⚜️ महात्मा गांधी⚜️
महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. ज्याने जगाला अहिंसेच्या मार्गाने जगण्याची शिकवण दिली, ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक व शांतताय मार्गाने लढा दिला, ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि त्यांच्यातील तंटे मिटवण्यासाठी उपोषणे केली. त्या महान पुरुषाचा म्हणजे महात्माजींचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारताला भूषणावर आहे.
त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्याकाळच्या पद्धतीनुसार वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.
गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टर ची पदवी घेतली आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले. तेथे त्यांना काळेगोरे यांच्यातील भेदभावाला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांनी सत्याग्रह ह्या अहिंसाख मार्गाने त्या अन्यायाविरुद्ध लढा दिला.
ते 1909 साल भारतात आले. तेव्हा भारतातही इंग्रज लोकांची जुलमी सत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या सत्यविरुद्ध लढण्यासाठी सर्व सामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवी होते ते काम महात्मा गांधींनी केले. त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या धर्मांचे आणि पंथांचे भारतीय लोक आपल्यातील मतभेद विसरून एकत्र आले. म्हणून त्यांना महात्मा गांधी महात्मा अशी पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली येथे एका माथेफिर व माणसाने गांधीजींची हत्या केली. ते एक श्रेष्ठ महामानव होते.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
राष्ट्रपिता महात्मा गांधी निबंध क्रमांक 2
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा गांधी यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटन टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सराव चाचणी सोडवायची असल्यास खाली टच करा.🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment