⚜️ मिश्र उदाहरणे ~ बेरीज व वजाबाकी ⚜️
1} एका खेळाच्या मैदानाची आसनक्षमता 15,740 आहे. एका सामन्यावेळी 6,312 स्त्रिया व 5,740 पुरुष हजर होते, तर किती असणे रिकामी होती?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
2}हरीशकडे 16,400 रुपये होते त्याने 7,356 रुपयांचे टेबल घेतले. व 6,870 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या, तर त्याच्याकडे किती रुपये उरले?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
3} गणेश मंडळाकडे 27,890 रुपये होते त्यापैकी त्यांनी 18,340 रुपयांची मूर्ती व 6,530 रुपयांचे इतर साहित्य विकत घेतले, तर मंडळाकडे किती रुपये शिल्लक राहिले?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
4} शरदरावांनी एका हॉस्पिटलला 80,000 रुपये देणगी दिली. त्यातून त्यांनी 45,490 रुपयांची उपकरणे. आणि 27,552 रुपयांची औषधे घेतली, तर किती रक्कम शिल्लक राहिली?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
5} रमेशकडे 26,512 रुपये होते. त्यातील 19,540 रुपयांची पुस्तके शाळेस भेट दिली. व 1,500 रुपयांची पाण्याची टाकी शाळेस भेट दिली. तर रमेश कडे किती रुपये शिल्लक राहिले?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
6} रोहनने संगणक खरेदीसाठी 27,658 रुपये आणि प्रिंटर, स्कॅनर साठी 14,478 खर्च केले. या साहित्याची बांधाबंदी, वाहतूक यांसाठी काही खर्च आला. रोहनला एकूण 47,000 रुपये खर्च आला. तर त्याने बांधाबांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
7} रामभाऊ जवळ 15,000 रुपये होते त्यांनी 8,570 रुपयांचा कडबा, व 3,840 रुपयांची पशुखाद्य खरेदी केली. तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
8} एका रोपवाटिकेत 32,517 रोपे तयार करण्यात आली. त्यापैकी 12,469 आंब्याची रोपे, 10,537 सागवानाची रोपे व बाकीची इतर रोपे होती. तर इतर प्रकारची रोपे किती होती?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
9} एका दूध संकलन केंद्रात 1,340 लिटर गाईचे दूध, 2,630 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 3,415 लिटर दुधाची विक्री केली, तर किती लिटर दूध शिल्लक राहिले?
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
10} एका गावात 6,718 पुरुष असून 5,829 स्त्रिया आहेत. एकूण लोकसंख्येतील 7,508 साक्षर आहेत, तर गावातील निरक्षरांची संख्या किती?
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
बेरीज या घटकावरील शाब्दिक उदाहरणे पाहण्यासाठी खाली टच करा.
👇
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
वजाबाकी या घटकावरील शाब्दिक उदाहरणे पाहण्यासाठी खाली टच करा.
👇
No comments:
Post a Comment