माझा आवडता खेळ ( क्रिकेट )
खेळ हा लहान मुलांच्या आवडीचा विषय. मग तो आवडीचा खेळ असेल तर सोन्याहून पिवळे. माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. माझे मित्रही हा खेळ आवडीने खेळतात. माझे बाबा म्हणतात की मुलांनी भरपूर खेळले पाहिजे. अंग मेहनत केली पाहिजे. त्यामुळे शरीरात ताकद येते.
भारत हा क्रिकेटवेडा देश मानला जातो. खूप लोक क्रिकेट पाहतात आणि खेळतातही. सुनील गावस्कर हा जुन्या पिढीतील महान खेळाडू. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा काढण्याचा विश्वविक्रम प्रथम केला. आज दहा हजाराहून अधिक धावा काढणारे ब्रायन लारा,ॲलन बॉर्डर, सचिन तेंडुलकर असे खेळाडू आहेत.
सचिन तेंडुलकर तर क्रिकेटमधील महान तारा. त्याच्या नावावर एक दिवशीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा व सर्वात जास्त शतके करणारा फलंदाज असे अनेक विक्रम आहेत.
मलाही सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे महान खेळाडू व्हावे असे वाटते. त्यासाठी मी खूप मेहनत घेतो. सुट्टी असली की आमची क्रिकेटची कट्टी जमते. मी ओपनर बॅट्समन म्हणून नेहमी खेळायला येतो. एकेरी दुहेरी धावा घेण्यापेक्षा चौकार षटकार यांची आतिषबाजी करायला मला खूप आवडते.
शहराप्रमाणे खेड्यांतही लहान मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. हाप पीच व ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा खेड्यात विशेष लोकप्रिय आहेत. क्रिकेटच्या मैदानावर जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तहानभुकेचे भान राहत नाही.
असा हा माझा आवडता खेळ क्रिकेट आहे.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनाला टच करा.
👇
No comments:
Post a Comment