्ताक्षर केले व पहिले महायुद्ध संपले.
⚜️ पहिल्या महायुद्धात सुमारे एक कोटी सैनिक व लाखो लोक मारले गेले.
⚜️ 18 जून 1919 ला पॅरिस शांतता संमेलन सुरू झाले.
⚜️ 28 जून 1919 ला व्हर्सायचा जर्मनीवर लादला गेला.
⚜️ 1920 ला अमेरिकन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या 14 कलमी कार्यक्रमानुसार राष्ट्रसंघाची स्थापना केली गेली.
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
No comments:
Post a Comment