SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, September 17, 2022

प्रबोधनकार ठाकरे

⚜️ प्रबोधनकार ठाकरे ⚜️



            प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म पनवेल जिल्हा रायगड येथे 27 सप्टेंबर 1885 रोजी झाला. त्यांना अभ्यासाची अतिशय आवड होती. सातत्याने अभ्यास करून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले. तसेच संस्कृत भाषेचाही त्यांनी उत्तम अभ्यास केला.

           त्यांनी काही काळ नोकरी केली; तसेच टंकलेखन, तैलचित्रकार, छायाचित्रकार, नाटके कंपनीचे चालक, जाहिरातपट्टू , विमा एजंट असे विविध व्यवसाय केले. त्यांचा मूळचा पिंड समाज सुधारकाचा होता.                 समाजातील दोष पाहून ते अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत होते. सामाजिक विषमता त्यांना मान्य नव्हती. म्हणून पत्रकारिता त्यांनी स्वीकारली.

            अस्पृश्य लोकांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. त्यांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठविला. समाजातील सर्व व्यक्तींना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे असे त्यांना वाटत होते. प्रत्येकाला प्रगती करण्याचा अधिकार आहे तो अधिकार त्यांना मिळावा यासाठी त्यांनी विपुल लिखाण केले. प्रत्येक माणसातील स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न केला. लोक त्यांचे विचार अत्यंत आदरानेच समजून घेत होते.

          तसेच विवाह हा एक पवित्र विधी असून हुंडा प्रथा नाहीशी करण्यासाठी अनेक लेख लिहिले. विवाह या पवित्र विधीचा व्यापार होऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यांच्यामुळे समाजात बरीच जागरूकता निर्माण झाली. हुंडा पद्धत बंद होऊ लागली.

            'टाकलेला पोर' , 'खरा ब्राह्मण' , 'विधीनिषेध' अशांसारखी नाटके त्यांनी लिहिली. नाटकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. त्याचप्रमाणे कोदंडाचा टणत्कार , ब्राह्मणांचा इतिहास , भिक्षुशाहीचे बंड , कुमारिकेचा शाप  यांच्यासारखी अनेक पुस्तके लिहिली. रंगो बापूजी गुप्ते , संत गाडगेबाबा , पंडित रमाबाई यांची चरित्रे त्यांनी लिहिली. ही चरित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. तसेच समर्थ रामदासांचे इंग्रजी भाषेत चरित्र लिहिले. त्यामुळे देशभर रामदासांचे चरित्र लोकांना कळाले. त्यांनी वक्तृत्व शास्त्रावर मराठीतून ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ अनेकांना उपयोगी आला. लोकमान्य टिळकांनी या ग्रंथाची स्तुती केली.

              संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यावेळी चळवळ उभी राहिली, त्या वेळी त्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगाव लागला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी प्रबोधन नावाचे नियतकालिक काढले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.

             त्यांचे जेष्ठ पुत्र शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना काही काळ त्यांनी मार्गदर्शन केले. मराठी लोकांची अस्मिता जागृत झाली. मराठी भाषिकांना नोकऱ्या मिळू लागल्या. प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर आपल्या विचारांद्वारे प्रबोधन केले. म्हणून त्यांना प्रबोधनकार या नावाने ओळखले जाते.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


⚜️ महत्त्वाचे मुद्दे ⚜️

⚜️ पूर्ण नाव ~ केशव सीताराम ठाकरे

⚜️ जन्म ~ 17 सप्टेंबर 1885 रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला.

⚜️ सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते.

⚜️ प्रबोधनकार ठाकरे यांचे कर्तुत्व आणि प्रतिभा अनेकांगी होती . विचारवंत , नेता ,  लेखक , पत्रकार , संपादक , वक्ता , प्रकाशक , धर्म सुधारक , इतिहास संशोधक , नाटककार , संवाद लेखक , संगीत तज्ञ , शिक्षक , भाषाप्रभू , लघु उद्योजक , चित्रकार अशी अनेक विशेषणे त्यांना अपुरीच पडतात.

⚜️ हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली.

⚜️ हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वर पित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले.

⚜️ साहित्य ~ देवळांचा धर्म की धर्माची देवळे , कुमारीकाचे शाप, माझी जीवनगाथा ( आत्मचरित्र )  , आई , हिंदू कर्माचे हिंदू धर्माचे , दिव्य , शेतकऱ्यांचे स्वराज्य , वक्तृत्वशास्त्र , पंडित रमाबाई सरस्वती (चरित्र) , दगलबाज , टाकलेले पोर , जुन्या आठवणी , खरा ब्राह्मण , कोदंडाचा टनत्कार.

⚜️ वृत्तपत्रे ~ प्रबोधन , सारथी.

⚜️ प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन 20 नोव्हेंबर 1972 ला झाले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


इतर महापुरुषांचा जीवन परिचय वाचायचा असेल तर खाली टच करा.

👇


💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠


No comments:

Post a Comment