SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, September 8, 2022

निबंध पावसाळा

 ⚜️ पावसाळा ⚜️



         पावसाळा माझा खूप आवडता ऋतू. उन्हाळ्यानंतर येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. जून महिन्याची चाहूल लागताच आकाशात ढग जमा व्हायला सुरुवात होते. मृगाचा पाऊस म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. भारतात नैऋत्य मौसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो हा पाऊस म्हणजे भारताला वरदान ठरलेला आहे.

          पावसाळा सुरू झाला की सगळे चराचर खूप टवटवीत दिसू लागते. सगळीकडे हिरवे गार होते. झाडांना पालवी फुटते. तेव्हा हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात.

          पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांची पेरणीच्या कामाची खूप धांदल उडते. पावसाची योग्य वेळी सुरुवात झाली की बळीराजा सुखावतो. पेरणीनंतर अंतर मशागतीच्या कामाला लागतो. उन्हाळ्यात उघडे बोडके झालेले डोंगर पावसाळ्यात हिरवेगार होतात. सारी सृष्टी खुलून जाते. कवीला कविता सुचतात.

 नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाणी फुल फुले नाहती

 पाऊसधारा झेलित जाती, भिरभिरती पाखरे 

जिकडे तिकडे पाणीच , पाणी खळखळणारे झरे

 असे निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यात पाहिला मिळते.

            लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. कोणत्याही आजाराचा विचार न करता ते पावसामध्ये ओली चिंब होतात आईने पर वांगी दिली नाही तर ए आई मला पावसात जाऊ दे भिजूनिया ग चिंब चिंब होऊ दे असे लाडी लडिवाळपणे हट्ट धरतात आणि शेवटी परवानगी मिळवतात

            पावसाळ्यात पावसाबरोबरच अनेक साथीच्या रोगांना ही सुरुवात होते. पाणी गढूळ होते. तसेच वातावरण बदलल्यामुळे अनेक मुले आजारीही पडतात. तरीही सर्व सृष्टीला पावसाळा हा एक आनंद देऊन जातो. म्हणून हा पावसाळा मला खूप खूप आवडतो.

🌧️⛈️🌦️🌧️⛈️🌦️🌧️⛈️🌦️🌧️⛈️🌥️🌧️⛈️🌥️🌧️⛈️🌥️🌧️⛈️🌥️🌧️⛈️🌦️🌧️⛈️🌦️🌧️⛈️🌦️

No comments:

Post a Comment