शहाण्या मुंग्या
उन्हाळ्याचे दिवस होते. वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक होते. धनधान्य ही भरपूर पिकले होते. अशा वेळेला एक नाकतोडा पोटभर जेवून गाणे गाण्यात रंगून गेला होता. त्याचवेळी काही मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या. हे नाकतोड्याने पाहिले. तो मुंग्यांना काम करताना पाहून हसला. त्यातील एक मुंगी त्याची मैत्रीण होती. तो तिला म्हणाला "तुम्ही किती लोभी आहात! आनंदाने नाचायचे सोडून तुम्ही चक्क काम करताय. मला तुमची दया येते!" मुंगी त्याला म्हणाली "माझ्या प्रिय मित्रा, आम्ही येत्या पावसाळ्यासाठी अन्न साठवतोय."
लवकरच उन्हाळ्यानंतर पावसाळा आला. थंडीमुळे वातावरणातील ऊब नाहीशी झाली. अन्नाची टंचाई भासू लागली. नाकतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे मुश्किल झाले. शेवटी त्याच्यावर उपासमारीची पाळी आली.
एके दिवशी नाकतोड्याने त्या मुंगीच्या घरचा दरवाजा ठोठावला. तो म्हणाला, "मला काहीतरी खायला देतेस का?" मुंगी त्याला म्हणाली, "सबंध उन्हाळा तू गाणे गाण्यात घालवलास. नाचण्यात घालवलास. मी तुझ्यासारखे आळशी प्राण्याला काहीही देणार नाही." आणि मुंगीने दार धडकन बंद केले .
तात्पर्य
आजचे बचत ही उद्याची गरज
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर बोधकथा पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
👇
No comments:
Post a Comment