SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, September 5, 2022

निबंध ~ माझा आवडता छंद

 माझा आवडता छंद



      माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा. कारण छंद माणसाला कष्टातून विसावा देतो. छंद म्हणजे नाद. फावल्यावेळी आपण एखादी गोष्ट जोपासतो. एकदा एखाद्या गोष्टीचा छंद जडला की ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. आणि तो छंद मग आपला आवडता छंद होऊन बसतो.

        प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. कोणी उत्तम चित्र काढण्याचा छंद जोप असतो, तर कोणी वाचनाचा, कोणी क्रिकेट खेळण्याचा छंद जोपासतो, तर कोणी कविता लिहिण्याचा, मला मात्र छंद जडला तो वर्तमानपत्रातील कात्रणे काढून संग्रहित करण्याचा. त्याचे बीज माझ्यात लहानपणीच रोवले गेले. अंतराळ, विश्व, खगोल याबद्दल जे जे काही छापून येईल ते संग्रहित ठेवण्याचा मला जणू नादच लागला. माझा छंद जोपासण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे मी चाळू लागलो. आणि माझा छंद हळूहळू मोठा होऊ लागला.

         माझ्या कात्रणातील संग्रहात अंतराळा बद्दल खूप माहिती आहे. अंतराळातील विविध ग्रह, तारे, उपग्रह त्यांच्या फिरण्याची गती, आकार याबद्दल भरपूर माहिती माझ्याजवळ उपलब्ध आहे. याशिवाय सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, नील आर्मस्ट्रॉंग यांचा अंतराळ प्रवास, त्यांनी केलेले स्पेस वॉक याबद्दलची माहिती सांगणारी ही भरपूर कात्रणे माझ्या संग्रही आहेत.

       अंतराळासंबंधीचा छंद जोपासता जोपासता मला आता अंतराळवीर होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. हा छंद मला अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच उपयोगी पडेल.

No comments:

Post a Comment